महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे.
वाशिम ते अकोला हा जिल्ह्यातील एक प्रमुख मार्ग (रस्ता) असून, जालन्यातून अमरावती- नागपूरकडे जाणारा रस्ता ह्याच जिल्ह्यातून जातो.
घनदाट जंगले, विरळ लोकसंख्या अन् त्यामुळे निसर्गरम्यतेबरोबरच अतीव शांतता हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य. गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हयातील बर्याचशा ठिकाणी नागरी भागातील माणसांची पावले पोहोचलेली नाहीत.
माल्टाचे प्रजासत्ताक हा दक्षिण युरोपातील एक छोटा द्वीप-देश आहे. माल्टा भूमध्य समुद्रामधील एका द्वीपसमूहावर वसला असून तो इटलीच्या सिसिलीच्या ८० किमी (५० मैल) दक्षिणेस, ट्युनिसियाच्या २८४ किमी (१७६ मैल) पूर्वेस, व लिबियाच्या ३३३ किमी (२०७ मैल) उत्तरेस स्थित आहे. माल्टाचे क्षेत्रफळ केवळ ३१६ चौ. किमी (१२२ चौ. मैल), तर लोकसंख्या सुमारे ४.५ लाख असून माल्टा जगातील सर्वात लहान व सर्वात घनदाट लोकवस्तीच्या देशांपैकी एक आहे. व्हॅलेटा ही माल्टाची राजधानी असून ती युरोपियन संघामधील सर्वात लहान राष्ट्रीय राजधानी आहे. माल्टी व इंग्लिश ह्या दोन माल्टामधील राजकीय भाषा आहेत.
पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे.
कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. येथे प्राचीन काळात कण्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या काळी शकुंतलेने या गणपतीची पूजा केली असे म्हटले जाते.
मोठ्या प्रमाणावर सापडणारी चुनखडी हे या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वणी तालुक्यात राजूर, चनाखा, परमडोह, सिंदोला या भागात अधिक प्रमाणात चुनखडक सापडतो. राळेगाव तालुक्यातील गौराळा व मारेगाव तालुक्यातील मुकुटवन येथेही चुनखडक सापडतो.
राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे.
महे हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. याच शहराला ‘मयाझी’ असेही म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या जरी हे शहर पुडुचेरीमध्ये समाविष्ट असले, तरी चारी बाजूने ते केरळ राज्याने वेढलेले आहे.
ओमान हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti