(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • बेलारूस

    बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

  • कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यत: ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात.

  • स्वाझीलँड

    स्वाझीलँड हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक छोटा भूपरिवेष्टित देश आहे. स्वाझीलँडच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पूर्वेला मोझांबिक हे देश आहेत. स्वाझीलँडचा उल्लेख स्थानिक भाषेत न्ग्वाने किंवा स्वातिनी असाही होतो. स्वाझीलँडमध्ये स्वाझी जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात.

  • उस्मानाबाद जिल्ह्यातील निजामशहाची राजधानी परांडा

    महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे.

  • परभणी जिल्हा

    परभणी परिसराशी अनेक पौराणिक संदर्भ जुळलेले आहेत. संत जनाबाईंच्या विठ्ठलभक्तीचा स्पर्श या जिल्ह्याला झालेला आहे. जिंतूरसारखे जैन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण या जिल्ह्यात आहे.शिवाय दक्षिण गंगेचा (गोदावरीचा) काठ लाभलेल्या या जिल्ह्यातून मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यरत आहे.

  • चेल्लाह

    मोरोक्कोमधील राबात शहराजवळ चेल्लाह या ठिकाणी रोमन वसाहतीचे अवशेष आहेत.

  • मुंबईमधील प्रसिध्द संस्था

    ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी झाली. या सर्व संस्थांनी मुंबईच्या देशाच्याही लौकिकात भर घातली आहे.

  • गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    गडचिरोली जिल्ह्याला सर्वात जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके राज्य महामार्गांनी जोडले आहेत. चंद्रपूर-गोंदिया हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.

  • मायक्रोनेशिया

    मायक्रोनेशिया हा ओशनिया खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे.

  • कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे. त्याच्या पश्चिम-नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येला रत्‍नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात.