महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ज्वारी हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक असून, ते खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे. कापूस हे नगदी आणि जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक असून कळमनुरी, हिंगोली, वसमत व सेनगाव या तालुक्यांत कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो.
गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर आहे.
पुणतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत चांगदेवांचे विश्रांतीस्थान या शहराजवळ असून, अनेक प्राचीन मंदिरे या शहरात आहेत.
बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
महाराष्ट्रातील वाशिम हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत.
नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी जमाती वास्तव्यास असून येथील लोकसंख्येची घनता कमी आहे. या भागातील वनांत भिल्ल, पारधी व गोमित या आदिवासी जमाती मोठ्या संख्येने राहतात.
महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्या मृतिका यांचे साठे आहेत.
जपान (En-us-Japan.ogg उच्चार (सहाय्य·माहिती))(जपानी- 日本) हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. जपानी भाषेत “जपान” या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा (日本) (कांजी = चिनी / जपानी भाषेचे वर्ण) अर्थ “सूर्य उगम” असा होतो. त्यामुळे आणि जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते.
अकराव्या शतकात विजापूर हे आदिलशाहीचे राजधानीचे ठिकाण होते. येथील गोल घुमट पर्यटकांचे आकर्षण आहे.
महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर एक प्रसिद्ध गाव आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.
Copyright © 2025 | Marathisrushti