
सुमारे ४१,००० वर्षांपूर्वी घडून आलेल्या या पृथ्वीवरील चुंबकीय बदलांत, चुंबकीय ध्रुवांची जागा मोठ्या प्रमाणात सरकली होती. तसंच त्यांच्या तीव्रतेतही मोठा बदल झाला होता. चुंबकत्वातील बदलाच्या घटना अधूनमधून घडून येत असल्या तरी, पृथ्वीच्या चुंबकत्वातला या वेळचा बदल खूपच मोठा असल्यानं लक्षवेधी ठरला आहे. या लक्षवेधी घटनेची झलक त्या काळी विषुववृत्तावरील ‘ध्रुवीय’ प्रकाशाद्वारे दिसून आली असल्याचं, आताचं हे संशोधन दर्शवतं.
March 22, 2022

इजिप्त हा देश पुरातन संस्कृतीच्या निदर्शक असणाऱ्या, विविध रचनांबद्दल प्रसिद्ध आहे. या रचनांतील एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अर्थातच पिरॅमिड. परंतु पिरॅमिडबरोबरच तिथली जी आणखी एक लक्षवेधी रचना सुप्रसिद्ध आहे, ती म्हणजे गिझाचा ‘ग्रेट स्फिंक्स’. गिझाच्या सुप्रसिद्ध ‘ग्रेट पिरॅमिड’च्या जवळच, दक्षिण दिशेला वसलेला हा स्फिंक्स म्हणजे एक भव्य अश्मशिल्प आहे.
November 22, 2023
या जगामध्ये अनेक universes आहेत. Multi Universe संबंधित Dr Stuart Clark यांनी ‘Unknown Universe’ या पुस्तका मध्ये संगीतलेले आहे. वेगवेगळ्या Universe मध्ये वेगवेगळे जीवन असू शकते अथवा सारखेच जीवन सुधा म्हणजेच समांतर ब्रम्हांड असू शकते.
April 23, 2024
क्वांटम कॉम्प्युटर हा अशा प्रकारचा संगणक असतो ज्यात क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे पुंज यांत्रिकीचा थेट वापर केलेला असतो. सुपरपोझिशन व एन्टँगलमेंट अशी दोन तत्त्वे वापरून त्यात माहितीचे संस्करण केले जाते.
September 30, 2023
बँकेत नोटा मोजण्यासाठी आता कॉशयरची भूमिका तुलनेने कमी झाली आहे, त्याच्या मदतीला करन्सी काऊंटिंग मशीन आले आहे. या मशिनमध्ये नोटा टाकल्या की, तुम्हाला त्या किती नोटा आहेत हे कळते.
August 26, 2023

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला.
January 7, 2023

शुक्रावर ज्वालामुखी असल्याचे अनेक पुरावे पूर्वीच मिळाले आहेत. परंतु या ज्वालामुखींच्या अलीकडच्या काळातील सक्रियतेचे पुरावे मात्र सापडले नव्हते. त्यामुळे शुक्र हा सध्याच्या काळात भूशास्त्रीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला होता. आता मात्र शुक्र निष्क्रिय नव्हे, तर अगदी सक्रिय असल्याचा पुरावा सापडला आहे. हा पुरावा, अलीकडेच शुक्रावर ज्वालामुखीचा एक उद्रेक होऊन गेल्याचं दर्शवतो.
April 14, 2023
स्वाइन फ्लूच्या काळात आरोग्य विषयक सवयींना निदान पुण्यात तरी अतिशय महत्त्व आले होते, त्यामुळे काही प्रमाणात व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घेण्यात आली. नंतर अ त्या चांगल्या सवयी किती टिकल्या हे सांगता येणार नाही.
November 2, 2023
संगणक वापरणाऱ्यांच्या तोंडी, ‘व्हायरस’ हा शब्द नेहमीच ऐकू येतो. आपल्या संगणकाला विविध प्रकारे आजारी पाडणारे हे व्हायरस म्हणजे काय, संगणकावर त्यांचा परिणाम काय होतो, त्यांची कार्यपद्धती कशी असते, त्यांचे निर्मूलन कसे केले जाते, इत्यादी बाबींचा ऊहापोह करणारा हा लेख…
October 11, 2023

प्रत्येक सजीवाला त्याचे गुणधर्म हे त्याच्या पेशींतील जनुकांच्या रचनेनुसार प्राप्त होतात. जनुक म्हणजे सजीवाच्या पेशीतल्या डीएनए रेणूंतल्या विशिष्ट रासायनिक रचना. पेशींतील जनुकांच्या संपूर्ण माहितीला, सजीवाचा ‘जनुकीय आराखडा’ म्हटलं जातं. सजीवाच्या जनुकीय आराखड्यात विविध कारणांनी कालानुरूप बदल होत जातात. हे जनुकीय बदल त्या सजीवाच्या स्वरूपात बदल घडवून, त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरतात. आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जनुकीय आराखड्यांची प्राचीन काळातील सजीवांच्या जनुकीय आराखड्यांशी तुलना करून त्या सजीवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करता येतो.
April 28, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti