
अॅमेझॉनच्या जंगलात लपलेली अशी दोन पुरातन शहरं, दक्षिण अमेरिकेतील बोलिविआ या देशात सापडली आहेत. बोलिविआतील मोजोस पठारांच्या परिसरात सापडलेली ही शहरं सहाशे वर्षं जुनी आहेत. या प्राचीन वसाहतींचा शोध लावण्यासाठी लायडर या तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला. बॉन येथील ‘जर्मन आर्किऑलॉजिकल इंस्टिट्यूट’ या संस्थेतील हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.
July 18, 2022

निअँडरटाल ही मुख्यतः शिकारीवर जगणारी प्रजाती होती. त्यामुळे ते कदाचित खाद्य गोळा करण्यासाठी या तळ्याशी आले असावेत. मात्र या निअँडरटालांनी मोठ्या प्राण्याची शिकार केल्याचा पुरावा काही या वाळूच्या थरावरील खुणांवरून मिळाला नाही. तळ्यातले मासे पकडण्यासाठी, छोटे कवचधारी मृदुकाय प्राणी गोळा करण्यासाठी किंवा तळ्यावर येणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ते आले असावेत. कारण या परिसरातील निअँडरटालांच्या खाद्यात या गोष्टींचा समावेश असायचा. या ठशांच्या बाबतीतला एक वेगळाच भाग म्हणजे, ज्या सहा वर्षांच्या दोन छोट्या मुलांच्या पायांचे ठसे इथे आढळले आहेत, ते फक्त ठरावीक दिशेनंच गेलेले दिसत नाहीत. ते इकडेतिकडे विखुरले आहेत. यावरून या संशोधकांनी, ही दोघं लहान मुलं वाळूत खेळत असावीत, खेळताना ती इकडेतिकडे बागडत असावीत, असा एक सरळ साधा, पण मनोरंजक निष्कर्ष काढला आहे.
May 1, 2022
जोहान्स गुटेनबर्गने लावलेला हा शोध मानवी इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी माध्यमाचा उदय होता. जागतिक मुद्रण क्रांतीने माणसाला स्वतंत्रपणे विचार करण्याचे, प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे आणि आपले विचार जगासमोर मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. लोकशाहीच्या संकल्पनेचा विस्तार होण्यात आणि मानवी हक्कांची जाणीव निर्माण करण्यात या क्रांतीचा वाटा सिंहाचा आहे. आज आपण ज्या संगणकीय, डिजिटल आणि इंटरनेटच्या माहिती युगात जगत आहोत, त्या माहितीच्या महाजलाची खरी मुहूर्तमेढ १५ व्या शतकातील याच मुद्रण क्रांतीने रोखली होती, यात तीळमात्र शंका नाही.
June 21, 2026

अंटार्क्टिका खंडावरच्या जमिनीचा मोठा भाग बर्फानं व्यापला आहे. या बर्फाच्या थराखाली पाण्याचे अनेक ‘तलाव’ अस्तित्वात असल्याचं, यापूर्वीच्या संशोधनातून दिसून आलं आहे. हे तलाव बर्फाच्या तळाशी, पृष्ठभागापासून दोन ते चार किलोमीटर खोलीवर वसले आहेत. यातले काही तलाव एकमेकांना जोडले आहेत.
December 3, 2022
१८६८ मध्ये लंडन येथे बेंजामिन वॅडी या पेंटरने पहिल्यांदा वॉटर हीटर तयार केला, त्याला गिझर असे नाव होते. त्यामुळे आजही आपण गिझर हा शब्द वॉटर हीटरला नेहमी वापरतो. १८८९ मध्ये एडविन रूड या नॉर्वेच्या इंजिनियरने अधिक प्रगत असा इलेक्ट्रीक वॉटर हीटर तयार केला.
August 13, 2023

स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या संशोधनाद्वारे केला आहे. गंधांवरचं हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. संख्याशास्त्राचा आधार घेणाऱ्या या संशोधनातून निघालेले निष्कर्ष लक्षवेधी ठरले आहेत.
June 2, 2022

ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील वनस्पतींची आणि प्राण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही.
February 11, 2023
साबण म्हणजे मेद (चरबी) व सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांचे मिश्रण. ८० ते १०० अंश तापमानाला गरम करून सॅपोनिफिकेशन प्रक्रियेने मिळवलेले मेदाम्लाचे सोडियम किंवा पोटॅशियम क्षार असतात. ती एक प्रकारे मेदाच्या हायड्रॉलिसिसची प्रक्रिया असते, त्यात ग्लिसरॉलही तयार होत असते.
November 3, 2023
एकदा विचारेकाका, वहिनी आणि त्यांची काही मित्रमंडळी उंच डोंगरमाथ्यावरच्या थंड ठिकाणी सहलीला गेले. तिथे गेल्यावर चहासाठी आधण ठेवले गेले. पाणी उकळताना पाहिल्याबरोबर, विचारेंच्या डोक्यातला किडा वळवळू लागला. त्यांनी आपल्या बॅगेतला थर्मामीटर बाहेर काढला. पाणी उकळतंय म्हणजे त्याचे तापमान १०० अंश सेल्सिअस असले पाहिजे.
October 15, 2023

इजिप्तमधल्या पुरातन राजवटींतील प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक व्यक्तींचे अवशेष आज ममींच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. या ममींचं पूर्ण शरीर उपलब्ध असलं तरी, ते कुजू नयेत म्हणून ममीत रूपांतर करताना, त्यांच्या शरीरातील पाणी काढून टाकलं जायचं. परिणामी या सगळ्या ममी अत्यंत शुष्क स्वरूपात आढळतात. या शुष्क स्वरूपावरून त्यांच्या मूळ चेहऱ्याची कल्पना येणं, हे जवळपास अशक्य आहे.
January 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti