(User Level: User is not logged in.)

विज्ञान / तंत्रज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारताचे यशस्वी अंतराळ उड्डाण….

    भारताच्या अंतराळ क्षेत्रातील भरीव यशात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. यांतला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. या ऐतिहासिक उड्डाणास पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने हा विशेष लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२३ च्या अंकात प्रकाशित झाला होता. चांद्रयान ३ च्या निमित्ताने पुन्हा प्रकाशित करत आहोत.

      August 22, 2023


  • स्टेथोस्कोप

    पूर्वीच्या काळात नाडीपरीक्षेवरून रागनिदान केले जात असे. हृदयाचे ठोके ऐकून वैद्यकीय तपासणी करण्याची पद्धत नंतर रूढ झाली. इ.स. १८०० सुरुवातीच्या काळात फ्रान्समध्ये रेने लॅनेक नावाचा एक डॉक्टर होता. तो हृदयाचे स्पंदन ऐकून रोगनिदान करीत असे. त्यासाठी तो रुग्णाच्या छातीला कान लावून हृदयाचा लब-डब हा आवाज ऐकत असे. एकदा त्याच्याकडे एक तरुण स्त्री आली. आता त्याची चांगलीच पंचाईत झाली.

      August 29, 2023


  • खगोलशास्त्रावर आधारित गैरसमजुती कोणत्या?

    खगोलशास्त्राबद्दल जनसामान्यांत अनेक समज-अपसमज प्रचलित असतात. मध्यंतरी अशी बातमी पसरली होती की मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूपच जवळ येणार असून तो पौर्णिमेच्या चंद्राइतका मोठा दिसेल. ही बातमी खोटी होती. सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरताना ठरावीक कालाने परस्परांजवळ येतात. पण जवळ आल्यावरही थोडा तेजस्वी दिसण्यापलीकडे मंगळ नुसत्या डोळ्यांना मोठा दिसत नाही. कारण तो फारच दूर आहे.

      October 20, 2023


  • शनीचा गाभा

    शनीला घन स्वरूपाचा पृष्ठभाग नाही. तरीही या संशोधनामुळे, त्याच्या गाभ्याच्या रचनेची माहिती करून घेणं, हे शक्य झालं. कारण क्रिस्टोफर मँकोविच आणि जीम फ्यूलर यांनी शनीच्या कड्यांनाच प्रचंड ‘भूलहरीमापक यंत्रा’चं स्वरूप दिलं आहे. या संशोधनातून शनीचा गाभा आगळा-वेगळा असल्याचं दिसून आलं.

      December 16, 2021


  • टी-रेक्सची ‘लोक’संख्या

    पूर्ण वाढ झालेल्या टी-रेक्सची उंची सुमारे चार मीटर आणि लांबी बारा मीटर असल्याचं, तसंच त्याचं वजन सुमारे सात टन असल्याचं, टी-रेक्सच्या अवशेषांवरून माहीत झालं होतं. त्याचबरोबर हाडांतील वर्तुळांवरून टी-रेक्सचं सरासरी वय सुमारे अठ्ठावीस वर्षं असल्याचं दिसून आलं होतं. याशिवाय टी-रेक्सच्या वाढीच्या वेगावरून त्याच्या शरीरातील अन्नाच्या चयापचयाचा वेगही पूर्वीच काढला गेला होता.

      February 10, 2022


  • पहिलं फूल

    फ्लॉरिजर्मिनिस जुरासिका ही फुलाला जन्म देणारी सर्वांत पुरातन वनस्पती ठरली आहे. भविष्यात फ्लॉरिजर्मिनिस जुरासिकापेक्षा अधिक जुन्या सपुष्प वनस्पतींचे जीवाश्म कदाचित सापडतीलही. तरीही फ्लॉरिजर्मिनिस जुरासिका या वनस्पतीचं स्थान वेगळ्या दृष्टीनं अढळ राहणार आहे.

      February 22, 2022


  • ठशांचं ‘वय’

    दोन माणसांच्या बोटांचे ठसे कधीच सारखे नसतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यात बोटांचे ठसे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र ठशांचा हा पुरावा फसवाही ठरू शकतो. कारण जर हे ठसे गुन्हा घडण्याच्या अगोदरच किंवा गुन्हा घडल्यानंतर उमटलेले असले, तर गुन्ह्याचा तपास चुकीच्या दिशेनं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे ठसे केव्हा उमटले असावेत याची माहिती मिळू शकली, तर गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या होऊ शकेल. यासाठी ठशांचं ‘वय’ शोधण्याचे प्रयत्न गेली काही वर्षं चालू आहेत; परंतु संशोधकांना यात अजून यश आलेलं नाही. मात्र नजीकच्या भविष्यकाळात हे शक्य करणारं संशोधन, अमेरिकेतल्या ‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी’ या विद्यापीठातील यंग जीन ली यांनी अलीकडेच केलं आहे. यंग जीन ली यांनी अँड्रयू पॉलसन यांच्या सहकार्यानं केलेलं हे संशोधन अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ‘सेंट्रल सायन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे. हे संशोधन म्हणजे यंग जीन ली यांनी तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या स्वतःच्या संशोधनाचा पुढचा टप्पा आहे.

    आताच्या या अभ्यासात या संशोधकांनी एकाच व्यक्तीच्या बोटांचे चौदा ठसे घेतले. त्यानंतर हे ठसे ज्या काचांवर घेतले, त्या काचा प्रयोगशाळेतच, परंतु उघड्यावर ठेवल्या. त्याचबरोबर त्यांनी प्रयोगाच्या काळातलं, प्रयोगशाळेतलं तापमान, आर्द्रता, हवेतील ओझोनचं प्रमाण, इत्यादी सर्व गोष्टींची काटेकोर नोंद ठेवली. त्यानंतर त्यांनी, या चौदा ठशांचं वेगवेगळ्या दिवशी रासायनिक विश्लेषण केलं. सुरुवातीला मोजक्या रासायनिक पदार्थांचं मिश्रण असणाऱ्या या पदार्थांना, हवेतल्या ओझोनशी झालेल्या रासायनिक क्रियांमुळे अधिकाधिक गुंतागुंतीचं स्वरूप येऊ लागल्याचं या संशोधकांना आढळलं. या ठशांतील ट्रायअसाइलग्लिसेरॉल या रसायनाचं प्रमाण सात दिवसांत, तर स्क्वॅलिन या रसायनाचं प्रमाण तीन दिवसांत लक्षणीयरीत्या कमी झालं होतं. मात्र त्याचबरोबर या रासायनिक क्रियांत तयार होणाऱ्या डेकॅनॉइक आम्लासारख्या स्निग्धाम्लांचं, तसंच इतर अनेक रसायनांचं प्रमाण वाढत गेलं होतं. ओझोनशी क्रिया होऊन नष्ट होणाऱ्या रसायनांची, तसंच या क्रियेतून निर्माण होणाऱ्या रसायनांची, त्यांच्या प्रमाणानुसार तपशीलवार माहिती या विश्लेषणातून मिळाली. यांतील कोणत्या रसायनांच्या प्रमाणात काळानुरूप होणाऱ्या बदलाचा, ठशांचं वय काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो, याचा अंदाज या संशोधकांना येऊ शकला.

    यंग जी लीन आणि अँड्रयू पॉलसन यांचे हे प्रयोग प्राथमिक स्वरूपाचे आहेत. या प्रयोगांत अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीनं यापुढचे प्रयोग केले जाणार आहेत. याशिवाय पुढचे प्रयोग हे अनेक व्यक्तींवर केले जाऊन, त्यांतून सर्वंकष स्वरूपाची माहिती गोळा केली जाईल. या माहितीच्या विश्लेषणासाठी वेगळी संगणकीय पद्धतीही विकसित केली जाईल. त्यामुळे या तंत्रातील अचूकता वाढून, गुन्ह्याच्या तपासातील अचूकताही वाढण्याची खात्री या संशोधकांना वाटते आहे. किंबहुना फक्त हे संशोधकच नव्हे तर, गुन्ह्यांचा शोध घेणारे तज्ज्ञही या तंत्राबद्दल अपेक्षा बाळगून आहेत. अमेरिकेतल्या व्हर्जिनिआ राज्याच्या न्यायवैद्यक विभागातील रसायनशास्त्रतज्ज्ञ कार्ल डेसिल यांनीही, यंग जीन ली आणि अँड्रयू पॉल यांचं हे संशोधन, गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र या तंत्राचं प्रमाणीकरण होण्यास काही वेळ लागणार आहे. विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात होत असलेली प्रगती पाहता, हा काळ फार मोठा असणार नाही हे नक्की!

    (छायाचित्र सौजन्य - byrev/Pixabay and Young Jin Lee, et al)

      February 7, 2023


  • आणखी काही प्लास्टिक

    इथिलीन ऑक्साइड व हायड्रोजन साइनाइड यांपासून अॅक्रिलोनायट्रिल बनते. त्यात स्टायरिन मिसळून स्टायनि अॅक्रिलोनायट्रिल बनवता येते. हे मिश्र प्लास्टिक पिवळसर असते. हे पूर्णपणे पारदर्शक असते.

      October 27, 2023


  • चंद्रावरचं बर्फ

    चंद्रावर पाणी अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे. यातलं काही पाणी हे विविध खनिजांतील पाण्याच्या रेणूंच्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तर काही पाणी हे बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात असलेलं पाणी हे मुख्यतः, चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील विवरांच्या तळाशी वसलेलं आहे. हे पाणी एकूण किती असावं याची निश्चित माहिती नसली तरी, बर्फाच्या स्वरूपात असलेलं हे पाणी कोट्यवधी टन असावं. चंद्रावरील विवरांच्या तळाशी जमा झालेलं हे पाणी मुख्यतः, धूमकेतू आणि अशनींच्या (लघुग्रह) माऱ्याद्वारे जमा झालं असावं. ध्रुव प्रदेशांजवळील विवरांत सूर्यकिरण अतिशय तिरके पडत असल्यामुळे, यांतील अनेक विवरांच्या तळाशी सूर्यप्रकाश पोचत नाही. त्यामुळे हे तळ पूर्ण वेळ अंधारात असतात व इथलं तापमान हे नेहमीच शून्याखाली दीडशे अंशांपेक्षा कमी असतं.

      June 5, 2022


  • हिरवं थर?

    हिरवं थर?

    भारतातील विविध ठिकाणच्या नैसर्गिक परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात एका बाजूला थरच्या वाळवंटासारखे रुक्ष प्रदेश आहेत, तर दुसऱ्या बाजूला मेघालयासारखी आत्यंतिक पावसाची राज्यं आहेत.

      September 2, 2023