(User Level: User is not logged in.)

विज्ञान / तंत्रज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डिजिटल कॅमेरा

    पूर्वीच्या कॅमेऱ्यात जशी फिल्म असायची तशी डिजिटल कॅमेऱ्यात नसते. यात प्रतिमा साठवण्यासाठी मेमरी डिव्हाइस असते. या कॅमेऱ्याचा फायदा म्हणजे रोल टाकण्याचा खर्च नसतो व हवी ती छायाचित्रे ठेवून बाकीची काढून टाकता येतात. पर्सनल डिजिटल असिस्टंट, मोबाईल फोन यांच्यात डिजिटल कॅमेरे असतात.

      August 18, 2023


  • तूप आणि त्यातील घटक

    शुद्ध तूप हा प्राणीजन्य पदार्थ आहे. यात वनस्पती तूपचा समावेश होत नाही. दूध हा नाशवंत पदार्थ आहे, पण त्यापासून बनवलेला शुद्ध तूप हा टिकाऊ पदार्थ आहे. बाजारातून आणलेल्या शुद्ध तुपाला घरच्या तुपासारखा वास नसतो. सायीसकट कोमट दुधास विरजण लावून त्याचे दही झाल्यावर ते घुसळून वर तरंगत असलेले लोणी बाजूला काढून ते कढवितात म्हणजे उष्णता देतात. योग्य उष्णता मिळाल्यानंतर लोण्यातील पाण्याचा अंश बाष्परूपात निघून जातो, वर बुडबुड्याच्या स्वरूपात दुधातील काही पदार्थ वर येतात.

      November 13, 2023


  • इलेक्ट्रॉनिक पेपर

    इलेक्ट्रॉनिक पेपर याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक इंक डिस्प्ले. आपण जसे कागदावर पेनने लिहितो तशीच अक्षरे यावर उमटतात, ती छापील शब्दांप्रमाणे कायम राहतात. पारंपरिक फ्लॅट पॅनल्समध्ये रंगबिंदू प्रकाशित करण्यासाठी वेगळे तंत्र असते.

      September 23, 2023


  • स्पीड गन

    रस्त्यांवर अनेक अपघात हे वाहनांच्या अतिवेगाने होत असतात, त्यामुळे अशा वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी खरे तर स्पीड गन लावणे हा चांगला उपाय आहे.

      October 11, 2023


  • लॅपटॉप

    लॅपटॉप याचा अर्थच मुळी मांडीवर ठेवता येईल, एवढ्या आकाराचा संगणक असा आहे. डेस्क टॉप संगणकही जास्त जागा व्यापतात व ते प्रवासात किंवा बाहेर वापरता येत नाहीत, त्यामुळे पोर्टेबल संगणकाची ही कल्पना पुढे आली.

      September 18, 2023


  • किरणोत्सर्ग

    जपानमधील फुकुशिमा येथे दाईची अणुप्रकल्पात भूकंप व सुनामीमुळे अणुभट्टीचे मेल्टडाऊन झाल्याने किरणोत्सर्ग तेथील पर्यावरणात पसरत आहे. कुठल्याही अणुऊर्जा प्रकल्पात अस्थिर अणू असलेली किरणोत्सारी समस्थानिके वापरली जात असतात. त्यातून आयनांच्या स्वरूपात जे सूक्ष्म कण बाहेर पडत असतात त्यालाच किरणोत्सर्ग (रेडिएशन) असे म्हणतात.

      October 17, 2023


  • वाढता लखलखाट

    रॉबर्ट होल्झवर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विश्लेषणानुसार, २०१० सालच्या जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत पृथ्वीवर लखलखणाऱ्या दर हजार विजांमागे दोन विजा आर्क्टिक प्रदेशात नोंदल्या जात होत्या.

      January 9, 2022


  • नीरा

    सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे निदान पुण्यासारख्या ठिकाणी तरी नीरा हे थंड पेय घेतल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. सांगून गंमत वाटेल, पण पूर्वीच्या काळात नीरा हे पेय निषिद्ध मानले जात असे. याचे कारण नीरा म्हणजे दारू असते असेच मानले जात असे. त्यामुळे काही लोक लपूनछपून नीरा पीत असत.

      November 6, 2023


  • मानवपूर्व अग्नी

    सन १९७६-७७मध्ये इस्राएलमधील, भूमध्य सागराजवळच्या एव्हरॉन क्वॉरी या उत्खनन क्षेत्रात सुमारे आठ लाख ते दहा लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन वस्तू सापडल्या. या वस्तूंत हरणं, पाणघोडे, गवे, यासारख्या दिसणाऱ्या काही तत्कालीन शाकाहारी प्राण्यांच्या कवटीचे तुकडे, दात, इत्यादी अवशेषांचा समावेश होता. तसंच त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या एका महाकाय शाकाहारी प्राण्याच्या सुळ्याचे तुकडेही तिथे सापडले. प्राण्यांच्या या अवशेषांबरोबरच तिथे गारगोटीच्या दगडापासून बनवलेल्या विविध साधनांचे तुकडे आढळले. हे तुकडे, दोन सेंटिमीटरपासून ते साडेसहा सेंटिमीटरपर्यंत वेगवेगळ्या लांबीचे होते. हे तुकडे ज्या दगडी साधनांचे होते, त्यातली काही साधनं धारदार होती, तर काही साधनं अणकुचीदार होती.

      August 13, 2022


  • बनावट चलन शोधणारे यंत्र

    आपण लहानपणी ‘येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा, पैसा ‘झाला खोटा .. पाऊस आला मोठा’ हे गाणे ऐकले होते.आता अनेकदा पैसा खोटा असल्याचा अनुभव येतो.विशेष करून ५०० व १००० या चलनाच्या नोटा तर अनेकदा खोट्या निघू शकतात.

      October 22, 2023