(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

  • श्री महालक्ष्मी मंदिर, वेणगाव, कर्जत

    कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात या देवीची ही त्रिगुण रूपे पाहावयास मिळतात. तेथे महालक्ष्मीबरोबरच महाकाली आणि महासरस्वती विराजमान आहे. देवी माहात्म्यातील पौराणिक आख्यायिकेनुसार, महालक्ष्मीनेच तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून ही दोन रूपे निर्माण केली व त्यांना आपापल्या गुणांनी योग्य असा स्त्री–पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली.

  • मंजीष्ठा

    मंजीष्ठाची अनेक फांद्या असलेली प्रसरणशील आरोहिणी वेल असते.ह्याचे काण्ड चौकोनी व गुलाबी लाल रंगाचे असते.पाने हृदयाकृती,टोकदार ५-१० सेंमी लांब व वरच्या भागात खरखरीत व मागील भाग मऊ व लव युक्त असतो.ह्याचा देठ पानांपेक्षा मोठा व दुप्पट लांब असतो.त्याच्यावर काट्यासारखे भाग असतात.चार पानांच्या चक्रातील २ पाने लहान व २ पाने मोठी असतात.फुल ०.३-२.५ सेंमी लांब मांसल गोलाकार काळे किंवा निळसर असते.

    आता आपण मंजीष्ठाचे गुण पाहुयात.हि चवीला तुरट,कडू,गोड असून उष्ण व गुरू व रूक्ष असते.हि कफ,पित्त व वातनाशक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)मंजीष्ठा कडू व तुरट तसेच रूक्ष असल्याने जखमा भरून काढते व त्यातील स्त्राव देखील कमी करते.

    २)हि कडू,तुरट,गोड चवीची व रूक्ष असल्याने रक्ताचे प्रसादन व पोषण करते व त्यात विकृत पद्धतीने वाढलेल्या तीन्ही दोषांचे शमन व शोधन करून त्वचेचा वर्ण सुधारते.

    ३)कडू,तुरट चवीने मंजीष्ठा मांस व रक्तातील क्लेद,पित्त व विषाचे शोधन व शमन करते व त्वचारोग नष्ट करते.

    ४)उष्ण गुणाने मंजीष्ठा गर्भाशय उत्तेजक व शोधक कार्य करते म्हणून मासिक पाळीच्या तक्रारीत ती उपयुक्त आहे.

    ५)अतिसारामध्ये मंजीष्ठा चुर्ण व लोध्र चुर्ण एकत्र मधासोबत देतात.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • कलाकार

    त्या भर उन्हात कर्जतच्या बाजारपेठेनं एका अस्सल कलावंताचा अभूतपूर्व असा उत्स्फूर्त आविष्कार पाहिला. त्या कलावंताला नव्हतं भान बाजारपेठेचं, तिथल्या गर्दीचं, नव्हतं भान कशाचं! तो नव्हता यशवंत दत्त, तर त्या क्षणी तो होता – अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट!

  • वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना

    त्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं कसब अलौकिक आहे. खरा स्नेह हा माझ्या रविकाकाचा आणि परवीनजींचा व दिलशाद खांसाहेबांचा. त्या बळावर माझी व दीदींची भेट झाली. काही भेटींतच त्या माझ्यावर मुलासारखं प्रेम करू लागल्या. पाडवा असो, गणपती असो, दसरा किंवा दिवाळी असो वा नववर्ष दिवस असो, मी एक वेळ आळशीपणा करेन, पण सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईलवर दीदींचा शुभेच्छा संदेश असतो.

  • सुभाषित रत्नांनी – भाग ५

    या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात.

  • ‘बूमरँग’ अशनी!

    अशनी म्हणजे अंतराळात फिरणारे दगड-धोंडे. या अशनींपैकी काही अशनी पृथ्वीवर पोचतात. यांतील छोट्या आकाराचे अशनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोचण्यापूर्वीच जळून नष्ट होत असले, तरी मोठ्या आकाराचे अशनी हे मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचू शकतात. असे अशनी जर वाळवंटासारख्या फिकट रंगाच्या प्रदेशात पडले, तर त्यांचे तुकडे या वाळवंटी प्रदेशात काहीसे सहजपणे सापडू शकतात.

  • सुभाषित रत्नांनी – भाग ३

    या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात.

  • मराठी आडनाव – शब्दी-महाशब्दी

    आडनावांच्या गमतीजमतींनी मराठी लेखकांना अतकी भुरळ पाडली आहे की, दोनतीन महिन्यात, कोणत्यातरी प्रसारमाध्यमात, कुणीतरी अेखादा लेख लिहीलेला आढळतो. त्यावरून असे लक्षात येते की ह्या गमती जमतींचे गमतीदार वर्गीकरणदेखील करता येते. प्रसंगांशी सुसंगत किवा विसंगत आडनावे असली म्हणजे काही किस्से निर्माण होतात.

  • ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

    मंडळी , माझं माहेर आमची मुंबई शहरातलं एक छानसं सुंदरसं टुमदार उपनगर : गोरेगांव ( पूर्व ).तिथल्या रेल्वे फाटकाजवळ गोगटे वाडीमधे आमची एक छान शाळा आहे , शिशूवर्ग ते इयत्ता चौथी — बैराम जीजीभाॅय शाळा आणि इयत्ता पाचवी ते दहावी सन्मित्र मंडळ विद्यामंदिर ! इसवी सन १९८० ला आम्ही जवळपास १२० विद्यार्थी वर्गमित्र—मैत्रिणी ( दोन तुकड्या मिळून ) १० वी परिक्षेला म्हणजे शालान्त परिक्षेला बसलो आणि आता यावर्षी म्हणजे २०२५ सालामधे तेंव्हा ( कमीत कमी ) १५ वर्षांचे असलेले सगळे साठी चे झालो किंवा यावर्षी होऊ ! त्यामुळे यावर्षी एक संमेलन करूया अशी एक टूम वर्गातील मित्र—मैत्रिणींच्या मनात आली , आणि महाराजा , त्याच संकल्पनेचा पाठपुरावा करत काल ती संकल्पना आम्ही २८ जणांनी प्रत्यक्षात उतरवली ना ! अंधेरीच्या चकाला येथील हाॅटेल साई पॅलेसमधे आम्ही सगळे एकत्र जमलो आणि रंगतदार संध्याकाळ सुरु झाली…..

  • कानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

    कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.

    आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो.

    तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला - दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.

    पथ्यपाणी विचार –

    ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.

    सोपा घरगुती उपचार –

    हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.

    कानाचे यंत्र –

    कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे. कान यंत्र घेण्यापूर्वी हा कान मंत्र समजून घेतला तर इंद्रियाची जपणूक होईल.

    डॉ. संतोष जळूकर
    संचालक, अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
    दूरध्वनी - +917208777773
    ईमेल – drjalukar@akshaypharma.com