(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • घरातली नळगळती थांबवा

    नळ का गळतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी नळ कसा काम करतो हे समजून घ्यायला लागेल. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सहसा फिरकीचा नळ गळतो. जिथून पाणी बाहेर येते ती तोटी आणि तोटीपर्यंत पाणी आणून सोडणारा वरच्या टाकीला जोडलेला पाईप, यांच्यामध्ये नळ बसवलेला असतो.

      May 11, 2023


  • टाटाचे कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण

    १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांच्या विमानाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल उड्डाण केले.

    एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस या नावाने झाली होती, भारतीय व्यावसायिक जे आर डी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटा यांनी इंपिरियल एअरवेज साठी मेल घेऊन जाण्याचा करार मिळवला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला.

    १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Neville Vincent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रास दरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने २,६०,००० किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा मिळवला.

    टाटा एअर सर्व्हिसेसने मुंबईहून त्रिवेंद्रमला सहा आसनी माईल मर्लिनसह आपले पहिले घरगुती उड्डाण सुरू केले. १९३८ मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स असे करण्यात आले. १९३८ मध्ये कोलंबो आणि दिल्ली जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एअरलाईनने रॉयल एअर फोर्सला त्यांच्या सैन्याच्या हालचाली, पुरवठा वाहून नेणे, निर्वासितांची सुटका करणे आणि विमानांची देखभाल करण्यास मदत केली.

    भारत सरकारने १९५३ मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा पास करून आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली.कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले. जे आर डी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले.

    २१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने ताफ्यात आपले पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले. या विमान कंपनीने १४ मे १९६० रोजी मुंबई न्यूयॉर्क सेवा सुरू केली. ८ जून १९६२ मध्ये एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले. २००० मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली.

    २३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली. नुकतीच एअर इंडिया परत टाटांच्या कडे आली आहे.

      October 15, 2021


  • सदाबहार चित्रपट ‘पडोसन’ची पन्नास वर्षे

    काही विनोदी सिनेमे असतात असे जे आज ही आपणास मनमुराद आंनद देतात आपल्या कुटुंबियां सोबत ‘पड़ोसन ‘हा सिनेमा बघण्याची आज ही मज्जा काही आगळीच असते. अगदी हसवत ठेवणारा सिनेमा..

      January 30, 2019


  • मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्यात आले

    आजच्याच दिवशी १९६१ मध्ये मद्रास राज्याचे नाव बदलून  तामिळनाडू असे करण्यात आले आहे.मद्रास हे नाव इंग्राजामुळे भारतात रुजले होते.

      March 1, 2024


  • किशोर मासिकाची पन्नास वर्ष

    किशोर मासिकाची पन्नास वर्ष

    महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामार्फत ‘किशोर’ची निर्मिती झाली, ती मूळ संकल्पना होती, तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांची.

      November 14, 2021


  • उद्या पासून होणार ‘धनुर्मासारंभ’

    उद्या पासून होणार ‘धनुर्मासारंभ’

    सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे ०४ ते ०६ या ब्रम्हमुहूर्तात उठून स्नान करून देवाची पूजाअर्चा, आराधना, भजन अशी आपापल्या परीने भक्ती करतात. या मासात विशेषकरून भगवान विष्णूची व श्रीकृष्णाची आराधना करतात. तसेच वसुंधरेला व चराचराला जीवन व आरोग्य प्रदान करणारी प्रत्यक्ष देवता सूर्याची आराधना केली जाते. या आरतीला काकड आरती असे म्हणतात.

      December 20, 2021


  • राज्य नाट्यस्पर्धेत घाशीराम कोतवाल नाटकाचा पहिला प्रयोग

    विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं.

      December 16, 2021


  • जागतिक कोकणी भाषा दिन

    कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क ‘कोकणी लोक’ असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात ‘गौड’ शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही!

      April 9, 2022


  • “मालाड पश्चिमेचा सोमवार बाजार”

    मुंबईत व उपनगरांमध्ये दर दिवशी कुठे ना कुठे बाजार भरण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे, म्हणून मुंबई सात बेटांची असल्यापासून अर्थात त्याकाळी त्याचा आवाका निम्मा असेल पण तो त्या काळानुसार व तिथल्या वस्तीनुसार असायचा आज तर देशाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरांमध्ये अनेक बाजार भरतात, यामध्ये खाद्यपदार्थांपासून, टाचणी व राई असे सर्व वस्तू उपलब्ध असतात.

      September 2, 2013


  • सोंगाड्या’ चित्रपट प्रदर्शित झाला

    हा चित्रपट सर्वप्रथम पुणे शहरात भानुविलास थिएटरमध्ये रिलीज झाला आणि पहिल्याच शोपासून सुपर हिट ठरला. तेव्हा पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरात एकूण पाच प्रिन्टने हा चित्रपट रिलीज झाला होता.

      March 12, 2022