Articles by aditya deshpande
आभाळाएवढा !
Category:
साहित्य - ललितत्यानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि तो एकदम मोठा होऊन गेला . मोठा म्हणजे अगदी खूपच मोठा . आभाळा एवढ्या उंचीचा आणि समुद्रएवढ्या खोलीचा . अर्थात उंची होतीच पहिल्यापासून पण कुणाला दिसली नव्हती . अर्थात चिरपरिचित असल्यानं ती कुणाला जाणवली नव्हती .
खोटारडी आई! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १४
Category:
कथा साहित्य - ललितजगदीशची आई म्हणजे नंबर एकची खोटारडी बाई होती. अशी खोटारडी ‘आई’ जगाच्या पाठीवर नसेल, हे माझे नाही तर, जगदीशचेच म्हणणे आहे! आयुष्यभर (अर्थात तिच्या) ती आपल्या लाडक्या जगूला खोटंच बोलत आली म्हणे!
।। दिठी ।।
Category:
साहित्य - ललितपहाटेपासून विधिवत पंचामृती पूजा चालली होती. मांगलिक स्नानानंतर भाळावर चंदनलेपाची विशिष्ट मुद्रा आरेखित झाली होती. वस्त्रप्रावरणांनी देहाला आलंकृत करणं सुरु होतं. तुळशीचे प्रचंड हार गळ्यात घातल्यानंतर गुरुजींनी प्रथेनुसार दर्पण समोर धरला. आणि विठुराया पाहात राहिला.
आईची ‘भेट’! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ६
Category:
कथा साहित्य - ललितकधी कश्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल माहित नसते. तशी फारसी श्रीमंती नव्हती. पण खाऊन पिऊन तिचे कुटुंब सुखी होते. प्रेमळ नवरा, गोंडस मुलगा, समाधान घरात नांदत होत. आणि तो ‘काळा दिवस’ उगवला. क्षुल्लक आजाराचे कारण होऊन नवरा तिला आणि मुलाला अनाथ करून गेला. आभाळ कोसळ तिच्या डोक्यावर.
या वर्षीच्या दिवाळीत…
Category:
साहित्य - ललित“कैक चॅनलवाले रोज इथं येत आहेत. आमच्यातल्या कुणाला तरी धरून, रडायला भाग पाडून शूटिंग करताहेत. बाईट घेताहेत आणि न्यूज चॅनलवर दाखवून टीआरपी वाढवत आहेत. आमचा बाजार मांडलाय तुम्ही.”
गावकरी संतापले. तो बावरला.
पानगळीचे दिवस (कथा – सांगोपांग : ४)
Category:
साहित्य - ललिततसं पाहायला गेलं तर ही कथा एका चौकोनी कुटुंबाची , उपनगरातील एखाद्या ब्लॉकमध्ये घडणारी आहे. पण मांडणी करताना त्या फ्रेममध्ये दरवेळी बाह्य जगातील संदर्भ येत जातात आणि मग ती कथा एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता अनेकांची होऊन जाते. निष्पर्ण वृक्षाबद्दलचं प्रेम , आपुलकी मनात उगवत जाते आणि पानगळीचे दिवस सुसह्य होऊन जातात.
प्रश्नोपनिषद (कथा – सांगोपांग : ३)
Category:
साहित्य - ललितआजूबाजूला बळी पडणारी नवीन पिढी दिसत होती. मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था नोकरीच्या आशेनं कर्जबाजारी होताना आणि नंतर उद्ध्वस्त होताना दिसत होती. सगळं वास्तव त्या प्रश्नोपनिषदातून मनाला हलवून टाकत होतं. त्यामुळं कथेला शीर्षक सुचलं होतं . प्रश्नोपनिषद
ड्रॉवर (कथा – सांगोपांग : १)
Category:
साहित्य - ललितकथा लिहिताना फ्लॅशबॅक तंत्राचा , वर्तमानातल्या भानाचा , छोट्या छोट्या प्रसंगांचा , आशयघन संवादाचा उपयोग केल्याने कथेला वेगळी गती प्राप्त झाली . कथेतील किचन , आरसा , बस ही सगळी पात्रं म्हणून अवतरली . १९९९ मधली कथा असली तरी आत्ताच्या गतिमान युगातील जोडप्यांची व्यथा मांडणारी कथा म्हणून आजही ती तितकीच वाचनीय वाटते . आजही ड्रॉवर उघडला की ड्रॉवर ची निर्मिती प्रक्रिया आठवते.
कथा – सांगोपांग
Category:
साहित्य - ललितवाटलं , आपण आपल्याच काही निवडक कथांकडे अलिप्तपणे पाहिलं तर … त्या कथांचा सांगोपांग विचार केला तर… लेखन करताना , कथा प्रसिद्ध झाल्यावर , त्यावर वाचकांचा प्रतिसाद लाभल्यावर जसा आनंद मिळत होता , तसा आता इतक्या वर्षांनी , जरा वेगळ्या पद्धतीने कथांकडे पाहिल्यावर आनंद मिळू शकतो. तोच हा प्रयत्न आहे. कथा सांगोपांग !