अनुभूती अक्कलकोट
Category:
Affiliates
Category:
Affiliates
Category:
Affiliates
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकृष्ण चरित्रामधील एक प्रसंग आहे. इंद्र गोकुळावर कोपला. गोकुळावर त्याने विजांचा कडकडाट केला आणि मुसळधार पाऊस पाडून सगळ्या गावकऱ्यांना संकटात आणलं. घरे, शेती, गाई-गुरे बुडू लागली. गावकरी हतबल झाले. सगळे कृष्णाकडे गेले. कृष्ण अशावेळी घाबरायला हवा होता. पण कृष्णच तो…तो तर बासरी वाजवत बसला होता. त्याच्या आसपास गावकरी जमा झाले तेव्हा कृष्णाने बासरी खाली केली आणि ते काही बोलण्याआधीच कोसळणाऱ्या मुसळधार पावसावर मी उपाय सांगतो असे आश्वासन दिले. मी युक्ती करतो असा धीर दिला.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
एक बाप मुलाला म्हणाला, ” आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनजॉर्ज बर्नार्ड शॉ ह्यांचं हे वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे भारतात होणारे बलात्कार. कोलकात्यात जो बलात्कार झाला त्यातील आरोपीने कबूल केले आहे की बलात्कार करण्याआधी त्याने पॉर्न क्लिप पाहिली होती. अशा क्लिप अगदी शाळकरी वयातील मुलेही फक्त एक क्लिक करून पाहू शकतात. सिनेमांना जसं सेन्सॉर बोर्ड असतं तसं पॉर्नला नसतं. अशा फिल्म्सवर भारत सरकारचं नियंत्रण नाही. कारण ह्यातील बहुतांश क्लिप विदेशात तयार होतात आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जातात. ह्या फिल्म प्रौढ व्यक्तींपुरत्या मर्यादित नाही. त्या कोणीही पाहू शकते. अशा फिल्म पाहिल्याने शरीरात बदल होतात आणि तात्काळ लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होते. थोडक्यात, अशा क्लिप्स म्हणजे बलात्काऱ्यांची शाळा आहे.
लैंगिक शिक्षणाचा अभाव:
Category:
कथा साहित्य - ललित“धिक् तं च, तां च, इमां च मदनं च मां च” समोरची व्यक्ती जे सांगत होती, ते ऐकून यशवंताना हा जुना संस्कृत श्लोक आठवत होता. संपूर्ण श्लोक असा आहे, “यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता साप्यन्यं इच्छति जनं स जनोऽन्यसक्तः । अस्मत्कृते च परिशुष्यति काचिद् अन्या धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥” ह्याचा अर्थ – राजा म्हणतो, मी जिचा (पिंगलाचा) सतत विचार करतो, तिला माझ्यांत रस नाही, तिला दुसराच कुणी (अश्वपाल) आवडतो, ज्याला तिसरीच (राजनर्तिका) आवडते आणि त्या तिसरीला (राजनर्तिकेला) दुसराच कुणी म्हणजे मीच आवडतो. तिचा, त्याचा, मदनाचा, हीचा आणि माझाही धिक्कार असो. त्यांच्यासमोर एक श्रीमंत व्यक्ती बसलेली आहे. तिचं नांव आहे. राजकुमार मोकाशी. राजकुमार एका खाजगी कंपनीचे अध्यक्ष व मालक आहेत. त्यांचा व त्यांची पत्नी अस्मिता हीचा पंधरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे. त्यांच तिच्यावर आजही तेवढचं प्रेम आहे. दुर्दैवाने अस्मिताचं मात्र आता एका कलाकाराने मन जिंकलं आहे. त्याचं नांव आहे राघव ठाकूर. अस्मिताने राजकुमारपासून हे लपवलेलं नाही. तिने सरळ त्याला सांगून टाकले आहे. मात्र त्या राघवसाठी अस्मिता ही अनेकींपैकी एक आहे, हे सत्य अस्मिताला समजतं नव्हतं. यशवंत शांतपणे राजकुमार मोकाशीची प्रेमकथा ऐकून घेत होते. ह्या प्रेमप्रकरणांत आपला सल्ला घ्यायला कांही हा राजकुमार आलेला नाही, हे त्यांना ठाऊक होतं.
Category:
कथा साहित्य - ललितराजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. स्पर्धा आली. पक्षांतर्गत सत्ता, शासन करण्यासाठी सत्ता ह्यांत ते सर्व गुंततात. राजकारण करणाऱ्या माणसांत अनेक पातळ्यांवर स्पर्धा असते. कधी कधी ही इतकी तीव्र होते की दोन राजकारणी एकमेकांच्या जीवावर उठतात किंवा दोघांतील एक जण तरी दुसऱ्याचा इतका द्वेष करू लागतो की तो दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार करू लागतो. अर्थात उघडपणे तो हे दाखवेल तर तो कसला राजकारणी. बाहेर तो खूप मैत्री दाखवू शकतो पण त्याच वेळी वैऱ्याच्या खूनाचा बेत मनांत रचत असतो. कधीतरी तो आपला बेत पार पाडण्यात यशस्वी होतो. राजकारणी नेत्याला इतरही विरोधक असतात, जे राजकारणांत असतातच असं नाही. त्यांच्यापैकीही एखादा असाच बेत रचून त्याला मारू शकतो. असे अनेक पदर असलेला हा गुन्हा प्रत्यक्षात घडला होता. एकेकाळी स्थानिक नगरपालिकेचा अध्यक्ष असणाऱ्या एका राजकारणी व्यक्तींचा खून झाला होता आणि दीड महिना होऊन गेला तरी पोलिसांना कांही धागा मिळत नव्हता म्हणून हे प्रकरण घेऊन इनस्पेक्टर हिरवे यशवंताकडे आले होते.
Category:
कथा साहित्य - ललितमुंबईतील रेल्वे मार्गावर अनेक छोटे मोठे पूल आहेत.
दहा फूट ते पंधरा फूट लांबीचे रूळ पुलावरून जातात.
लोकल भराभर एकामागे एक अशा येत असल्यामुळे कधी कधी दोन गाड्या बाजूबाजूच्या रूळावरून जात येत असतात.
भारतात वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे गट घातपात करायचा प्रयत्न करतात.
कोणी धर्मावरून, कोणी सामाजिक क्रांती घडविण्यासाठी तर कोणी फक्त गोंधळ वाढवून सत्तारूढ सरकारला आव्हान म्हणूनही घातपात करण्याकडे वळतात.
सामान्य जनता म्हणते की ह्यांत बळी जातात सामान्यांचेच तर हे असं कां करतात ?
एकदा कां एक मार्ग स्वीकारला की अनेकांच्या अंगात तो अभिनिवेश भिनतो.
Category:
कथा साहित्य - ललितचांदणी चौकातल्या हॉरीबल ट्रॅफिकमध्ये प्रचंड बेफिकिरीने निंजा घुसवत तो माझ्या बाजूला केव्हा आला ते कळलच नाही .
ना हेल्मेट . ना ट्रॅफिक जॅमचं टेन्शन .
ना ट्रॅफिक हवालदाराची भीती . चेहऱ्यावर जस्ट बेफिकिरी …
मी पहात राहिले .
तो माझ्या जुन्या गाडीकडे भयंकर नजरेनं पहात होता .
” या नंबरवर मेसेज टाक , उद्या तुला सोडायला येतो आयटी पार्क मध्ये .”
त्यानं त्याचा नंबर त्याच्याच रुमालावर लिहून माझ्या अंगावर फेकला .आणि न बघता स्पिडमध्ये निघून सुध्दा गेला .
मी रुमाल हाती घेतला आणि नकळत तो हुंगला .
कुठल्या तरी उंची सिगारचा वास येत होता .
ट्रॅफिक सरकेल तशी मी हळूहळू पुढं होत होते .
मात्र डोक्यात ‘ तो ‘ होता .
Category:
कथा साहित्य - ललितआंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त लिहिलेली, कोरोना काळातील माझी एक कथा.
Copyright © 2025 | Marathisrushti