श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन – गिरनार
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
July 4, 2025
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
July 4, 2025
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
July 4, 2025
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसृजन प्रकाशन तर्फे नामदेव माळी यांनी सुद्धा बरीच पुस्तके लहान मुलांची प्रकाशित केली आहेत. ज्यांना रस्ता शोधायचा असतो त्यांना पायवाट आपोआप मिळतें. असंख्य पायवाटा आपल्या अवतीभवती असतात, फक्त शोधक दृष्टी हवी व एक होती तरी पाऊल पुढे टाकण्याची इच्छाशक्ती हवी.
July 3, 2025
Category:
लेखसंग्रह
July 3, 2025


Category:
लेखसंग्रहमराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. मराठी पत्रकारितेची ही थोर परंपरा पुढे लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निळकंठ खाडिलकर, ह. रा. महाजनी, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, माधवराव गडकरी, कुमार केतकर यांनी पुढे सुरू ठेवली. या पवित्र व्यवसायाचा धंदा न करता एका समर्पित भावनेने सुरू असलेली पत्रकारिता आता तशी उरली आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माझी पत्रकारिता तब्बल ३६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बँक ऑफ इंडियाची नोकरी सांभाळीत प्रथम दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ आणि नंतर दैनिक लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी यांचे मला भरभरून आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. लोकसत्ताचे तत्कालिन सहसंपादक चंद्रशेखर वाघ हे ऋषितुल्य पत्रकार माझे पत्रकारितेतील गुरु ! हाताने लिहिलेल्या बातम्यांचे कागद रोज सकाळी त्यांच्या घरी नेऊन द्यायचे आणि नंतर बँकेत कामावर हजर व्हायचे असा रोजचा दिनक्रम होता. लिहिलेल्या बातम्या, वृत्तांत ते वाचून काढायचे आणि मला समोर बसवून त्यातील चुका आणि अनावश्यक शब्द काढून टाकायचे. त्यातूनच पुढे पत्रकारितेचा प्रवास उलगडत गेला आणि गैरव्यवहार, भ्रष्टाचार अशा अनेक कुप्रथांवर कोणाचीही भिडभाड न बाळगता बिनधास्तपणे उजेडात आणायचे नैतिक बळ मिळत गेले.
July 3, 2025
Category:
लेखसंग्रहभारतामध्ये व्यंगचित्र कलेची फार मोठी परंपरा आहे. १०० वर्षांहून अधिक काळ आपल्या देशात वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रे, हास्यचित्रे प्रकाशित होत आहेत. पारतंत्र्याच्या काळात राजकीय विषय व समाज प्रबोधन यासाठी ह्या माध्यमाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. मात्र त्या काळात छपाईचे तंत्र फारसे प्रगत नव्हते. प्रत्येक चित्राचा वेगळा ठसा (ब्लॉक) बनवून छपाई केली जात असे. एकदा व्यंगचित्र प्रकाशित झाल्यावर त्या ब्लॉक/ ठोकळ्याचा काहीही उपयोग होत नसे म्हणून छोट्या दैनिकांना/ छोट्या मासिकांना व्यंगचित्र छपाईचा खर्च करणे परवडत नसे. त्यामुळे देशात व महाराष्ट्रात फारच कमी व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्र रेखाटणे हा पूर्ण वेळेचा, पोटापाण्याचा व्यवसाय नसल्याने व्यावसायिक चित्रकारच कधीतरी गरजेप्रमाणे व्यंगचित्रे रेखाटून देत असत. फारच मोठ्या दैनिकांकडे/ प्रकाशन संस्थांकडे निवडक व्यंगचित्रकार नेमण्याची ऐपत असे.
July 3, 2025

Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.
आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.
July 3, 2025
Category:
लेखसंग्रह
July 3, 2025
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखननवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे नऊ दिवस घालायचे आणि फोटो काढून पाठवायचे. एक मजेचा भाग म्हणून छान वाटतं. पण ही काही परंपरा / धार्मिक रीत आहे का? अजिबात नाही. फेसबुक आणि सोशल मीडियाच्या काळाआधी म. टा. / लोकसत्तेच्या पुरवणी मधून नवरात्रीचे नऊ रंग छापून येऊ लागले. त्याबरोबर वेगवेगळ्या ऑफिसेस मधले ग्रुपफोटो छापायला लागले. प्रसिद्धी मिळाल्याने अजूनच हे प्रस्थ पसरत गेले.
मन सहाजिकच भूतकाळात गेले. आई आजी कडे होत्या का एवढ्या साड्या आणि त्या ठेवायला मोठे वॉर्डरोब. घरात एक दोन कपाटं, त्यातले १-२ कप्पे मिळायचे. त्यात ५-६ नेहेमीचे कपडे,२-४ ठेवणीतले. त्यात नऊ रंगाचे कपडे मिळणं केवळ अशक्य. नवरात्रीतला भोंडला, सोसायटी/गल्लीतला रोजच्या कपड्यातला गरबा, अष्टमीला देवीचे दर्शन ह्या कशालाच पैसे लागत नसतं पण आनंद, भक्तीभाव, उत्साह हमखास असे.
July 3, 2025
Category:
लेखसंग्रहकाल परवाचीच गोष्ट एकजण एका जुन्या मित्राशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना तो म्हणाला मला अमुक तमुक अँप वर फोटो टाकता येत नाही. काहीतरी शोधण्यासाठी त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला , पण ते अँप मी ओपन करताच घाई घाई ने त्याने माझ्या हातून मोबाईल घेतला.
हे तुमच्याही बाबतीत किंवा घरात घडले असेल, अगदी नवरा बायको ह्यांच्या बाबतीत देखील.. माझ्या फोन ला हात का लावला वगैरे. मी तर माझा फोन कधीच लॉक करत नाही पासवर्ड ने.
साला आपली जिंदगी तो खुली किताब हैं.
बायको मात्र नेहमी ह्या न त्या कारणाने माझा फोन घेते, तिचा फोन मात्र लॉक असतो , मला तिने अनेक वेळेला तिचा पासवर्ड सांगितला पण तो मी विसरतो म्हणा लक्षात ठेवायची गरज भासत नाही.
July 3, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti