Year: 2023
जमिनीखालची ‘जीपीएस’!
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम’ – जीपीएस – ही आजच्या काळातली आघाडीवरची स्थानदर्शक पद्धत आहे. एखाद्या माणसाचं वा वाहनाचं स्थान निश्चित करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत प्रथम, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहाद्वारे रेडिओ लहरी सोडल्या जातात.
जनुकीय संरक्षण!
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिककाही प्राणी उष्ण रक्ताचे असतात, तर काही प्राणी थंड रक्ताचे असतात. उष्ण रक्ताचे प्राणी आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करू शकतात. त्यामुळे उष्ण रक्ताचे प्राणी तापमानातील बदलांना अधिक समर्थपणे तोंड देऊ शकतात. थंड रक्ताच्या प्राण्यांना मात्र शरीराचं तापमान नियंत्रित करता येत नसल्यानं, या थंड रक्ताच्या प्राण्यांची बदलत्या तापमानाला तोंड देण्याची क्षमता मर्यादित असते.
अनावश्यक भागांच्या मालिका..
Category:
लेखसंग्रहआजकाल संस्काराची लक्ष्मणरषा सगळेच पाळत नाहीत. संस्कार करणारी माणसे जरी कमी झाली तरी चित्रपट, वाहिन्यांची ही जबाबदारी ठरतें की त्यांनी त्या माध्यमातून संस्कार करावेत. पूर्वीच्या चित्रपटांनी आम्हाला हसविले, आम्हाला रडविले त्यातून सामाजिक आशय दिला, करमणूक, वैचारिक प्रबोधन केलं ते आज कुठे गेल? विषय आणि आशय नसलेल्या माध्यमातून विषयांची सध्या चलती आहे. कुटुंबासमवेत आज काही पाहताच येत नाही. कुटुंबाकडे, प्रत्येकाच्या समस्ये कडे ही आज पाहता येत नाहीं.जो तो आपल्यात मग्न आहे.
फुलपाखरांचं मूळ
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकफुलपाखरं ही पृथ्वीवरच्या विविध ठिकाणच्या परिसंस्थांतील अत्यंत उपयुक्त घटक आहेत. वनस्पतींच्या प्रजोत्पादन क्रियेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. फुलांतील मकरंदाचं सेवन करताना, फुलपाखरं ही या फुलांचं परागीभवन घडवून आणतात. या परागीभवनाद्वारे वनस्पतींच्या पुढच्या पिढीच्या निर्मितीचा पहिला टप्पा गाठला जातो. त्यामुळे, वनस्पतिसृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्राणिसृष्टीतील घटकांचा जन्म केव्हा व कुठे झाला असावा, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरतं.
अल्पायुषी कडी
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकशनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत.
हिमनद्यांचा इतिहास
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकपृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे.
तू महाभारती थंड झुळुक वाऱ्याची
Category:
साहित्य - ललितगर्दीचा महासागर उसळला होता. लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या. गर्दी बेभान होती. गर्दी दिशाहीन होत होती. गर्दी पुढं सरकण्याचा प्रयत्न करीत होती. पण कुणाचंही पाऊल पुढं पडत नव्हतं.
सुभाषित रत्नांनी – भाग ५
Category:
लेखसंग्रहया प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात.