नाटककार जॉर्ज कॉफ्मन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्याने राजकीय प्रहसनं लिहिली, विनोदी नाटकं लिहिली आणि काही संगीतिकाही लिहिल्या. नील सायमन वगळता इतर कोणत्याही विनोदी अमेरिकन नाटककाराला त्याच्याइतकी लोकप्रियता लाभली नव्हती. दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा तो लेखक-दिग्दर्शक होता. त्याने बहुतेक वेळा सहकाऱ्यांच्या साथीने तब्बल ४५ नाटकं लिहिली आणि बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरली. त्याच्या नाटकांमधल्या योगदानाबद्दल त्याला दोन वेळा पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं. दी मॅन हू केम टू डिनर, यू कान्ट टेक इट विथ यू, मेरीली वुई रोल अलाँग, दी बटर अँड एग मॅन, डल्सी, स्टेज डोअर, ऑफ दी आय सिंग, दी कोकोनट्स, डिनर ॲट एट, असं त्याचं लेखन तुफान लोकप्रिय झालं होतं.