No Picture
कथा

बेटा-बेटांचं मुंबई बेट (कथा)

Category:

 

पूर्वी कधीतरी मुंबई सात बेटांची असेल. आज ती बेटं एकमेकांना सांधण्यात आली आहेत. मात्र आज मुंबई नावाच्या शहरात अनेक छोटी-मोठी बेटं तयार झाली आहेत. इथं राहणारा प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेटच आहे.

No Picture
लेखसंग्रह

एडटेक कंपन्यांचे शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

Category:

 

संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक  व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत. शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे.

No Picture
कथा

चलबिचल निवारक (संक्षिप्त रूपांतरीत कथा १२)

Category:

 

त्या क्रूर राजाच्या रिंगण-मैदानांत ‘सुंदरी की वाघ’ या नांवाने ओळखली जाणारी घटना घडली त्याला एक वर्ष होऊन गेलं होतं. अशा वेळी एका दूरच्या देशांतून पाच जणांचं एक शिष्टमंडळ राजाच्या महाली आलं.
ह्या विद्वान आणि आदरणीय मंडळींचे राजाच्या एका महत्त्वाच्या अधिका-याने स्वागत केलं व त्यांनी त्याला आपल्या तिथे येण्याचा उद्देश सांगितला.

No Picture
कथा

चेहरे (कथा)

Category:

 

या चेहऱ्यांच्या सतत हेलकावणाऱ्या लाटेत गुदमरुन आपला चेहराही आपल्या लक्षात राहत नाही. गर्दीत भान हरवलेला चेहरा आपलं साम्य इतर चेहऱ्यात कुणी जिवाभावाचा माणूस भेटतो का पाहत असतो कारण इथं कुणाला कुणासाठी वेळ असतो ?

No Picture
कथा

सुंदर अभिव्यक्तीचा संगम – ‘गेटवे’

Category:

 

“गेटवे” पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभातील प्रमुख पाहुणे कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या भाषणातील निवडक मुद्दे.

No Picture
कथा

सुंदरी की वाघ? (संक्षिप्त आणि रूपांतरीत कथा ११)

Category:

 

फ्रँक स्टॉकटन हा खास करून मुलांचे वाडमय लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता. त्याची ही गोष्ट इंग्रजी वाडमयात अतिशय लोकप्रिय आहे. कारण ती एक सुंदर रूपक कथा आहे. त्यात दैव आणि स्वेच्छा (Determinism versus Free Will) यांचा सनातन झगडा दाखवला आहे. राजा त्याला आरोपी करून त्याची व राजकन्येची स्वेच्छा हिरावून घेतो. परंतु राजकन्या गुपित जाणून घेऊन पुन्हा आपल्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकते. तसाच जंगलीपणा आणि सुधारणावाद यांतील द्वंद्वही दाखवले आहे.

No Picture
कथा

गेटवे – मनोगत

Category:

 

ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री प्रकाश बाळ जोशी यांचे गेटवे हे पुस्तक म्हणजे शहरी जीवनावर मार्मिक टिपणी करणाऱ्या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा संग्रह आहे. या पुस्तकातील कथा आता मराठीसृष्टीवर क्रमश: प्रकाशित करत आहोत.

No Picture
कथा

ख्रिस्मसचे गीत (संक्षिप्त रूपांतरीत कथा १०)

Category:

 

चार्लस डीकन्स हा व्हीक्टोरीयन काळांतील सर्वांत सुप्रसिध्द लेखक. त्याचे लिखाण आजही वाचले जाते. आजही शालेय/महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्याच्या वाङमयाचा समावेश असतोच. त्याला स्वतःला मात्र जास्त शिक्षण घेतां आलं नव्हतं. त्याच्या अनेक कादंबऱ्या, कथा आणि एखाद-दोन नाटके प्रसिध्द झाली. त्याचे बरेच लिखाण प्रथम साप्ताहिक किंवा इतर नियतकालिकांमधून मालिका स्वरूपांत प्रसिध्द झालं. सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून तो गाजला. अनेक कृतींचे चित्रपटांत रूपांतर झाले. पिकवीक पेपर्स, टेल आॕफ टू सिटीज, डेव्हिड कॉपरफील्ड, आॕलीव्हर ट्वीस्ट, ग्रेट एक्स्पेक्टेशन्स आणि वरील कादंबरी ख्रिसमस कॕरोल ह्या कांही त्याच्या प्रसिध्द साहित्यकृती. ख्रिसमस कॕरोल ही कादंबरी सर्वांत प्रसिध्द कृती म्हणावी लागेल. त्यांत स्क्रूजच्या माध्यमातून दिलेला संदेश फारच महत्त्वाचा आहे. कादंबरी अर्थातच मोठी आहे. परंतु ख्रिसमस आलेला असल्यामुळे ती कथेच्या स्वरूपांत मी आपल्यापुढे सादर केली आहे.

No Picture
कथा

गोमुची पार्टी (गोमुच्या गोष्टी – क्रमांक १८)

Category:

 

गोमुला दोन महिने हॉटेलचं काम चालू असतांना आणि नंतरच्या एक महिन्याचा पगार व नफ्याचा भाग मिळाला. आजवर गोमु आम्हां सर्व मित्रांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून पार्टी द्यायला लावत असे.