No Picture
साहित्य - ललित

त्या’ व्हिडिओतील ‘तो’ मला भेटला… त्याची गोष्ट !

Category:

 

सध्या तुफान व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल… लाकडी खाटेवर बसलेला एक पाच वर्षांचा लहानगा विडी ओढत आहे , असा ती व्हिडीओ आहे. बघायला गमतीशीर आहे तो. अगदी मोठ्या माणसासारखा बसलाय पायावर पाय टाकून. दोन बोटांत विडी. मधूनच तो झुरके मारतोय. धूर सोडतोय. दोन झुरक्यांच्या मधल्या काळात , विश्वाची चिंता लागावी आणि ती डोळ्यातून व्यक्त व्हावी , तसे हावभाव.

No Picture
साहित्य - ललित

विस्मयो आनंदवनभुवनी

Category:

 

अयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं. सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती.

No Picture
साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल – ४

Category:

 

…. नंतर त्याचा व्हिडीओ बनवला. अर्थात गळ्यात फास वगैरे अडकवून. तो व्हिडीओ व्हायरल होईल याची त्याला खात्री होतीच. मग त्याने न्यूज चॅनल ऑन केलं. अपेक्षेप्रमाणे त्याच्या आत्महत्येची न्यूज सुरू झाली होती. मग नेहमीचे यशस्वी कलाकार मेकअप करून बाईट्स द्यायला सज्ज झाले. त्याच्या आत्महत्येचं राजकारण सुरू झालं.

No Picture
साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल – ३

Category:

 

आत्म्यानं न लिहिलेल्या सगळ्या पानांची सुरळी झाली होती. चोरीला गेलेली बुलेट त्या पोराच्या घरात सापडल्यानं पुराव्यासह गुन्हा दाखल झाला होता. बुलेट साहेबांकडे गेली होती आणि त्याची किल्ली साहेबांनी लोकशाहीच्या नव्या तरुण शिलेदाराकडे दिली होती. अर्थात उरलेले हप्ते त्या नव्या शिलेदारानं फेडायचे आहेत , हे ते सांगायला विसरले नव्हते …

No Picture
साहित्य - ललित

ते बावन्न तास…

Category:

 

जाऊ दे. आता टीव्ही लागलाय , तर तोच पाहतो ना. ते बावन्न तास कसे घालवले असतील माझं मलाच ठाऊक. आता पुन्हा वानरसेना येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत , तोपर्यंत टिव्हीकडे बघत राहतो.

No Picture
लेखसंग्रह

प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती

Category:

 

शाळेच्या वयापासूनच आपण गणित आणि भूमिती हे विषय म्हटले की थोडा धसकाच घेतो, नाही का? काही जणांना गणिताची मुळात आवड असते पण काही मात्र त्याकडे रुक्ष विषय, आकडेमोड म्हणूनच पाहतात. पण भारतीय व्यवहारात आणि इतिहासात गणिताची सुरुवात आणि रुजवात कशी झाली हे समजून घेण मात्र तितकच रंजक आहे बर का! हा विषय तसा विस्ताराने मांडण्याचा आहे. पण वाचकांची उत्सुकता वाढवून त्यांना या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्यासाठी किमान काही प्राथमिक माहिती हाती असावी इतकाच या लेखाचा मर्यादित उद्देश आहे.

No Picture
साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल – २

Category:

 

त्यादिवशी माझंही तसंच झालं. समोरचं एसटीचं धूड बघितल्यावर बावचळून मी बाईक साईडला घेतली . एसटीवाला निर्धास्तपणे गेला आणि मी साईडपट्ट्यांजवळ असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर कोसळलो . गाडी माझ्या अंगावर पडली होती आणि मला ती बाजूला करता येत नव्हती . पण माझ्या सुदैवाने , शेजारच्या झाडाजवळ जेवायला बसलेला एक तरुण धावत आला आणि त्यानं गाडी बाजूला केली. मला उठवलं आणि शेजारच्या त्या झाडाच्या सावलीत नेलं.

No Picture
साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल – १

Category:

 

त्यानं डोक्यावरची टोपी काढली . जमिनीवर आपटली . त्या टोपीवर तो थयथया नाचला . टोपीवर जोरात थुंकला आणि पायानं ती टोपी उडवली . टोपी नेमकी कंपाउंड जवळच्या कचराकुंडीत जाऊन पडली . मग त्यानं घाम पुसला . हात स्वच्छ पुसले आणि वरच्या खिशात ठेवलेली पानं हळुवारपणे माझ्या हाती दिली … मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं . आणि धक्काच बसला .

No Picture
साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल !

Category:

 

अशी न लिहिली गेलेली आत्मचरित्रं , खूपच वेगळी असतात . अनवट वाटेनं जाणारी असतात . प्रचंड धक्कादायक असतात . खूप गुपितं लपवून ठेवणारी असतात . समाजात गदारोळ करणारी असतात . अनेकांचे बुरखे टराटरा फाडणारी असतात . नातेसंबंध ओरबाडून टाकणारी असतात . अशी आत्मचरित्रं सप्तरंगी नसतातच तर कृष्णधवल रंग त्यात मजबूत असतो . आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ,अशा आत्मचरित्रांचे नायक हे सर्वसामान्य असतात . त्यामुळे त्यांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातील त्यांचा आत्मा हा केव्हाच उडून गेलेला असतो . अशा न लिहिलेल्या आत्मचरित्रातील काही पाने माझ्या हाती लागली .