राजा, ससा आणि माकड

एकदा एक राजा राज्य करीत होता. त्याने एका झाडावर एक मधाचे पोळे राखून ठेवलेले होते. एके दिवशी एका सशाने उंदराशी मैत्री केली. त्याच्या मदतीने त्याने त्या मधाची चोरी करायचे ठरविले. सशाने त्या झाडाखाली आगीचा जाळ केला. त्यातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. तोपर्यंत तो उंदीर झाडावर चढून गेला आणि त्याने ते मधाचे पोळे आपल्या अणकुचीदार दातांनी कुरतडायला सुरवात केली. राजाने तो धूर पाहिला.



एकदा एक राजा राज्य करीत होता. त्याने एका झाडावर एक मधाचे पोळे राखून ठेवलेले होते. एके दिवशी एका सशाने उंदराशी मैत्री केली. त्याच्या मदतीने त्याने त्या मधाची चोरी करायचे ठरविले. सशाने त्या झाडाखाली आगीचा जाळ केला. त्यातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. तोपर्यंत तो उंदीर झाडावर चढून गेला आणि त्याने ते मधाचे पोळे आपल्या अणकुचीदार दातांनी कुरतडायला सुरवात केली. राजाने तो धूर पाहिला. तो त्या झाडाखाली आला आणि ओरडला ‘कोण आहे तो झाडावर? कोण करतोय माझ्या मधाची चोरी ?” ससा त्या उंदराच्या कानात हळूच पुटपुटला, ‘राजाला सांग तू एकटाच आहेस. तो मला पाहू शकत नाही. मला धुराने कवटाळून टाकलं.राजा त्या आगीच्या जाळाजवळ आला. परंतु तो त्याच्या फार जवळ गेला नाही. मात्र त्या दुष्ट सशाने त्या झाडाखाली आणखी अधिकच दाट धूर तयार केला आणि तो दूर पळून गेला.

हळूहळू तो धूर ओसरला. राजाने वर झाडावर त्या उंदराला पाहिले. त्याने त्याला खाली येण्याचा हुकूम केला. तो इवलासा प्राणी झाडावरून खाली येताच राजाने त्याला ठार मारून टाकले. काही दिवसानंतर सशाला एक माकड भेटला. ससा माकडाला म्हणाला, ‘मित्रा ! मला एक जागा ठाऊक आहे. तिथे एक सुंदर मधाचे पोळे आहे. परंतु त्यातील मध काढून घेण्यासाठी दोघेजण पाहिजेत. तू जर कबूल झालास तर आपण दोघांनी तो मध वाटून घेऊया.’ त्या माकडाने सशाचे म्हणणे मान्य केले. तो त्या सशाच्या मागून गेला. त्या झाडाकडे आल्यावर ससा माकडाला म्हणाला, गोष्टींच्या गुहेत । पशु पक्ष्यांच्या गोष्टी ‘मित्रा, तो मध काढून घेण्यासाठी तुला त्या झाडावर चढले पाहिजे. मी या झाडाखाली राहीन आणि आगीचा मोठा जाळ करून धूर बाहेर काढीन.’ माकड झरझर झाडावर चढला. ससा खाली धूर करू लागला. मधमाशांना त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. पुनः त्या झाडाखाली धूर झालेला पाहून राजा ओरडला, ‘कोण आहे या झाडावर? कोण चोरतोय माझा मध ?’ तेव्हा ससा त्या माकडाच्या कानात पुटपुटला, ‘त्याला सांग तू एकटाच आहेस. तो मला पाहू शकत नाही. धुराने मला कवटाळून टाकलेय व लपवून ठेवलेय.’

परंतु या वेळी मात्र तो माकड पोट धरधरून हसू लागला आणि मोठ्या आवाजात तो राजाला म्हणाला, ‘ महाराज, आगीला भिऊ नका. तुमची विजार काही ती आग जाळणार नाही. आगीच्या जरा जवळ या आणि त्या धुरात काय दिसतंय ते पहा.’ राजा आगीजवळ गेला. त्याला तो दुष्ट ससा दिसला. त्याने काठीने त्या सशाला ठार मारून टाकले. त्यानंतर राजाने त्या माकडाला झाडावरून खाली ये म्हणून म्हटले. परंतु माकड हसत हसत राजाला म्हणाला, “काय ? खाली येऊ म्हणता ? मी काय मूर्ख आहे ? माझं मरण मीच माझ्यावर ओढवून घेऊ म्हणता ? आता मला वाचविण्यासाठी माझ्याजवळ फक्त दोनच मार्ग आहेत. एक आहे वरचा आणि एक आहे खालचा. मला वरचा मार्ग पसंत आहे.’ असे म्हणून माकडाने या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायला सुरुवात केली आणि हां हां म्हणता झाडाच्या शेंड्यात कुठेतरी तो गडप झाला. राजा जागच्या जागी तडफडत आणि चरफडत राहिला.

Author