युरोपायण दहावा दिवस – पीसा – फ्लॉरेन्स
Category:
साहित्य - ललितपाडोवा हॉटेलमाधुन चेकौट करुन आम्ही सर्वांनी जन गण मन चे समूहगान केल आणि तिथून 300 कीमीवरच्या पीसा शहराकडे निघालो. इटलीतील पीसाच्या झुकता मनो-याच्या आसपास अजूनही दोन ऐतिहासिक वास्तू आहेत; एक, बाप्टेस्ट्री जी इटलीतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाप्टेस्ट्री आहे आणि जीची घुमटासह उंची झुकता मनो-याहूनही थोडी जास्तच आहे आणि दुसर, पीसा कॅथेड्रल. या दोहोंच्या बरोबरच झुकता मनोरा असूनही पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे तो झुकता मनोराच!