No Picture
शहरे आणि गावे

मोनॅको

Category:

 

मोनॅको हा युरोपातील एक नगर-देश आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.

No Picture
शहरे आणि गावे

मोझांबिक

Category:

 

मोझांबिक हा आग्नेय आफ्रिकेतील एक देश आहे. मोझांबिकचा शोध वास्को दा गामाने १४९८ साली लावला व १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी तेथे आपली वसाहत स्थापन केली.

No Picture
शहरे आणि गावे

म्यानमार

Category:

 

म्यानमार हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश – म्हणजे १,९३० कि.मी. – लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

माली

Category:

 

मालीचे प्रजासत्ताक हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत द’ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९२ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या मालीची लोकसंख्या सुमारे १.४५ कोटी आहे. बामाको ही मालीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मालीमधील बहुतांशी लोकवस्ती दक्षिण भागात नायजर व सेनेगाल नद्यांच्या काठावर वसलेली आहे. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे

No Picture
शहरे आणि गावे

माल्टा

Category:

 

माल्टाचे प्रजासत्ताक हा दक्षिण युरोपातील एक छोटा द्वीप-देश आहे. माल्टा भूमध्य समुद्रामधील एका द्वीपसमूहावर वसला असून तो इटलीच्या सिसिलीच्या ८० किमी (५० मैल) दक्षिणेस, ट्युनिसियाच्या २८४ किमी (१७६ मैल) पूर्वेस, व लिबियाच्या ३३३ किमी (२०७ मैल) उत्तरेस स्थित आहे. माल्टाचे क्षेत्रफळ केवळ ३१६ चौ. किमी (१२२ चौ. मैल), तर लोकसंख्या सुमारे ४.५ लाख असून माल्टा जगातील सर्वात लहान व सर्वात घनदाट लोकवस्तीच्या देशांपैकी एक आहे. व्हॅलेटा ही माल्टाची राजधानी असून ती युरोपियन संघामधील सर्वात लहान राष्ट्रीय राजधानी आहे. माल्टी व इंग्लिश ह्या दोन माल्टामधील राजकीय भाषा आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

मार्शल द्वीपसमूह

Category:

 

मार्शल द्वीपसमूह हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे.

No Picture
शहरे आणि गावे

माँटेनिग्रो

Category:

 

माँटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. माँटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही माँटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

मलावी

Category:

 

मलावीचे प्रजासत्ताक हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील एक चिंचोळा भूपरिवेष्ठित देश आहे. १९६४ सालापर्यंत ब्रिटिश वसाहत असलेला हा देश न्यासालँड ह्या नावाने ओळखला जात असे. मलावीच्या उत्तर व पूर्वेला टांझानिया, पश्चिमेला झांबिया तर इतर दिशांना मोझांबिक हे देश आहेत. मलावीच्या पूर्वेस न्यासा हे आफ्रिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. लिलाँग्वे ही मलावीची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्लँटायर हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

मॉरिशस

Category:

 

मॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडांनी व्यापलेल्या या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौहार्दामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे.