No Picture
साहित्य - ललित

जरा-मरण (आठवणींची मिसळ २४)

Category:

 

जरा आणि मरण या दोहोमधेही फरक आहे. मरण तुमचं जीवन संपवून टाकते. मग तुम्ही नवजात असा किंवा जराजर्जर नव्वदीचे वृध्द असा. नवजात शिशुचे मरण त्याला जीवनापासूनच वंचित ठेवते. त्याला जरा तर येत नाहीच पण बालपण, तारुण्य या सर्वापासूनच ते वंचित रहातं. तरूणपणीचं मरण किंवा प्रौढवयीन पण निरोगी माणसाचे मरणही त्याला म्हातारपणापासून दूर ठेवतं पण असं मरण पूर्ण आयुष्य जगल्याचं समाधान देत नाही. त्यालाही नाही की त्याच्या आप्त-मित्रांनाही नाही.

No Picture
साहित्य - ललित

जीवननाट्य नाटीका क्र. ३ (आठवणींची मिसळ २३)

Category:

 

आधीच्या दोन नाटीकांत पाहिलतं ना मुखवटे कसे घालावे लागतात ते आणि ते मुखवटे कसा चेहरा मोहराच बदलून टाकतात ते? तरीही मुखवटे घालण्याची हौस कांही जात नाही. जोपर्यत मानवजात ह्या जगांत आहे तोवर तोंडाला रंग फासणे चालूच रहाणार.

No Picture
साहित्य - ललित

मुखवटा नाटीका क्रमांक २ (आठवणींची मिसळ २२)

Category:

 

नाटकांतलं खरं खोटं ठरवणं मोठं मुष्किल. समजा नाटकामधे रंगमंचावर प्रणय प्रसंग चालू आहे. नायक-नायिका रंगात आली आहेत. प्रेक्षकांना त्या प्रणयाच्या दृष्याने भारून टाकलंय. ते मनाशी म्हणतायत, “किती छान अभिनय !” त्याचवेळी पहिल्याच रांगेत बसलेल्या नायकाच्या पत्नीला मात्र तो अभिनय “अभिनयच” आहे की खरेच रंगलेत? ह्या शंकेचं काहूर छळत असतं आणि नंतर नाटक संपल्यावर तोच नायक तिच्याशी लडिवाळपणे बोलून प्रेम व्यक्त करतो, तेव्हां तिच्या मनांत येतं “आता हा अभिनय तर नाही ना?” अभिनय तर आपण सर्वच करत असतो.

No Picture
साहित्य - ललित

साक्षात् भीम नाटीका क्र. १ (आठवणींची मिसळ २१)

Category:

 

असं म्हणतात की प्रत्येक मराठी माणसाला नाटकाची ओढ असतेच. एकदा तरी नाटकांत काम करावं ही सुप्त इच्छा जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असते. खरं सांगा, तुम्हालाही कधी ना कधी असं वाटलं होतं की नाही? खरं म्हणजे नाटकवेडेपणा हा कांही फक्त गडक-यांवर (राम गणेश) प्रेम करणा-या मराठी माणसाचा किंवा शेक्सपियरवर प्रेम करणा-या इंग्रज माणसाचाच वारसा नाही. तो सर्व मानवजातीचा वारसा आहे. जगांतली कुठलीही भाषा बोलणा-याला आणि कोणतेही तत्त्वज्ञान मानणा-याला कोणत्या ना कोणत्या नाट्यप्रकारांत गोडी असतेच.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक – भाग ६ (आठवणींची मिसळ २०)

Category:

 

मी १९५९-६१ दोन वर्षे युनिव्हर्सिटीच्या फोर्टमधल्या जुन्या इमारतीत एम.ए. च्या लेक्चर्सना जात असे.एम.ए. इकॉनॉमीक्सचे वर्ग फक्त तिथेच असत.त्या काळी डॉ. दातवाला, डॉ.हजारी, डॉ. मिस रणदिवे, डॉ.लकडावाला, डॉ.ब्रह्मानंद, डॉ.शहा, प्रोफेसर गायतोंडे, प्रोफेसर गंगाधर गाडगीळ, प्रोफेसर लाड अशी त्याकाळची नामांकित मंडळी अर्थशास्त्र विभागांत होती.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक- भाग ५ (प्राध्यापक) (आठवणींची मिसळ १९)

Category:

 

शिक्षक आणि प्राध्यापक ह्यात मुख्य फरक कोणता ?सांगण कठीण आहे.तरी प्राध्यापकाकडून त्या विषयाचा व्यापक आणि सखोल अभ्यास अपेक्षित असतो.बरेचदा वर्गात १२५-१५०च्यावर विद्यार्थी असतात.शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष देणं अपेक्षित असतं.अभ्यासांतील वैयक्तिक अडचणी प्राध्यापक वर्गात विचारांत घेऊ शकत नाहीत, त्यासाठी त्यांना नंतर भेटावे लागते.टीचर तास किंवा पिरीयड घेतात.प्राध्यापक भाषण म्हणजे लेक्चर देतात.त्या दृष्टीने लेक्चर श्रवणीय करणे, ही कला आहे.सर्व प्राध्यापकांकडे ती नसते.महाविद्यालयांत उपस्थिती घेतात अथवा नाही. त्यामुळे लेक्चर बुडवणे म्हणजे दांडी मारणे सोपे असते.कांही प्राध्यापक असे असतात की त्यांच्या तासाला दांडी मारावीशी वाटत नाही.मला अगदी पहिल्या वर्षापासून युनिव्हर्सिटीपर्यंत दोन्ही प्रकारचे प्राध्यापक भेटले.शिक्षक किंवा अध्यापक आपल्याला विविध विषयांचे ज्ञान देतात, प्राध्यापक आपल्याला आपण निवडलेल्या खास विषयांची सर्वांगीण माहिती देतात.मला विज्ञान व गणित विषयांत गुण अधिक होते.परंतु १८ वर्षे पूर्ण होताच नोकरी बघायची हा विचार मनाशी पक्का असल्यामुळे विज्ञान न घेतां मी कला म्हणजेच आर्टससाठी मी विल्सन ह्या सर्वात जुन्या, चौपाटीला असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.पहिले एक वर्ष मी तिथे होतो.तिथले कांही प्राध्यापक त्याकाळी प्रसिध्द होते.मराठी साहित्यात समीक्षक म्हणून ओळखले जाणारे वा. ल. कुलकर्णी, संस्कृतचे वेलणकर शास्त्री, संस्कृतचेच गजेंद्रगडकर, स्वतः प्रिन्सिपाल आयरन, रसायनशास्त्राचे दाभोळकर, इ. ची नावे त्याकाळी प्रसिध्द होती.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक – भाग ४ (आठवणींची मिसळ १८)

Category:

 

माझ्या जन्माच्या सुमारास माझ्या वडिलांना स्थिर नोकरी नव्हती.वकिली न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि १९३४मधे बेळगावला कोचिंग क्लासेस काढले.त्यांत खूप नुकसान झालं.क्लासेसना चांगले दिवस यायला अजून वेळ होता.त्यानंतर बेळगावचं घर विकून, कर्ज फेडून ते मुंबईस आले.वसईचे वाघ हायस्कूल, लालबाग-परळचे सरस्वती हायस्कूल, खारचे एक हायस्कूल अशा अनेक शाळांमधे त्यांना तात्पुरती नोकरी मिळत असे.पण कायमस्वरूपी कधीच मिळाली नाही.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक भाग – ३. (आठवणींची मिसळ १७)

Category:

 

आम्ही होतो, तो मराठीचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. मला वाटतं त्यावेळचे शिक्षक हायस्कूल सोडून गेल्यावर आठवीपासून एक एक वर्ग बंद करायला सुरूवात झाली.
ह्यामुळे आम्हा त्यावेळच्या विद्यार्थ्यांना आणि सरांना एकमेकांबद्दल आपुलकी कायम राहिली तरी एम. ए. हायस्कूलबद्दल ती आपुलकी कधी वाटली नाही.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक – भाग २ (आठवणींची मिसळ १६ )

Category:

 

सातवी पर्यंतच्या शिक्षणांत बरेच सहाध्यायी होते. अंधेरीमधे ही एकमेव शाळा होती. ज्या मुलांच्या आईवडीलांना ही शाळा पसंत नसे, त्यांच्या मुलांना ते पार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयांत घालत. अशी मुलं हाताच्या बोटावर मोजण्यासारखी होती.त्यामुळे मध्यम, उच्चमध्यम घरांतली सर्व मुलं इथेच प्रवेश घेत. मला आठवतयं की रत्नमाला या नटीचा मुलगा याच शाळेत होता.नीटनीटका वेष, तेल लावून व्यवस्थित भांग पाडलेले, चापून बसवलेले केस, ह्यामुळे तो उठून दिसायचा.पण स्वभावाने बुजरा असल्यामुळे मुलांच्या चेष्टेचा विषय व्हायचा.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक – भाग १ (आठवणींची मिसळ १५ )

Category:

 

शिक्षक म्हणजे गुरू.दत्तात्रेयांनी २४ गुरू केले असे म्हणतात.अनेक सुप्रसिध्द गायकांनी दोन-तीन गुरू केल्याचे सांगितले आहे.जो जो आपल्याला कांही शिकवतो, तो आपला गुरू, अशी व्याख्या केली तर आई-वडिलांपासून सुरूवात करून ह्या वयातही आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या पत्नीपर्यंत असंख्य गुरू आपल्याला आठवतील.अगदी लोकलच्या प्रवासांत चपळाईने चौथी सीट कशी मिळवावी हे शिकवणाऱ्या गुरूचीही आठवण होईल.पण शाळा कॉलेजमधे जे आपल्याला शिकवतात, तेंच आपले अधिकृत गुरू, म्हणजेच शिक्षक.अगदी बिग्रीपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत खूप शिक्षक आपल्याला भेटतात.कांही कायम लक्षात रहातात.कांहीना विसरावसं वाटत पण विसरतां येत नाही.आपल्याला घडवण्यात आपल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो.