Shri Vinayak Atre is a retired Chief Architect of Government of Maharashtra. He writes as a passion and most of his writing is for children
पत्र महिमा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 27, 2022
Shri Vinayak Atre is a retired Chief Architect of Government of Maharashtra. He writes as a passion and most of his writing is for children
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 27, 2022
Category:
साहित्य - ललितपुढे गोरे मॅनेजर झाला. मग तर माझ्या छळाला अंतच राहिला नाही. मांजर जसं उंदराला खेळवतं तसं सगळा गोरे कंपू मला खेळवत होता. प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी कडा असते असे म्हणतात. तशी माझ्या या काळ्याकुट्ट ढगांच्या कडेवर एक चंदेरी कडा मला एक दिवस दिसली आणि या रोजच्या यमयातनातून सुटण्याचा एक खात्रीशीर मार्ग मला दिसू लागला. अर्थात ह्या मार्गाचा विचार मनात येताच मी भयंकर चपापलो! असा विचार माझ्या मनात कसा काय आला याचे मला फार आश्चर्य वाटले.
June 26, 2022
Category:
साहित्य - ललितमला खूप बरे वाटले. सकाळपासून मी जाम वैतागलो होता. त्यांचे चांगले शब्द ऐकून वाटले, चला, आज पहिलाच दिवस होता, रोज काही असे होणार नाही. हळूहळू होईल दोस्ती. पण हा माझा विचार किती भ्रामक होता याची चुणूक मला लगेचच दिसून आली.
थोड्या वेळाने गोपाळ आला आणि रजिस्टर घेऊन गोरेसाहेबांना नेऊन दिली. माझे काम पाहून गोरेसाहेब आणि मॅनेजर खूश होणार याची मला शंभर टक्के खात्री होती. त्यामुळे मनातून मी खूप आंनदलो होता.
June 25, 2022
Category:
साहित्य - ललितदोन वर्षांनी मला मशीदबंदरला एका सहकारी बँकेत नोकरी लागली. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी अर्धापाऊण तास आधीच गेलो तेव्हा वॉचमन बँकेचं दार उघडत होता. मला पाहून तो म्हणाला, “साहेब! बँक उघडायला अजून वेळ आहे, काय नवीन खातंबितं खोलायचंय का?”
“नाही मी इथं नोकरीसाठी आलोय. आजपासून हजर व्हायचं आहे.” “असं का मग बसा आत, थोड्या वेळाने गोरेसाहेब येतील त्यांना भेटा. ते आले म्हणजे मी सांगतो तुम्हाला.” असे म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि मी आत जाऊ बसलो.
June 24, 2022
Category:
साहित्य - ललितझुरळं अन् पाली ह्या काही शोभेच्या वस्तू नव्हेत. पण बाजारात त्या प्लॅस्टिकच्या मिळतात आणि काही लोक हौसेनं त्या आपल्या घराच्या भिंतीवर सजावट म्हणूनही लावतात. आता कोणाला काय आवडेल आणि कशात कला दिसेल ते सांगणे कठीणच!
मग असे असूनही माझ्या घरात प्लॅस्टिकचे झुरळ आणि तेही अगदी भिंतीवरच्या दिव्याखाली ठळकपणे दिसेल असे मी का लावले आहे असे तुम्ही विचाराल. पण मी हे ‘झुरळ’ लावले आहे ना त्याचा आणि गृहसजावटीचा काही संबंध नाही! ती एक आठवण आहे.
June 23, 2022
Category:
साहित्य - ललितसाधारण दहा-पंधरा मिनिटांचा अवधी गेला असावा. कुपीच्या तळाशी पायांची बोटं पूर्ण वाढलेली दिसू लागली. हळूहळू सगळं पाऊल आणि नंतर वरवर वाढत वाढत गुडघ्यापर्यंत पूर्ण पाय! मग वरवर जात जात मांड्या, कंबर पोट, हात, छाती असा क्रमाक्रमाने संपूर्ण आमदार प्रकट झाला! ही प्रक्रिया सुमारे सहा तास चालली होती. पण आम्हाला त्याची अजिबात जाणीव झाली नाही! ते अद्भुत दृश्य कल्पनेपेक्षाही अचाट होतं. आमदाराची आकृती पूर्ण होताच मी दादाचा हात हातात घेतला आणि झटकन ओढून त्याला उठवलं. आम्ही घाईघाईने बाजूला लावलेल्या पडद्यामागे गेलो. दादाला तिथे उभं करून मी अत्यंत काळजीपूर्वक परंतु त्वरेने कुपी काढून घेतली. कुपीसाठी अत्यंत हलकं पण पारदर्शक काचेसारखं आवरण बनवलं हेतं. त्याची घडी करून ते बाजूला ठेवून दिलं. आता आमदारसाहेब डोळे मिटलेल्या अवस्थेत तिथे उभे होते! कुठल्याही क्षणी ते डोळे उघडतील, त्यापूर्वी मला पडद्यामागे जाणं भाग होतं.
June 22, 2022
Category:
साहित्य - ललितदादाचा विश्वासच बसेना. ती त्याला संशोधनाची माहिती सांगितली. आता मी प्राणी किंवा माणूस एक दिवसापासून एक वर्षापर्यंत जिवंत ठेवू शकतो इतकी प्रगती केली आहे हेही सांगितलं. त्याला हे पण स्पष्ट केलं की हे अत्यंत गुप्त संशोधन आहे आणि याची वाच्यता कुठेही करू नकोस. नंतर घरातल्या देवासमोर बेलभंडारा उचलून मी त्याच्याकडून गुप्ततेची शपथ वाहून घेतली.
June 21, 2022
Category:
साहित्य - ललितआता माझ्या मनात मानवी प्रतिकृती निर्माण करावी असे विचार येऊ लागले. जोपर्यंत उंदीर, सशांवर भागत होतं, तोपर्यंत काही अडचण नव्हती. पण एखादा माणूस निर्माण करायचा ही फार गंभीर, धोकादायक आणि अवघड, जवळजवळ अशक्यप्रायच गोष्ट होती. यासाठी मला कुणीतरी विश्वासू मदतनीस लागणार होता. माझ्या शोधाची घरातच काय पण इतरत्रही कुणाला माहिती नव्हती. एक वेडा शास्त्रज्ञ म्हणून कुणी माझ्याकडे फार लक्ष देत नसे. घरचं गडगंज असल्यामुळे उदरनिर्वाहाची काहीच चिंता नव्हती. मी घरी आहे याचंच आईला कौतुक होतं. जिवावरच्या दुखण्यातून ती उठली होती आणि आता माझा मुलगा, म्हणजे तिच्या नातवात ती दंग होती.
June 20, 2022
Category:
साहित्य - ललितगावी पोचायला दोन दिवस लागले. आई शेवटच्या घटका मोजत होती. मला पाहून तिला खूप बरं वाटलं आणि आश्चर्य म्हणजे तिची प्रकृती सुधारू लागली. पण तिने एकच ध्यास घेतला, “बाज्या, आता तू पुन्हा जाऊ नकोस. पुरं झालं ते संशोधन! तुला इथे काय कमी आहे. तू आता इथेच माझ्याजवळ राहा. लग्न कर, मला नातू पाहू दे.” तसं तर मोठा भाऊ होताच. त्याची मुलं पण होती. पण ती कुणाचंच ऐकेना. शेवटी आता ही काही फार दिवसांची सोबती नाही असा विचार करून मी होकार दिला. तिच्या पसंतीची मुलगी पाहून लग्नही केलं.
June 19, 2022
Category:
साहित्य - ललितआमच्या गावात गोविंदभट नावाचे एक कीर्तनकार होते. रामनवमी, हनुमान जयंती, कृष्णाष्टमी अशा निरनिराळ्या धार्मिक प्रसंगी आणि एरवीही, आठवड्यातून एक-दोन वेळा गावातल्या राममंदिरात गोविंदबुवांचं कीर्तन असायचंच. बरेच वेळा मी आईबरोबर कीर्तनाला जात असे. म्हणजे आईच मला घेऊन यायची. हे बुवा आमच्या वाड्यावरसुद्धा घरच्या देवांची पूजा करायला रोज सकाळी यायचे. बुवांची आणि माझी चांगली गट्टी जमायची. तर सांगायचा मुद्दा लहानपणी मी आईबरोबर देवळात कीर्तनाला जायचो. बुवांची कीर्तन सांगायची पद्धत खूप मजेशीर होती. मी अगदी रंगून जायचो त्यांच्या कीर्तनात. कथा रंगात आली की बुवा नाचायला लागायचे आणि मध्येच म्हणायचे, “आणि बरं का महाराज- काय सांगू देवाची करणी! अहो, तुकोबारायांसाठी साक्षात वैकुंठातून विमान आलं महाराजा! आणि बघता बघता घेऊन गेलं की त्यांना-सदेह वैकुंठाला! बोला – जय जय पांडुरंग हरी जय जय-” आणि बुवा तंबोरा वाजवत नाचायला लागायचे. खूप गंमत वाटायची.
June 18, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti