३७० कलम काढल्यानंतर जागतिक स्तरावर बदलती समीकरणे
Category:
लेखसंग्रह३७० कलम काढल्यानंतर पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. आपल्या युद्धाच्या इशाऱ्यात दम नसल्याचा साक्षात्कार इमरान खान यांना १६ सप्टेंबरला झाला व त्यांनी स्वतःच आपल्या देशाची, लष्कराची व शस्त्रास्त्रांची लक्तरे काढली. भारताविरोधात पारंपरिक किंवा समोरासमोरच्या युद्धात आपला निभाव लागणार नाही तर आपण तोंडावरच आपटू, असल्याची कबुलीच इमरान खान यांनी दिली. याचाच अर्थ पाकिस्तानचा डाव दहशतवादी, आत्मघाती, फिदायीन, जिहादी हल्ले करण्याचाच आहे, हे स्पष्ट होते. परंतु, तसे काही झालेच तर इमरानना स्वतःचा देश वाचवता वाचवता नाकी नऊ येतील, हे नक्की!