एकदा देव आणि दैत्य दोघांनी मिळून समुद्रमंथन करून चौदा रत्ने मिळवली. वाटणी करता करता सुधा (अमृत) कोणी घ्यावे याबाबत वाद निर्माण झाला. या वादात दैत्यांनी सुधेचा कुंभ जबरदस्तीने देवांपासून हिसकून घेतला. तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप घेतले. मोहिनीरूप विष्णूने दैत्यांना अमृत वाटण्याचे काम मी करतो असे सांगितले. दैत्यांना ही गोष्ट मान्य झाली. त्यांनी अमृतकुंभ मोहिनीरूप विष्णूंच्या स्वाधीन केला. विष्णूने देवास आणि दैत्यांना समोरासमोर दोन रांगांमध्ये बसविले. सर्वप्रथम देवांना अमृत वाढले. राहू नावाच्या दैत्यास वाटले की सगळे अमृत देवांमध्येच वाटले गेले तर आपल्याला मिळणार नाही. म्हणून दैत्य राहू चंद्र व सूर्य यांच्यामध्ये येऊन बसला. अमृत वाढता वाढता राहू दैत्यालाही अमृत वाढले. राहू ते लगेच पीत असताना चंद्रसूर्यांनी राहुची लबाडी श्रीविष्णूंच्या लक्षात आणली. विष्णूनेही ताबडतोब आपल्या चक्राने त्याचे मस्तक तोडले. परंतु अमृत त्याच्या कंठापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे त्यास मृत्यू आला नाही. त्याचे धड व शिर अमर झाले. तो जिवंत राहिला. तेव्हापासून त्या दैत्याच्या शिरास राहू व धडास केतू असे म्हणू लागले. दैत्याने आपल्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी चंद्रसूर्याचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. त्यामुळेच राहू केतू चंद्रसूर्यास ग्रासण्यासाठी अधूनमधून त्यांच्यावर झडप घालतात. त्यामुळे चंद्रसूर्याच्या दैनंदिन भ्रमणगती अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ग्रहणे होतात अशी लोकसमजूत आहे. देवांच्या कृपेने आणि लोकांच्या प्रार्थनेने चंद्रसूर्याची यातून सुटका होते.
ग्रहणासंबंधी दंतकथा
एकदा देव आणि दैत्य दोघांनी मिळून समुद्रमंथन करून चौदा रत्ने मिळवली. वाटणी करता करता सुधा (अमृत) कोणी घ्यावे याबाबत वाद निर्माण झाला. या वादात दैत्यांनी सुधेचा कुंभ जबरदस्तीने देवांपासून हिसकून घेतला. तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप घेतले. मोहिनीरूप विष्णूने दैत्यांना अमृत वाटण्याचे काम मी करतो असे सांगितले.