एके दिवशी कृष्ण वृंदावनात गाई चारीत असता दुसरे गोपाल फार तहान लागली, म्हणून त्याची वाट न पाहता पाणी पिण्यासाठी यमुनेवर गेले. तेथे एक मोठा डोह होता व त्यात कालिया नावाचा एक भयंकर विषारी सर्प राहत होता. त्या सर्पाच्या विषामुळे ते पाणी जहरी झाले होते. तरी सगळे गोपाल ते प्याले आणि विषबाधा होऊन मरून पडले. इतक्यात कृष्ण तेथे आला, आणि त्याने सर्वांचे विष उतरून त्यांना जिवंत केले. मग त्या सर्पाला त्या डोहातून हाकून लावावे असा विचार करून श्रीकृष्णाने कंबर बांधली आणि जवळच असलेल्या कळंब वृक्षावरून त्या विषारी डोहात उडी टाकिली ! त्याबरोबर पाणी जोराने उसळले व मोठा खळबळाट झाला. तो आवाज ऐकून कालिया सर्प त्वेषाने बाहेर निघाला, व कृष्णाला कडकडून दंश करून त्याने त्याच्या अंगाला विळखा घातला. हे पाहून कृष्णाचे सोबती अगदी घाबरून गेले व गाई हंबरडे फोडू लागल्या. इकडे कृष्णाला घरी येण्याला रोजच्यापेक्षा आज फार उशीर झाला, म्हणून नंद व यशोदा काळजी करीत होती. बराच वेळ झाला तरी अजून कृष्ण व त्याचे खेळगडी यापैकी कोणीच घरी येईना, तेव्हा सगळे गोप त्यांचा शोध करीत करीत डोहापाशी आले, आणि कृष्णावरले हे संकट पाहून भीतीने गांगरून गेले. इकडे कृष्णाने हळू हळू आपले शरीर फुगविण्याला प्रारंभ केला, आणि फुगविता फुगविता ते इतके फुगविले की, त्या सर्पाला वेदना होऊ लागल्या. त्याने अंगाला घातलेला विळखा सोडला; तथापि कृष्णाला पुनः दंश करण्याची संधी तो पहातच होता. इकडे कृष्णही त्याच्या फडांवर उडी मारण्याची संधी पहात त्याच्या भोवती घिरट्या घालीत होता. होता होता कृष्णाने संधी साधली. तो कालियाच्या डोक्यावर चढला, आणि वर नाचून नाचून त्याने आपल्या टाचांनी त्याच्या फणा ठेचून टाकल्या. कालियाचे सगळे अंग त्यामुळे खिळखिळे होऊन त्यातून रक्त वाहू लागले. तेव्हा त्याची रग जिरली असे पाहून कृष्णाने त्याला तो डोह सोडून दुसरीकडे जाण्यास सांगितले व त्याप्रमाणे तो निघून गेला.
कालियामर्दन
एके दिवशी कृष्ण वृंदावनात गाई चारीत असता दुसरे गोपाल फार तहान लागली, म्हणून त्याची वाट न पाहता पाणी पिण्यासाठी यमुनेवर गेले. तेथे एक मोठा डोह होता व त्यात कालिया नावाचा एक भयंकर विषारी सर्प राहत होता. त्या सर्पाच्या विषामुळे ते पाणी जहरी झाले होते