जनस्थान : नाशिकविषर्या लोककथा

(रामायणातील कथा)

अगस्ती मुनी यांना दक्षिण भारतातील प्रबळ राक्षसांचा नाश करण्यासाठी व
ऋषीमुनींना आश्रय देण्यासाठी उत्तर भारतातून ब्रह्मा, विष्णू महेश यांना दक्षिण
भारतात पाठवतात. तेव्हा महादेव म्हणतात की, “मी गोदाकाठच्या पंचक्रोशीत
जनस्थान या ठिकाणी ‘कपालेश्वर’ या नावाने प्रकट होईन” आणि विष्णूने वचन
दिले की, “मी रामअवतारी तुमच्या भेटीला येईन.



(रामायणातील कथा)

अगस्ती मुनी यांना दक्षिण भारतातील प्रबळ राक्षसांचा नाश करण्यासाठी व
ऋषीमुनींना आश्रय देण्यासाठी उत्तर भारतातून ब्रह्मा, विष्णू महेश यांना दक्षिण
भारतात पाठवतात. तेव्हा महादेव म्हणतात की, “मी गोदाकाठच्या पंचक्रोशीत
जनस्थान या ठिकाणी ‘कपालेश्वर’ या नावाने प्रकट होईन” आणि विष्णूने वचन
दिले की, “मी रामअवतारी तुमच्या भेटीला येईन.” हे वचन घेऊनच ते दक्षिण
भारतात येतात. त्यानंतर अगस्ती ऋषी अनेक प्रबळ राक्षसांना संपवून
गोदावरीच्या परिसरात आले. राक्षसभवन येथील विलवला आणि वातापी या
राक्षसांना संपवले. पुढे ते ‘जनस्थाना’कडे जात होते. जनस्थानाचा हा परिसर
खूप पवित्र परिसर म्हणून ओळखला जात होता. या ठिकाणी प्रत्यक्ष महादेव
कपालेश्वराच्या नावाने प्रकट झाले होते. त्यामुळे या ठिकाणी अनेक ऋषी-मुनी
राहात होते. पण या परिसरात खूप जंगल होते आणि राक्षसांचा संचारही जास्त
होता. येथील ऋषी-मुनींना राक्षसांचा खूप त्रास होत असे. या राक्षसांना
संपवण्यासाठी अगस्ती महाऋषी या परिसरात आले होते व येथेच अनकाई
गावाच्या बाजुला उंच पर्वतावर त्यांनी आश्रम स्थापन केला व कपालेश्वराची
पुजा-अर्चना सुरू केली.

रामअवतारी रामाला १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला होता. वनवासी
असताना राम, लक्ष्मण, सीता हे सोबत होते. ते गोदावरीकाठी पंचवटीच्या
परिसरात आले तेव्हा अगस्तींना दिलेल्या वचनाची त्यांना आठवण झाली
आणि ते परिसरातून जनस्थानाकडे अगस्ती ऋषीच्या दर्शनासाठी आश्रमात
आले. काही दिवस या पंचवटीच्या जंगलात राम वास्तव्य करून राहिले होते.

एके दिवशी लक्ष्मण फळे, कंदमुळे शोधत हातात खड्ग (तलवार) घेऊन
जंगलात भ्रमंती करू लागले. वाटेत याच जंगलात शूर्पणखेचा मुलगा ‘सांभ’ हा
तपस्या करत बसला होता. लक्ष्मण जंगलातून रस्ता काढत काढत जात होता.
वाटेत आलेल्या वेली खड्गने तोडत होता. वाटेत आलेल्या एका जाळीवर
असेच लक्ष्मणाने आपले खड्ग मारले त्याच जाळीत सांभ तपस्या करत बसला
होता. लक्ष्मणाच्या खड्गने सांभाचा वध झाला होता. खड्गचे रक्त पाहून
लक्ष्मण चिंतेत पडला. आपल्या हातून साधू मेला का दुर्जन हे मला काही कळत
नाही. म्हणून रामापाशी येऊन लक्ष्मणाने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा
रामाने आंतरदृष्टीने जाणले की हा शूर्पणखेचा मुलगा सांभ राक्षसाचा वध झाला
आहे.

रामाचे हे बोलणे ऐकून लक्ष्मणाला वाटले आता आपले आणि राक्षसांचे हाडाचे वैर निर्माण झाले, हे याचे सूचक आहे.

शूर्पणखा आपल्या मुलाच्या (सांभाच्या) भेटीसाठी आली. तर त्याचे मुंडके
एका बाजुला आणि धड एका बाजूला हे पाहून तिचा राग अनावर झाला. तिने
आपल्या मुलाचा बदला घेण्याचे ठरवले. पण हा वध कोणी केला ते तिला
कळाले नाही. परंतु दुसऱ्याच दिवशी लक्ष्मण याच जंगलात फिरताना शूर्पणखेने
पाहिला. यानेच आपल्या मुलाचा वध केला असावा असे तिला वाटले. त्याचा
बदला घेण्यासाठी तिने कपटबुद्धीने एका सुंदर तरुण मुलीचे रूप धारण केले
आणि लक्ष्मणाकडे फुलाचा हार घेऊन गेली. तिने लक्ष्मणाला लग्न करण्याची
मागणी घातली. माझा स्वीकार करावा असे ती म्हणते. तेव्हा लक्ष्मण तिला
सांगतो की ‘मी रामाचा आदेश मोडत नाही. तू रामाकडे जाऊन रामाचा आदेश
आणावा. मग मी तुझा स्वीकार करीन’ लक्ष्मणाचे हे बोलणे ऐकून शूर्पणखा
रामाकडे जाते. तेव्हा राम तिला ओळखतो आणि तिच्या पाठीवर लिहितो, “ही
येताच हिचे नाक-कान, स्तन कापून टाक. ही रावणाची बहीण शूर्पणखा आहे.”
हा संदेश घेऊन ती लक्ष्मणापाशी येते. व संदेश देते. हा संदेश पाहताच लक्ष्मण
तिचे नाक व कान कापून टाकतो. ही घटना जनस्थान येथे घडली आहे. म्हणून
जनस्थानाला तेव्हापासून नाशिक या नावाने ओळखले जाऊ लागले.

Author