नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

तोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, “नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत.

निशाने त्याच्या हाताला जोरात हिसडा दिला, “Please रोहन, तू माझ्या अंगाला हात लावू नकोस. आणि माझ्या मागेही येऊ नकोस. मला तुझं काहीच ऐकायचे नाही. जाऊदे मला. Don’t touch me, Don’t touch me”

आता अज्ञान दूर झाल्यावर विजयच्या मनात कोणाबद्दल काहीच शिल्लक नव्हतं. तो शांत झाला होता, अबोल झाला होता, तपस्वी झाला होता आणि भविष्य जाणता झाला होता… लेखक – निलेश बामणे

वाघाला रक्ताची चटक लागली की जस होत, तस आमच्या परिसरातील लोकाना झाल होत. निम्म्या किमतीत वस्तू मिळतात म्हणजे काय? तीन महिने दुकान सुरु होऊन झाले होते. त्यामुळे निम्म्या किमतीत मिळालेल्या वस्तू लोकांच्या घरोघरी दिसू लागल्या होत्या.

रामदास काकांनं लाऊड स्पीकरात हळी देली आण मंग मलं लय आनंद झाला. तसं पाह्यलं तं काकड आरतीचा काकडा आण परसाद याच्यासाठी गावातल्या बऱ्याच जणायची चढावढं लागायची, म्या बी मांघल्ल्या पाच-सात दिसापसनं परयत्नात व्हतो. आखरच्यान आज कुठं मव्हा नंबर लागला व्हता. मव्ह नाव पहाटं पहाटं लावूड स्पीकरात वाजलं व्हत त्यामुळ मल लय भरून आलतं.

मी लांबूनच तिला बघत होतो…बघत बघत जवळ येऊ लागलो… ती म्हणाली ..पहेचाना .. मी असेच उत्तर दिले….. कैसी हो..आप….

मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो.

आई ने त्याला बहुतेक खूप शोधल असाव , ती आल्या पासून त्याच्या कडे फक्त रागारागाने बघत होती,
सर्व झोपल्या नंतर ती त्याच्या शेजारी जाऊन बसली , बाबू ती आली हे कळताच झोपेच सोंग घेऊन निमूट पडून राहिला,
“बाबू , कुठे होतास दिवसभर “आई ने त्याच्या डोळ्यावरचा हात काढत विचारल.

“छ्या! बाबांनी नुसता वैताग आणलाय. किती सारखं हे केलंस का? ते घेतलंस का? बॅग जागेवर ठेव. मला डॉक्टर कडे घेऊन चल. माझी औषधं आण वगैरे वगैरे…

हे सगळं घडलं ते त्या भलत्या विचारांच्या “कुंपणानीच शेत खाण्याआधी” मनाच्या मळ्यातून वेळीच ते “कुंपण“ काढून टाकलं sss म्हणून ….
Copyright © 2025 | Marathisrushti