(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • पळवलेले पत्र (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३२)

    ही कथा ही इंग्रजीत रहस्यकथांची सुरूवात करणारी पहिली कथा मानली जाते.

  • पुन:श्च हरिओम

    हे बाबूजींचं गाणं ऐकत स्मिता खिडकीत विचार करत उभी होती. तिची पण अशाच प्रकारची अवस्था झाली होती. सौ. स्मिता अमोल तावडे एका खासगी शाळेत गणित विषयाची शिक्षिका होती. तिची साधारणतः २०-२२ वर्ष नोकरी झाली होती. घरी तिचा नवरा तिला खूप सपोर्ट करणारा आणि अगदी प्रेमळ होता.

  • गोष्ट त्या दोघांची

    गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. आपल्या बहिणीसाठी रत्नाकरनी त्यावेळी या लग्नाला नकार दिला. अखेर बहिणही अविवाहित राहूनच स्वर्गवासी झाली. परंतू गिरीजाआत्या आणि रत्नाकरकरकाकांचं लग्न मात्र ती हयात असतानाच झालं. यालाच म्हणतात नियतीचा खेळ.

  • बेभान

    जेमतेम पाच फूट उंची . स्वच्छ पॅन्टशर्ट . डोक्यावर कॅप . मधूनच ती कॅप हातात घेऊन हलवण्याची मग डोक्यावर किंचित तिरपी ठेवण्याची सवय . कॅप काढल्यावर दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि मिश्किल चेहरा …

  • कृष्णाकाठच्या कथा…. खेळ सूर पारंब्याचा

    मी शाळा शिकत असताना अभ्यासाबरोबर साहित्याचे लेखन सुद्धा करीत असे. बालभारती पुस्तकातील धडे किती सुंदर असतात यामुळे मला एक लिहिण्याची उर्मी येत असे. आपणही थोडेफार लेखन करावे असे माझ्या मनाला मनोमन वाटत होते. शाळा शिकत असतानाच नाटकात काम करण्याचा छंद मला लागला होता व भजनात सुद्धा माझे मन गुंतत होते. वडील जिवंत होते तोपर्यंत मी अधून मधून लेखन करीतच असे.

  • जुळेवाडी तील ज्येष्ठ नागरिक

    जुन्यातील काही माणसे सर्विस मधून रिटायर झालेली दुपारी चार नंतर फिरायला आलेली मला दिसली. त्यातील काही माणसांनी मला ओळखले आणि आठवणी जाग्या झाल्या. आमच्या गावांमधून रेल्वे लाईन जाते पलीकडे बुरुंगवाडी अलीकडे जुळेवाडी व काही अंतरावर हजारवाडी. या गावातील माणसे जुळेवाडी तील प्रत्येक घरटी माणूस ट्राफिक डिपारमेंट इंजिनीरिंग डिपारमेंट. व बुरुंग वाडीतील बहुता श लोक इंजीनियरिंग डिपार्टमेंट मध्ये काम करतात तर हजार वाडी येथील घरटी एक दोन माणूस टेलिफोन खात्यामध्ये काम करीत होते.

  • अजब न्याय नियतीचा – भाग ३

    तोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, “नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत.

  • भय (अलक)

    दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. माझ्यासाठी दार उघडून, कांही तरी पुटपुटत, मोकळे केस सोडलेली, आई देवघराकड़े जात होती.

  • आर्यावर्तातील प्राणत्यागी विहंग 

    अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता .

  • त्याच्या पत्नीची मृत बहिण (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३०)

    असे अनेक कलाकार, साहित्यिक, सिने दिग्दर्शक, चित्रकार होऊन गेले की ज्यांची एखादी निर्मिती लोकांनी डोक्यावर घेतली व पुढे तो तशीच उत्तम निर्मिती न केल्यामुळे नामशेष झाला. कांही “वन फील्म वंडर” नट, दिग्दर्शक होऊन गेले. लेखकाने ही गोष्ट ह्याचा उपहास करण्यासाठी लिहिली आहे. सारखीच उच्च दर्जाच्या निर्मितीची अपेक्षा चुकीची आहे, हे त्याला सांगायचं आहे. “लेडी आॕर टायगर” (वाघ की सुंदरी) ही पूर्वी आलेली कथा फ्रँक स्टॉकटनचीच आहे.