(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • नक्षत्रांची वेल

    नेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली .
    बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .

  • उल्लू टिल्लू बेडूक (संक्षिप्त रूपांतरीत कथा २२)

    ह्या राजा जेवढा विनोदप्रिय होता, तेवढी विनोदप्रियता असलेल्या दुस-या कुणा व्यक्तीबद्दल मी कधी ऐकलं नव्हतं. त्याचे जगणंच विनोदासाठी होतं असावं. त्याची मर्जी कमवायची असेल तर विनोदी गोष्ट त्याला ऐकवायची. त्यामुळे त्याचे जे सात मंत्री होते ते सगळे उत्तम विदूषक होते.

  • खळगी

    अटक स्त्रीला आपल्याला अटक झाल्याबद्दल सोयर सुतक काहीही नसे. आपण उघड्यावर पडलो नाही यावरच ती समाधानी. दिवसभरात जामिनावर कोणीतरी सोडवायला येइल याची तिला खात्री असायची.
    त्यावेळी स्त्री अरोपींसाठी कुर्ला पोलिस ठाण्यात पोलिस कोठडी नव्हती.

  • वेगळा (कथा) भाग ४

    नेहमी प्रमाणे बाबू शाळेत अशोकला भेटत होता , आणि कधी कधी तो त्याची इच्छा नसताना देखील अशोक सोबत डोंगरावर जाई, त्याला कळत नसे हे दोघ इतक्या लांब येऊन का भेटतात ते पण चोरून काय गरज असेल , आणि मुळात मला लांब का बसवतात , एकदा बाबू असाच अशोक सोबत गेला असताना बराच वेळ अशोक आणि सरिता बोलत बसले होते , बाबुला बसून बसून पाठीला रग लागली म्हणून तो उठला त्याने त्याचे दोन्ही हात वर ताणून धरले आणि त्याच वरच शरीर उजव्या बाजूला ताणल आणि अचानक त्याच लक्ष अशोक आणि सरिता कडे गेल , आणि पाहतो तर काय अशोक आणि सरिता एकमेकांना मिठी मारून बसले होते , त्याने लगेच त्याची नजर फिरवली , का जाणे त्याला आपण काहीतरी चुकीच पाहिलं म्हणून अपराध्या सारख वाटायला लागल , तो तसाच सुन्न अवस्थेत बसून राहिला , आणि काही वेळातच अशोक ची पाठीवर पडलेली थाप पडताच भानावर आला.

  • RUB ने बना दी जोडी

    “याला” त्याच्या desk वरून “ती” दिसायची … department वेगळं होतं म्हणून कामानिमित्त कधी बोलायची वेळ नाही आली … पण जाम आवडायची … ती सुद्धा अधून मधून डोकवायची … थोडा अंदाज तिलाही आला होता … हा मात्र बुजरा … कधी बोलू – कसं बोलू ?…या विचारात दिवस संपून जायचा

  • आत्महत्त्या…

    विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते तो पेपर समोरच्या टेबलावर ठेऊन पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाजात रमेश उभा असतो त्याला आत घेताच…

  • अजब न्याय नियतीचा – भाग ७

    आरूने तिचे शेड्युल पाहून १२ ते १५ फेब्रुवारी या तारखा गांवी जाण्यासाठी नक्की केल्या. जाण्यापूर्वी तिला तिच्या पूर्ण ऑर्केस्ट्रामधील इतर मित्रमंडळींना प्रॅक्टिस संबंधी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. चार-पाच दिवसांसाठी ट्रीपला जात असल्यामुळे घरातील इतर गोष्टींची व्यवस्था लावायला हवी होती. गांवी लागणाऱ्या वस्तूंचे शॉपिंग करायचे होते.

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ११

    निशाने त्याच्या हाताला जोरात हिसडा दिला, “Please रोहन, तू माझ्या अंगाला हात लावू नकोस. आणि माझ्या मागेही येऊ नकोस.  मला तुझं काहीच ऐकायचे नाही. जाऊदे मला. Don’t touch me, Don’t touch me”

  • आयुष्य

    स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही.

  • टेलर मामा

    ग्रामीण भागामध्ये माणसांच्या जवळ पैसा भयंकर कमी आहे. तरीपण त्यांची जगण्याची धडपड अतिशय मोठी आहे हे मला जाणवत होते पोटासाठी मिळेल ते काम प्रामाणिकपणे गावातील बरीच मंडळी करत होती. पोटासाठी किती मोठी धडपड फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी. तर काही जण म्हणत असत माणसाचा जन्म पुन्हा नको संसारातील यातना सारे दुःख आणि दुःख. या दुःखातून कधी सुटका होते या विचारात ग्रामीण भागातील माणूस पूर्णपणे अडकून पडला होता.