नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

रमेश पोतदार आणि सविता पोतदार यांची एकुलती एक मुलगी, सधन कुटुंबात लाडात वाढलेली, आजच्या ग्लोबल जगात हि तिने मर्यादा व सुसंस्कृत पण सोडला नव्हता, तसे दोघांनीही तिच्यावर केलेल्या संस्काराचा विसर पडला नव्हता तसे सर्व गुण तिच्या अंगात मुरलेले होते. तिचे पाय नेहमीच जमिनीवर होते

रत्नागिरीकर भाग्यवान, कारण स्वातंत्र्यदेवतेचा साक्षात अवतार या भूमीत राहून गेला . ज्याच्या कर्तृत्वाला , त्यागाला , विजिगीषू वृत्तीला देशभक्तीला , दूरदृष्टीला , विज्ञानवादी दृष्टिकोनाला , साहित्याच्या सर्व प्रांतात निष्ठेने दिलेल्या योगदानाला , जिद्दीला, साहसाला आणि अतुलनीय अशा त्यागमूर्तीच्या अविस्मरणीय कर्तृत्वाला प्रतिमा प्रतीकं आणि शब्दात साकारणं म्हणजे गगनाला गवसणी घालण्याएवढं अवघड काम !
आपण सूर्याच्या दाहकतेला स्पर्श करू शकत नाही, पण क्रांतिसूर्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
कारातीर्थाचे
दर्शन घेऊन मनोमन कृतज्ञता व्यक्त करू शकतो ना ?
२६ फेब्रुवारी ही क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी !
आपण सर्वांनी रत्नागिरीच्या तुरुंगात निर्माण झालेल्या कारातीर्थाला जायला हवं . दर्शन घ्यायला हवं . मनोबल जागवायला हवं . वाढवायला हवं .
सावरकर अभिवादन यात्रा आणि सावरकर विचार यांची एक चळवळ सुरू व्हायला हवी.
आपलं हे कर्तव्यच आहे, आपण आपल्या कुटुंबियांसह दर्शन घ्या.
स्मार्टफोन मध्ये गुंतलेल्या आपल्या तरुण पिढीला सांगा…
रत्नागिरी बाहेर असलेल्या सर्वाना, येणाऱ्या पर्यटकांना, पाहुण्यांना, महाराष्ट्रातील सर्वाना सांगा…
रत्नागिरीत कारातीर्थ आहे,त्याचं दर्शन घ्या, तिथे असलेल्या बेड्या, साखळदंड यांना कृतज्ञतेने स्पर्श करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्रतेने अभिवादन करा.
नाती असावीत देवाला दाखविलेल्या नैवेद्याच्या पानासारखी. नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं कारण प्रत्येक पदार्थ करताना ते वापरलेलं असतंच. हे चवीपुरतं मीठ असावंच लागतं.. काही नाती या मीठासारखीच जीवनाला चवदार बनवतात..

बाबूने दिलेल्या ५० रुपयाचा बायडावर नक्कीच परिणाम झाला होता कारण आता तो तिला दिसला कि निदान त्याला ती एक स्मितहास्य देत होती, बाबू ची छाती त्यावेळी नाही म्हंटल तरी थोडीशी फूगत असावी कारण तो कामावर गेल्यावर दिवसभर अगदी खुशीत असायचा , मालकाला देखील शंका यावी इतका खुश.
सर्वसाधारणपणे सिनेरसिकांना, या दोघींमध्ये सुश्मिता आवडते. कारण ती आपल्यातील वाटते. उलट ऐश्वर्या ही सुंदर असली तरी एखाद्या कचकडी बाहुलीसारखी वाटते. तिचं सौंदर्य हे संगमरवरी पुतळ्यासमान वाटतं.. सुश्मिता ही हाडामासाची रेखीव शिल्प वाटते.. शेवटी काय, दोघीही गोडच आहेत.. एक पुन्हा पुन्हा घ्यावी अशी खीर, तर दुसरी तब्येतीला जपून मागावी, अशी बासुंदी!!
सकाळी मोकळ्या रस्त्यावरून चालताना विजय कविताला म्हणतो,’ मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे ! ‘ ते ऐकून दोघेही एका झाडाखाली थांबतात…

काँग्रेस सरकारने आणिबाणी लावली त्यावेळी मी बी.एस.सी फायनल ला होतो. माझा मित्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता डॉ. गिरीश वेलणकर हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. आम्ही दोघांनी आपापल्या घरी सांगितले की या वेळी आम्ही ही परीक्षा देणार नाही. आणिबाणी विरुद्धच्या या लढ्यात यापुढे आम्हाला अटक किंवा काहीही होऊ शकते.
ऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली. पैकी वॉलमार्ट आणि कोस्टको हे मॉल भव्य. वॉलमार्ट तर जगातलं प्रथम क्रमांकावरील रिटेलर आणि कॉस्टको नंबर दोन वर! कॉस्टको हे होलसेल मल्टिनॅशनल चैन! यांचे टाचण्या पिना पासून पेट्रोल पम्पा पर्यंत प्रॉडक्ट आहेत. कॉस्टकोत किमती मला तरी कमी वाटल्या, पण लॉट्स मध्ये घेतले तर. व्हरायटी वॉलमार्टच्या मानाने कमीच होती.
– एसटी थांबली . मी उतरलो . घरी निघालो . रात्र झाली होती . घाटी चढताना मी सहज घराकडे नजर टाकली . आई बॅटरी घेऊन पायरीवर बसली होती . सायसाखरेची वाटी माझी वाट बघत होती …

विजय आणि यामिनी बाहेर फिरून रात्री उशिरा घरी येतात… घरातील बंद केलेले दिवे सुरु करतात आणि सोफ्यावर बसतात…
Copyright © 2025 | Marathisrushti