(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ५

    कलकत्याहून येताना बिपीन साहेबांची स्वारी एकदमच खुशीत होती, कंपनीला मोठाली बरीच कामे मिळाल्याने भरभराटीचे दिवस उगवले होते. येताना संगीताला बंगाली साड्या, गाऊन, गळ्यात घालायच्या मण्यांच्या माळा, मौशूला ड्रेसेस, खेळणी, विवीध प्रकारच्या बंगाली मिठाया, खैरातच केली होती.

  • तिसरी पोळी

    मला पाहताच त्याने घट्ट मिठी मारली व आपल्या अश्रूंना वाट करुन दिली. मी त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो. त्याच्या सुनेनं, आम्हा दोघांना चहा आणून दिला. त्याचा मुलगा कामासाठी बाहेरगावी गेला होता. शहराच्या उपनगरात प्रदीपच्या मुलाने प्रशस्त फ्लॅट घेतला होता. आमचं दुपारचं जेवण झालं.

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ८

    त्या दिवशी रिसेप्शन वरून परतायला उशीर होईल म्हणून ते गाडीवरूनच गेले होते. येताना त्यांच्या अंदाजापेक्षा जरा जास्तच उशीर झाला. रात्री घरी उशिरा पोहोचलो तर झोपायला उशीर होईल आणि सकाळी उठायला उशीर झाला तर कामावर जायला उशीर होतील या विचाराने रात्रीचे ११ वाजलेले असताना देखील त्यांनी या रस्त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला.

  • रात्र अजून भिजत होती !

    …… तशा हि परिस्थितीत शशांकचे लक्ष गादीजवळच्या लाईटच्या पोलवरील ‘पोल क्रमांक १७’ने खेचून घेतले. जणू ‘आहे ना लक्षात हा क्रमांक?’ हाच प्रश्न तो हि शशांकला विचारत होता! जन्मजात एक पाय विकसित न झालेलं, दोन्ही डोळ्याच्या पापण्या नसलेलं कुरूप मुलं शशांक(आणि शिखातरी) कस सांभाळणार होता? म्हणून त्याने शिखास ‘मृत मुलं’ जन्मले म्हणून सांगितले होते.

  • नानाऽ करते

    विजया मेहतांच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या व्यावसायिक नाटकात त्याने सत्तारची भूमिका साकारली तर ‘पुरुष’ या नाटकात, गुलाबराव साकारला.. ‘पुरुष’ नाटक सादर करताना काही अतिउत्साही प्रेक्षक नानाचेच संवाद ऐकण्यासाठी इतर कलाकारांच्या सादरीकरणाचे वेळी थिएटरमध्ये गोंधळ घालायचे, अशावेळी तो व्यथित होत असे.

  • वर्‍हाडातली गाणी – ७

    आला गं सासरचा वैद्दय

    हातात काठी जळक लाकूड

    पायात जोडा फाटका तुटका

    नेसायचं धोतर फाटक तुटक

    अंगात सदरा मळलेला

    डोक्यात टोपी फाटकी तुटकी

    तोंडात विडा शेणाचा

    कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी

    गं बाई म्हायरावाणी

    आला गं माहेरचा वैद्दय

    हातात काठी पंचरंगी

    पायात जोडा पुण्यशाई

    नेसायचं धोतर जरीकाठी

    अंगात सदरा मलमलचा

    डोक्यात टोपी भरजरी

    तोंडात विडा लालेला

    कसा गं दिसतो बाई राजावाणी

    गं बाई राजावाणी

  • चिकमावगा (ॲम्ब्रोज बिअर्स याची एक कथा)

    तरूण असतांना त्याचा बाप सैनिक म्हणून पाशवी जमातींशी लढला होता व त्याने देशाचा झेंडा दूरवर फडकवला होता. मळ्यावरच्या शांत जीवनांतही त्याच्यातल्या सैनिकाची धग जिवंत होती कारण एकदा पेटलेला तो अंगार कधीच विझत नाही. त्याला युध्दाची चित्रे असलेली पुस्तक आवडत आणि ती पाहून मुलालाही इतकी समज आली होती की त्याने लाकडी फळीची तलवार केली होती; अर्थात वडिलांना कदाचित ती तलवार वाटली नसती. आता तो मुलगा त्याच्या शूर जमातीला शोभेशा धीटाईने ती तलवार हातात धरून थांबत, हवेत फिरवत, पवित्रे घेत चालला होता. त्याला सहजतेने ह्या अदृश्य शत्रुंवर विजय मिळत होता. त्यामुळे त्याने शत्रुचा पाठलाग करत पुढे पुढेच जात रहाण्याची, सर्व सेनांनीकडून नेहमीच घडणारी, चूक केली आणि तो एका उथळ ओढ्याच्या कांठावर येऊन पोहोचला; त्याच्या कल्पित शत्रुने तो ओढा सहज वाऱ्याच्या गतीने पार केला होता. समुद्र पार करणाऱ्या त्याच्या जमातीची विजिगीषु वृती त्याच्याही लहानशा हृदयात धडधडत होती. त्याने त्यात मोठे दगड वगैरे शोधून काढून त्यांच्या आधाराने धडपडत तो ओढा ओलांडला व परत शत्रुचा पाठलाग सुरू केला.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ४५ )

    विजय आज कोणत्यातरी मालिकेचे प्रमो ! पाहत होता. ज्यात एक नवरा आपल्याला हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून वडाला प्रदक्षिणा घालताना दाखविला होता. तो प्रमो ! पाहून विजयला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं कारण कालच विजय त्याच्या एका मित्राला त्याच्या कारखान्यात भेटायला ,. गेला होता… तो मित्र विवाहित आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगाही आहे. बायकोही दिसायला खूप सुंदर ! सुंदर म्हणजे इतकी सुंदर की एखाद्या शिल्पातील स्त्री जितकी सुंदर असते तितकी ! तरी तो माणूस बाहेरून येणाऱ्या – जाणाऱ्या मुली डोळे फाडून पाहत असतो…बोलता – बोलता त्याने लग्नानंतरही एक मुलगी कशी त्याच्या गळ्यात पडत होती त्याची रसभरीत कहाणी सांगितली

  • माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)

    माझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला “तेंडोलकर युनिव्हर्सिटी” म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज नव्हते, त्यामुळे कोंकण, सातारा, इथले सर्व विद्यार्थी तिथेच येत. महाविद्यालयीन अभ्यासाबरोबरच कसं रहावं, कसं वागावं, ह्याचे धडे त्यांना तेंडोलकरांच्या घरी मिळत. त्यामुळे ते आपलं शिक्षण तेंडोलकर युनिव्हर्सिटीत झालं आहे असं अभिमानाने सांगत. पहिली गोष्ट तिथे शिकवली जाई ती म्हणजे काम करणे महत्त्वाचे. तिथे राहिलेल्याला पुढे आयुष्यात कधीही कोणतेही काम करायला लाज वाटायची नाही. आजोबा स्वतः श्रमप्रतिष्ठा आचरणारे होते. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ खर्च न करणे. छानछोकीवर पैसे वाया न घालवणे. तिसरी गोष्ट निर्व्यसनीपणा. कोणतेही व्यसन लावून घ्यायचे नाही.

  • रेशीमगाठी – भाग ४

    पाच-दहा मिनिटांतच एक उंचीपुरी, गौरवर्णी, तरतरीत मुलगी आत आली. वेळेवर पोचतो की नाही यामुळे येणारा एक प्रकारचा अस्वस्थ भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. ती घाईने क्लार्ककडे आली आणि तिने विचारलं, “का हो, कुणी केदार देशपांडे आले आहेत का?”