(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • मेन इंजिन

    जेव्हा पासून समजायला लागले तेव्हापासून अलिबाग मधील मांडव्याला मामाकडे जाताना, भाऊच्या धक्क्यावरून रेवस धक्क्याला जायला लाँच मध्ये बसल्यावर त्या लाकडाच्या लाँच मधील डिझेल व इंजिनच्या धुराच्या वासाने आणि इंजिन च्या घरघरने त्रास किंवा इरिटेट होण्याऐवजी गंम्मत वाटायची आणि मजा यायची.

  • भाऊबीज

    डोळ्यासमोर घड्याळातील काटे ‘आठ पंचवीस ‘ची वेळ दाखवत होते आणि डोक्यामध्ये ” आता ही नोकरी जर नाही मिळाली तर परत घरात पाऊल टाकू नकोस, तिकडेच तोंड काळं कर ” हे आप्पांचे शब्द घुमत होते, अश्या परिस्थितीत साडे आठची मुंबई ला जाणारी उद्यान एक्स्प्रेस पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने संजीव प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कडे पळत सुटला होता… तेव्हढ्यात ट्रेन चा भोंगा वाजला अन ट्रेन हलली, हातातली बॅग सांभाळत त्याने समोर दिसलेल्या दरवाज्यातून अक्षरशः स्वतःला आत झोकून दिलं.

  • डासांचं बेट (कथा)

    हातात धरलेला पेपर सुटून खाली पडला. हाताला कुणीतरी जबरदस्त चावा घेतला होता. इतक्या स्वच्छ, नवीन विमानतळावर काय चावणार ? उजेडात काही दिसलं नाही. पण आजूबाजूचे प्रवासी चुळबुळ करताना दिसत होते. त्यता प्रखर प्रकाशात इतस्तत: फिरणार इवले इवले डास दिसत नव्हते. पण चावत होते.

  • गँगमन (कथा)

    मैलोगणिक पसरलेल्या रेल्वे रुळांच रक्षण करुन ते व्यवस्थित ठेवायचे. म्हणजे ऊन-पावसात मैलोगणिक चालण्याची शारिरिक क्षमता हवी. इतकं चालणार कोण ? दिवसाकाठी दहा मैल डोंगरकपारी तुडवणारा आदिवासी या कामाला योग्यच होता. पण शहरापासून बिचकून राहणारा हा लाजाळू माणूस गँगमन म्हणूनकाम करायलाकसा तयार झाला कुणास ठाऊक.

  • पाठलाग

    लग्नाचा वाढदिवस संपला. पार्टी आणि पाहुणे हे सोडून ते दोघे आज एकमेकांशी काहीही वेगळं बोलले नव्हते. इतका खास दिवस पण तोही रोजच्यासारखा आला आणि गेला. सईला झोप येईना. ती हॉलमध्ये आली…. मागची सारी वर्षे आज तिच्यापुढे उभी राहिली होती. ती विचार करत किती तरी वेळ बसुन राहिली.

  • एका कुटुंबाची गोष्ट – भाग १ (आठवणींची मिसळ २७)

    अण्णांच्याबरोबर पाच नंबरचा भाऊ (चंदू) अंधेरीला रहायला आला. पहिल्या पाच भावात केवळ तोच मॕट्रीक पास झाला. तो नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी त्याच्या एका मित्राला दोन नोकऱ्यांचे कॉल आले. एक रिझर्व्ह बँकेतून आणि एक खाजगी कंपनीमधून. मित्राने रिझर्व्ह बँकेची नोकरी स्वीकारली. दोघांचे आडनांव एकच होते. आद्याक्षरे मित्राची जी.एन. आणि ह्याची सी.एन. होती. त्यांचे कॉल लेटर घेऊन हा खाजगी कंपनीत गेला आणि त्याला ती नोकरी मिळाली.

  • वृक्षारोपण !

    जगन्या शिपाई माणूस. तरी त्याच्याकडे अत्यंत महत्वाचे काम होते. साहेबांच्या हातून वृक्षारोपणा करावे, हि सूचना त्यानेच मांडली होती आणि अपेक्षे प्रमाणे ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. वृक्षारोपणाच्या तयारीची जवाबदारी त्याच्याच खांद्यावर येऊन पडली!

  • रेशीमगाठी – भाग ३

    “देशपांडे साहेब, तुमची बॅग माझ्याकडे आलीय. त्यात तुमचा जेवणाचा डबा होता. त्यावर तुमचं नाव आहे किशोर देशपांडे म्हणून. त्यावरून मी हा टेलिफोन नंबर शोधला. ती बॅग आणि डबा घेऊन तुम्हाला भेटायला येतो साहेब!”

  • गेट टुगेदर 

    शाळेच्या ग्रुप चे आधी रियूनियन आणि मग नियमित – अनियमितपणे होणारी गेट – टुगेदर हा दिलासा असतो , हुरहुर असते की अंतर्शोध – अंतर्नादाला निमंत्रण असते ? हा प्रश्न अलीकडे फार वेळा पडतो मला ….

    तू गेट -टुगेदरला असलास तरी आणि नसलास तरीही …

  • शरीफ’ बदमाश

    तेव्हा ग्रेगरी पेकच्या घोड्यावरती सोनं भरलेल्या पिशव्या असतात व ओमर शरीफच्या पिशव्यांत असतात फक्त दगडं.. या चित्रपटात ओमर शरीफनं ‘बदमाश’ खलनायक रंगवला होता…