नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

यथावकाश मला माझं भुत किंवा भुतं भेटली. आतापर्यंत मी लेखक बेसंट यांना पाठींबा देत होतो पण आता विरोध करतो. आपण त्या बंगल्याला ‘खटमल’ बंगला म्हणू. ज्याची कातडी नरम आहे त्याला डाक बंगल्यात रहायचा अधिकार नाही. त्याने लग्न करावं. तो बंगला जुना, घाणेरडा, दुरूस्ती न केलेला होता. भिंती खराब होत्या, खिडक्या काळ्या पडलेल्या होत्या. तिथे आसपास बरेच कचेरीतले मामुली अधिकारी, अर्थखात्यापासून ते जंगल खात्यापर्यंतचे, रहात पण कुणी गोरा साहेब नव्हता. वयाच्या दुप्पट वांकलेल्या खानसाम्याने हे मला सांगितलं. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा वारा आणि पाऊस होता आणि बाहेरच्या पामच्या झाडांचा हाडे आपटावीत तसा आवाज येत होता. माझं आगमन खानसाम्याला आवडलं नसावं.

मुंबई नुसती बुडून जाऊ शकते असे नाही, तर जळून भस्मसात होऊ शकते. ही सगळी चर्चा ऐकून भिजलेल्या शरीरावर काटा उभा राहिला. जगबुडी वर्तवणाऱ्या त्या गप्पा सोडून दिल्या तरी वेडेपणातही काही शहाणपणा होता. बुडणाऱ्या मुंबईला वाचवणार कोण?
गेल्या दोन दिवसान पासून सूर्य दर्शन नाही. बाहेर पावसाची रिप रिप सुरु आहे. हवेत सुखद गारवा आहे. अशी बाहेर पाऊसाची झड लागली कि मी अंतर्मुख होतो. आत्ताही एकटाच हाती कॉफीचा मग घेवून, खिडकीबाहेरचा पाऊस आणि गार वाऱ्यात ओले झालेले त्याचे तुषार चेहऱ्यावर झेलताना होणारा अल्ल्हाद एन्जोय करतोय. काळ्या – निळ्या ढगांनी भरून आलेलं आभाळ, त्या पावसाच्या रेशमी सरी, कॉफी आणि हेडफोन मधून एकू येणार ‘ रिमझिम के तराने लेके आई बरसात ‘ हे गाण!(रफी + गीतादत्त ), या क्षणा साठी मी स्वर्गसुख सुद्धा लाथाडीन!. पावसा पेक्षा पावसावरची गाणीच ज्यास्त असतील. पण या गाण्यात मी गुतलोय. मला ते खूप आवडत. कारण मलाही कोणाची तरी ‘ पहिली मुलाकात ‘ याद येत.

चंदन वृक्षाच्या उपवनात एखादं बाभळीचं झाड़ जरी उगवलं तरी त्या बाभळीच्या झाडाला देखील चंदनाचा गंध येतो .! हाच सहवासाचा परिणाम असतो..! माझ्यासारख्या अगदी सर्वसामान्य व्यक्तीबाबत तेच घडलं !!! हा माझा दैवयोग !!
पंचावन्न वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. कोल्हापूरमधील एका माध्यमिक शाळेच्या वर्गात, मागच्या रांगेतील बाकावरील मुलं दंगा करीत होती. वर्गात सर आले, त्यांनी पाहिलं की, मागे बसलेल्या खोडकर मुलांमध्ये एक मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे.. त्यांनी त्या मुलाला शिक्षकांच्या खोलीत बोलावले व तू त्या मुलांच्या नादी लागून, बिघडू नकोस असे समजावले. नंतर तो मुलगा पुढील बाकावर बसून, अभ्यासात लक्ष घालून जीवनात खूप यशस्वी झाला!! तो बंडखोर मुलगा म्हणजेच ‘आकाशवाणी, पुणे’चे सुप्रसिद्ध निवेदक, विनोदी एकपात्री कलाकार, विडंबन गीतकार, कवी, विनोदी लेखक.. बण्डा जोशी!!

आम्ही विहिरीपाशी पोहोचलो तेव्हा, राजसाहेब जरी विहिरीत पडले तरी त्यांना फारसं लागलं नसावं याचा आम्हाला अंदाज आला आणि अर्धा तासांत गण्या अॅब्युलन्स, दोरखंड आणि माणसं घेवून आला आणि त्यांनी राज साहेबांना बाहेर काढले. सुदैवाने जाळी असल्यामुळे आणि त्यावर गवताच्या पेंड्यांचे थर असल्यामुळे, राजसाहेब इतक्या उंचीवरून पडले तरी त्यांच्या जीवाला धोका झाला नाही.
उंचेपुरे, कृश प्रकृतीचे प्राध्यापक डॉ. जोगदंडाच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते. त्यांनी विरळ होत जाणारे डोक्यावरचे पांढरे केस मागे वाळवून व्यवस्थित विंचरले होते, ते त्यांच्या रुबाबदारपणात भरच घालत होते. सैलसर कोट-पॅन्ट आणि पांढराशुभ्र शर्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होती.
पुन्हा, पुन्हा हे असच घडतंय ! मी फारसा आकर्षक चेहरा घेऊन नाही जन्माला आलो . यात माझा काय दोष ? मी कुरूप म्हणून काय मला प्रेम करण्याचा अधिकार नाही का ? या तारुण्यात मलाही कोणाचा तरी हात हाती घेऊन सूर्यास्त पाहावा वाटतो !
देशमुख त्यांचा मुलगा नंतर ऊर बडवून मीच बाबांना मारलं, त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि मी ॲसीडीटी झालीय समजून दुर्लक्ष केले, अस सगळ्यांना बोलत होता. पारकर साहेबांची आठवडाभरापूर्वी घडलेली घटना झटकन विराजच्या आईच्या डोळ्यासमोर तरळली.
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत, क्लिंट इस्टवुड सारखाच दिसणारा व त्याची हुबेहूब ‘कॉपी’ करणारा, फिरोज खान हा एकमेव कलाकार आहे!
Copyright © 2025 | Marathisrushti