नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

संत ज्ञानेश्वरांच्या या कवितेचे रसग्रहण – ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सामान्यांना न झेपणारे मार्ग आणि ज्ञानेश्वरांना तर सामान्यांचा कळवळा. ज्ञानेश्वरांनी सामान्यांना पटणारा, रुचणारा आणि झेपणारा असा जो भक्तिमार्ग त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले. ज्ञानेश्वरांना ‘गुरुमाऊली’ म्हणून संबोधले जाते. याचे कारण आईने जसे लहान मुलाला बोट धरून चालायला शिकवावे तसे त्यांनी जनसामान्यांना भक्तिमार्गावरून चालायला शिकवले. वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.
या कारागिरीमागे दत्तूचं एक कसब होतं. त्याला माणसाच्या डोक्याच्या घेरावरुन शरीरयष्टीचा परफेक्ट अंदाज होता.. त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहून, त्याची शरीरयष्टी स्मरणात ठेवून, तो कपड्याचं कटींग करायचा व मुलं शिवणकाम करायची. स्त्रियांच्या खांद्यावरील मापावरुन तो गळा, छाती व बाहीचं माप लक्षात ठेवायचा.. ती भूमिका डोळ्यासमोर आणून त्या त्या व्यक्तींचे कपडे त्यानं बिनचूक शिवून दिले.. पणशीकर खूष झाले, त्यांनी आवर्जून चारूकाकांचे आभार मानले.
मे महिन्यात घराचे बांधकाम सुरु झाले होते तशातच डिसेंबर महिन्यात आम्हाला दुसरे बाळ होणार आहे समजल्यावर आनंद झाला. किमया ताईने ह्यावेळी आपण कोणतीही रिस्क न घेता प्लॅन्ड सीझर करू त्यासाठी तिने तिच्या हॉस्पिटलला येणाऱ्या डॉ. रेखा थोटे यांच्याकडे कन्सल्ट करायला सांगितले, त्यांनी पण मागील डिलिव्हरीचे सगळे रिपोर्ट आणि हिस्टरी पाहिली आणि सीझरच करायचा निर्णय घेतला.

ही कथा सुरू होत आहे १९७२-७३ च्या काळात… तो काळ हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या राजेश खन्नाचा. तो त्या काळचा सुपरस्टार आणि जोडीला चटपटीत गोल चेहऱ्याची मुमताज ही जबरदस्त हीट जोडी! ‘कटी पतंग,’ ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘आनंद’, ‘अपना देश’, ‘दो रास्ते’ सारखे जबरदस्त हिट सिनेमे देणारा आमचा हिरो राजेश खन्ना. जणू आमचे दैवतच! अपऱ्या नाकाची, फुगीर गोबऱ्या गालांची मुमताज साथीला आल्यावर सिनेमात प्रेमसरिता खळाळून वाहू लागायची. मग आमचा अवतारही काही वेगळा नव्हता…
तो तरूण त्याच्याच तंद्रीत होता, कल्याण आलंय आता ऊठुन उतरायला पाहिजे याचे त्याला भानच नसल्यासारखा तो बसून होता. त्याच्या खांद्यावर थाप मारून मित्रा कल्याण आलेय उतरायचे नाही का असं बोलावंसं वाटलं. त्याच्या दिशेन पुढे जाणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.

मला अजून आठवतं, मी विचारत होतो, परमेश्वर म्हणजे काय? तो खरेच अस्तित्वात असतो का? माझ्या प्रश्नावर मी खूष होतो. कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर तर्कशुद्ध पद्धतीनं देता येणार नाही असं मला वाटत होतं. एका अर्थानं एका पत्रकारानं एका आध्यात्मिक गुरूला विचारलेला तो प्रश्न होता. प्रश्नामागे उत्तर मिळविण्याच्या अभिलाषेपेक्षा समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करण्याचा इरादा अधिक होता.
वाचू आनंदे ‘चा आगळा वेगळा कार्यक्रम. संपूर्ण सभागृह भरलेले. व्यासपीठावर माईक समोर ती उभी . नाव मुक्ता . इयत्ता चौथी. आवाज खणखणीत . उभं राहण्याची , प्रेक्षकांकडे पाहण्याची आणि त्यांची दाद मिळताच किंचित स्वाभाविक झुकून नम्रपणे दाद स्वीकारण्याची एक विलक्षण शैली. देहबोली आत्मविश्वासाने भरलेली.

प्रसिद्ध लेखक मंगेश कदम आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये एसी फुल्ल असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. चेहरा सुद्धा आक्रसल्यासारखा दिसत होता. मेजावरच्या ऍश ट्रे मध्ये तीन मोठ्या गोल्डफ्लेक लाइट्स अर्धवट जळालेल्या अवस्थेत होत्या. चौथी सिगरेट अर्धवट पिऊन झालेली त्यांच्या बोटाच्या चिमटीत होती.

ती माझ्या लाइफ मध्ये आली ती एक ऍक्सीडेन्ट म्हणून. ती दिसायला मस्त होतीच पण तिचा मूळ गुण म्हणा , अवगुण म्हणा.. एन्जॉय लाईफ…

किसण्याच्या पाठीतून रक्ताचे थारोळे वाहायला लागले होते,वाघ त्याच्याकडे डरकाळी फोडत क्रूर नजरेने बघत होता. त्याच्या पंज्याने किसन्याचा शर्ट फाटला होता रक्ताने संपूर्ण माखला होता,कसातरी किसन्या उठण्याचा प्रयत्न करत असताना वाघाने पुन्हा त्याच्या दिशेने झडप घातली.
Copyright © 2025 | Marathisrushti