(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • महाराज सुध्दा बायकोस भ्यायचे..

    सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून तर निघाला नाही ना,याची खात्री करुन घेतली.

  • तुझसा’ नहीं देखा

    चैतन्य महाप्रभु’ चित्रपटात तिच्यासोबत आशा पारेख होती. ‘गुंज उठी शहनाई’ चित्रपटात आधी आशा पारेखच काम करणार होती, ऐनवेळी ते काम अमिताला मिळालं. चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. चित्रपट नायकप्रधान असल्याने प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. फक्त राजेंद्र कुमार!!

  • जिंदगी धूप, तुम घना साया

    १९८१ साली प्रदर्शित झालेला ‘चष्मेबद्दूर’ हा हलका फुलका, अप्रतिम चित्रपट आहे. तो अगदी आजही पाहिल्यावर ‘रिफ्रेश’ झाल्यासारखं वाटतं. त्यातील ‘कहासे आये बदरा..’ हे गाणं गाणारी दिप्ती नवल ही अभिनेत्री न वाटता, आपल्या जवळपासच राहणारी साधी मध्यमवर्गीय मुलगी वाटते.

  • घोडे व्यापाऱ्याची मुलगी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ८)

    हॉर्स डीलर्स डॉटर ही जरी लघुकथा असली तरी ती ६५५० शब्दांची आहे. (मी रूपांतर २२४५ शब्दांत केलं आहे). औद्योगीकरणाच्या लाटेत अनेकांचे व्यापार बसले. तसा ह्या कुटुंबप्रमुखाचाही धंदा बसला. नंतर तो मरण पावला. धडधाकट पण कुचकामी तीन मुलगे आणि हिंमत न हरतां कृतीशील रहाणारी मुलगी शेवटी दारिद्र्यांत एकटी पडते, तेव्हां आत्महत्त्येचा निर्णय घेते. योगायोगाने एक तरूण तिला वाचवतो आणि ती त्यालाच जबरदस्तीने प्रेमिक करून त्याचा आधार घेते. तिचे त्याच्यावर प्रेम आहे/होते असा उल्लेखही नाही. स्त्रीची अपरिहार्यता त्यांत अधोरेखित केली आहे. इंटरनेटवर ह्या गोष्टीची अनेक परीक्षणे वाचायला मिळतील. त्यांत “रद्दी” पासून “अत्त्युत्तम” पर्यंतचे सर्व प्रकारचे मूल्यमापन आहे. ही कथा समजायला कठीण आहे. घोडे व्यापा-याशी संबंधित म्हणून अनेक ठीकाणी घोड्यांचा, घोड्यांच्या शरीराचा, हालचालींचे अनेक उल्लेख आणि माणसाचे पशुच्या स्तरावर जगणे ह्याचे उल्लेख आले आहेत. औद्योगीकरणामुळे कुटुंबातील व्यक्तींतला जिव्हाळा संपला आहे, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो आहे, हे प्राणीसदृश वर्तन दर्शवले आहे. माझ्या रूपांतरीत कथेच्या व्याप्तीत (तरी ती १५००ची मर्यादा सोडून दीडपट झाली आहे) ह्या सर्व गोष्टी तितक्या समर्थपणे दाखवणे कठीण होते. पण मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व कथा तुम्हांला सादर करत आहे.

  • सब की पसंद ‘निरमा’

    अगदीं सुरुवातीला सरकारी जाहिराती असायच्या त्यानंतर कमर्शियल जाहिराती सुरु झाल्या. त्यासुद्धा प्रमाणात असायच्या. आजच्यासारखा त्यांचा भडीमार नसायचा.

  • भातुकलीच्या खेळामधली

    भानूचं खरं काम पहायचं असेल तर ‘श्री ४२०’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘आम्रपाली’ हे चित्रपट पहावे लागतील. ‘आम्रपाली’ मधील वैजयंतीमालाला दिलेली पौराणिक वेशभूषा कालातीत आहे.

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ८)

    मला थोडेफार संत माहिती होते परंतु डॉ. मामा मोडक यांनी मला संतांचे 100 आयकार्ड साईज फोटो व त्यांची नावे माझ्या घरी आणून दिली होती. 92 वर्षांच्या डॉ. मामा मोडक यांचा हा उत्साह मला संतचित्रे काढण्याची प्रेरणा देवून गेला. तेंव्हा पासून किमान १०० संतांची तैलचित्रे काढण्याचा मी संकल्प केला

  • तेरी मेरी ‘कहानी’ है…

    गेल्या रविवारी रात्री टीव्ही वर ‘इंडियन आयडाॅल’ कार्यक्रम पाहत होतो. प्यारेलाल सपत्नीक आलेले होते. त्यांची एकाहून एक सरस गाणी नवे गायक गात होते. काही वेळाने व्हिलचेअरवरुन एका व्यक्तीला स्टेजवर आणले गेले. ते होते ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद. सहस्त्र चंद्रदर्शन करण्याच्या वयामध्ये आपल्या एकमेव चांदणीसह (नातीसह) त्यांनी संवाद साधला. परिस्थितीने गलितगात्र असताना देखील स्वाभिमानाने नेहा कक्करने देऊ केलेली पाच लाख रुपयांची मदत नाकारली. जेव्हा तिने एका ‘नाती कडून ही भेट’ समजा, असे विनवल्यावर मदत स्वीकारली. ‘एक प्यार का नगमा है…’ ह्या गाण्यामध्ये त्यांनी त्यांचाही आवाज मिसळला. ते जे काही बोलले, ते ऐकून अनेकांना अश्रू अनावर झाले…

  • कॅालेज कट्टा

    आजच्या कॅालेजियन्सचा ट्रेंडच आगळा
    त्यांचं कॅालेज जीवन म्हणजे,
    एक अजब सोहळा

    फ्रेंडशिप डे, ट्रेडिशनल डे, रोझ डे,
    उरलाच वेळ तर स्टडी डे
    कॉलेजात निवडणूकांचे, वाजवीपेक्षा प्रस्थ,
    युवामहोत्सव, नाटयमहोत्सव,
    घरच्या कार्यापेक्षा जास्त

    बापाच्या पॉकेटमनीवर खर्चाची मदार,
    पोरींना घेऊन पोरं बाईकवर स्वार
    SMS चा चाळा, फॅशनचा लळा,
    हेच ह्यांचं रुटीन

    अड्डयासाठी कॉलेजचा कट्टा आणि कॅटीन
    नावापुरता असतो ह्यांचा, वर्गामध्ये अॅटेंडन्स,
    क्लासेसच्या जीवावर, टक्क्यांचा कॉन्फीडन्स

    कॉलेजचे प्रोफेसर्स तर
    ह्यांच्या जणू खिशात,
    धाक आणि आदर,
    शब्दच नाहीत कोषात

    अश्शी आजची कॉलेजची, तर्‍हाच आगळी,
    वरच्या पिढीला
    ती नेहमीच वाटणार वेगळी
    नेहमीच वाटणार वेगळी

    -- सौ. अलका वढावकर

  • भयानक स्वप्न !

    रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज.