नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

प्रत्येक पोराला ‘पराठे’ आणि मुलींना ‘कराटे’ आले पाहिजेत. हि आजची गरज होऊ पहात आहे. बेफिकीर मायबाप, मोकाट पोर, नवतारूण्याचा माज(जोश असायला हवा!) हे कोण अन कस आवरायचं? प्रश्न आपलेच आहेत. आज दारात असतील. उद्या घरात येतील! उत्तर शोधायला हवीत.

जेकबज् हा त्याच्या काळांत विनोदी प्रहसन म्हणजे फार्स लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता. तो अधूनमधून भय कथा लिहित असे. आजही तो “मंकीज पॉ” ह्या भयकथेसाठीच प्रसिध्द आहे. माणूस एखादी इच्छा करतो पण ती पूर्ण झाली तर परिणाम काय होतील याचा विचार करत नाही. ही कथा सुपरनॕचरल प्रकारांत मोडते. त्याने बऱ्याच कादंबऱ्या व लघुकथा लिहिल्या. त्यापैकी कांहीवर चित्रपटही आले. मंकीज पॉ ह्या कथेवर चित्रपट, नाटक, टीव्ही, इ. सर्व माध्यमांतून अनेक आविष्कार आले. मूळ इंग्रजी कथा ३८००हून अधिक शब्दांत लिहिलेली आहे. मी तिचं मराठी रूपांतर साधारण २३०० शब्दांत केलं आहे.

माझ्या एका कथेची ही जन्मकथा आहे . सन २००० च्या महाराष्ट्र टाइम्स च्या दीपावली अंकात ती प्रसिद्ध झाली होती .
जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला तर तो सात्त्विक स्वयंपाक होऊच शकत नाही. म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात, उदास असताना किंवा नाराज होऊन स्वयंपाक करु नये.

शांतनू सगळी तयारी दिलेल्या यादीप्रमाणे घेऊन आला. पुन्हा पुन्हा काही राहिलं नाही ना ते बघून तो बाईकवर बसला. तिथूनच त्याने शाल्मलीला फोन लावला. शाल्मलीने हसतच फोन उचलला. आणि त्याने काहीही बोलायच्या आत तीच बोलली, “ शालू, तू सांगितल्याप्रमाणे सगळं घेतलं आहे.
गोव्यामधील मडगाव हे छोटंसं निसर्गसुंदर गाव. गावातील एकमेव शाळेतील पाचवीचा वर्ग. वर्गावरचे मास्तर रजेवर असल्याने मुख्याध्यापक वर्गात आले. त्यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. पहिल्या बाकावरील एक मुलगा गोष्ट ऐकता ऐकता मुख्याध्यापकांचे पेन्सिलीने वहीमध्ये चित्र रेखाटत होता.

स्पृहाचं म्हणणं ऐकून घेईपर्यंत अनिकेतने कॉल कट केलासुद्धा. दुपारपासून स्पृहाचं डोकं धरलंय त्यात कालच गुडघा सुजलाय. हल्ली थोडी जरी चाल पडली तरी सुजतो. मग घ्या पेनकिलर. मग अॅसिडिटी, अपचन, डोकेदुखी. गेल्या दहा वर्षात या सगळ्या दुखण्याची सवय कशी झाली नाही शरीराला असा स्पृहा स्वत:ला प्रश्न विचारी.

साडेतीन मोहर्तातला पहिला गटारी अमावस्या , दुसरा शिमगा , तिसरा एकतीस डिसेम्बर आणि अर्धा एक जानेवारी . या मोहर्तावर थोडी का होईना घ्यावी असे ‘पिता मह दत्तू मामा ‘ यांची आज्ञा आहे . तसेच या प्रसंगी एखाद्यास तरी त्याची ‘दीक्षा ‘ जरूर देऊन हा ‘सम्प्रदाय ‘ वाढवण्यास साहाय्य भूत ठरावे , असेहि त्यांनी प्रतिपादन केले आहे . ‘दीक्षांताचा ‘ विधी पण त्यांनी आपल्या ‘मद्यानंद ‘ ग्रंथात लिहून ठेवला आहे . तो येणे प्रमाणे .

महाराष्ट्रातील वर्हाड भागात गायली जाणारी ही लोकप्रिय गाणी…
– एसटी थांबली . मी उतरलो . घरी निघालो . रात्र झाली होती . घाटी चढताना मी सहज घराकडे नजर टाकली . आई बॅटरी घेऊन पायरीवर बसली होती . सायसाखरेची वाटी माझी वाट बघत होती …
Copyright © 2025 | Marathisrushti