नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

आता अज्ञान दूर झाल्यावर विजयच्या मनात कोणाबद्दल काहीच शिल्लक नव्हतं. तो शांत झाला होता, अबोल झाला होता, तपस्वी झाला होता आणि भविष्य जाणता झाला होता… लेखक – निलेश बामणे

सजले कुठे शहर हे ? आली कुठे दिवाळी ?
अंधार माणसांची करतो किती टवाळी !
आमच्याकडे कुणी पहिल्यांदा आलं की, आम्ही त्याला ‘चंद्रविलास’ मध्ये घेऊन जायचो. त्यावेळी झोरेचे वडील गल्ल्यावर बसलेले असायचे. त्यावेळचे ‘चंद्रविलास’ जुन्या काळातील हाॅटेलचा एक उत्कृष्ट नमुना होते.

किस्ना पेंटर मंजे एक दिलदार अन तितकचं अवली व्यक्तीमत्व व्हतं.कुंचल्यानं जसे चित्रात रंग भरायचा तसेच जिवनात बी रंग वतायचा.त्यामुळं त्याचा गोतावळा लय मोठा व्हता.कुंचल्याच अन त्याच्या हाताचं एवढं घट्ट नातं व्हतं की त्यानं काढलेली चित्र अक्षरशः जिती व्हयाची.असा हा अवलीया जिथ जायचा तिथं रंग भरायचा..

मूळ कथा-मॉडेल मिलियोनेर. लेखक – ॲास्कर वाईल्ड (१८५४-१९००). या कथेचे संक्षिप्त भाषांतर केले आहे श्री अरविंद खानोलकर यांनी. इंग्रजीतील अनेक उत्कृष्ट कथांना मराठीत भाषांतरित करुन त्या संक्षिप्त स्वरुपात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम.
त्यांच्या एकुलत्या एक कन्येला, शिल्पाला पहायला पाहुणे येणार होते. त्यांनी सकाळी अकराची वेळ दिली होती.
“अहो त्या वाह्यात गुरुजींना आदर्शाचार्य पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात. त्याला पंधरा दिवस होऊन गेले आता. त्यातला ताजेपणाही निघून गेला. तरीही त्यांची मुलाखत तुम्ही अजूनही घेतली नाहीत? कुठे होता तुम्ही सूर्याजी रविसांडे?” ‘रोजची पहाट’ चे संपादक आणि विशेषांक सम्राट आपल्या प्रमुख वार्ताहरवर म्हणजे काका सरधोपट यांच्यावर फारच नाराज झाले होते.

या जगात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भविष्यात घडणाऱ्या एकातरी घटनेचा संदर्भ असतोच.असे विजयला वाटते. इतकेच नव्हे तर विजयचा पाय दुखणे हे ही विनाकारण नसावे त्यामागेही नियतीची काहीतरी योजना नक्कीच असावी. विजय पाय धरून जरी घरी बसला असला तरी त्याचे डोके कधीच गप्प बसत नाही त्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतेच.
१९७३ साल उजाडलं आणि ‘जंजीर’ चित्रपटाद्वारे अॅंग्री यंगमॅन म्हणून त्याचं ‘बारसं’ झालं! या चित्रपटाने त्याला जीवनसाथी, ‘जया’ मिळाली. ‘अभिमान’ व ‘नमक हराम’ मधून त्याच्या अभिनयाचा कस लागला. ‘शोले’ चित्रपटाने इतिहास निर्माण केला. अब्जावधीची कमाई करणारा हा एकमेव चित्रपट ठरला.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महात्मा गांधींनी म्हटलं होतं, ‘परमेश्वराला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यायचा असेल, तर तो भाकरीच्याच रुपाने घ्यावा लागेल!’ आता ऐंशी वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे, आता भाकरी ही भुकेल्याला जीवनावश्यक असली तरी तिची जागा आता ‘वडापाव’ने बळकावली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti