(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • रंगांचा बेरंग

    व्हिजिटींग कार्डाची कामं त्यावेळी सारखी येत असत. त्याचं डिझाईन केलं की, निगेटिव्ह पाॅझिटिव्ह तात्यांकडे, ग्राफिनात करुन प्रिंटींगला देत असू. यामध्ये सुरुवातीला भावे हायस्कूल समोरील यंदे स्क्रिन प्रिंटरकडे, काम देऊ लागलो. यंदेची ओळख वेलणकरांमुळे झाली होती. यंदेच्या वडिलांचं मोटार गॅरेज होतं. त्या जागेच्या एका कोपऱ्यात यंदे व सावंत दोघेही स्क्रिन प्रिंटींगचं काम करायचे. तिथं पटवर्धन नावाचा मित्र भेटत असे. त्याला आम्ही ‘नुक्कड’ मधील ‘खोपडी’ हे नाव ठेवले होते. तो हाॅटेलची मेनू कार्ड यंदेकडून प्रिंटींग करुन घेत असे.

  • दिवाळी आली, दिवाळी संपली…

    पूर्वी भेटकार्ड पाठवून शुभेच्छा पोस्टाने पाठविलेल्या जायच्या. त्याचं उत्तर आलं की समाधान वाटायचं. त्यासाठी पोस्टमनची आतुरतेने वाट पहायचो. आता पोस्टमन गायब झालाय. शुभेच्छा कार्डला स्मार्ट फोनच्या व्हाॅटसअपचा पर्याय आलाय.

  • एकदम आयटम…

    तिला काय अपेक्षित होते ते माहित नाही पण मी बोलून गेलो. मला माझीच मजा वाटली कारण हे उत्तर मी कसे दिले .

  • रुद्रा – कादंबरी – भाग १२

    कालच्या ‘राजयोग’ डिनरच्या वेळची राधाने दिलेली माहिती राघव पुन्हा पुन्हा आठवत होता.आणि त्या बरोबर खळखळून हसणारी सुंदर राधा पण नजरे समोरून हालत नव्हती! तरी त्याने आपले मन केस वर फोकस केले. तो मनोहर नेमका कोण होता? तो संतुकरावांना कशासाठी भेटायला गेला होता? त्या दोघात कसलेही साम्य नव्हते.

  • तुमसे अच्छा कौन है? – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ९

    देव सुद्धा, कधी कधी कोणत्या धुनकीत लग्नाच्या गाठी मारतो कोणास ठाऊक? आता माझं लग्न लव्ह मॅरेजच आहे म्हणा. दोन चार महिने आम्ही भेटत होतो. साधारण तो थोडासा रिझर्व्ह वाटला, पण चालता है. असतात काही माणसं अंतर्मुख. अन अशी माणसं कमालीची शांत आणि ‘कुल’ असतात.

  • गेटवे – मनोगत

    ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री प्रकाश बाळ जोशी यांचे गेटवे हे पुस्तक म्हणजे शहरी जीवनावर मार्मिक टिपणी करणाऱ्या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा संग्रह आहे. या पुस्तकातील कथा आता मराठीसृष्टीवर क्रमश: प्रकाशित करत आहोत.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ४७ )

    आज सकाळी विजय त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी त्याच्या इमारतीतून बाहेर पडला. त्याच्या हातात पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या होत्या. इमारतीच्या खाली त्याच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले त्याच्या हातातील पाण्याच्या बाटल्या पाहून ते म्हणाले, ” ह्या बाटल्यांची हमाली उगाच कशाला करतोस ? त्यावर विजय त्या गृहस्थाला म्हणाला, ” महिनाभर जर मी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन पाणी प्यायलो तर १२०० रुपये होतील आपल्या इमारतीचा मेंटेनन्स फक्त ८०० रुपये आहे. विजयचे हे उत्तर ऐकून तो गृहस्थ गप्पच बसला. विजयने जो विचार केला होता तो विचार त्या गृहस्थाने स्वप्नातही केलेला नसेल. विजय नेहमीच इतरांपेक्षा वेगळा विचार करतो म्हणूनच कोणी त्याच्या तोंडाला लागत नाही कारण त्याच्या प्रत्येक कृतीचे त्याच्याकडे कोणालाही पटेल असे स्पष्टीकरण असते.

  • रुद्रा – कादंबरी – भाग ३

    इन्स्पे. राघव नुकताच सी.बी.आय ला अटॅच झाला होता. सकाळचे एरोबिक्स संपवून तो घाम पुसत होता. तोच त्याचा मोबाईल वाजला. हवालदार जाधव फोनवर होता. 

  • ऐकावे बण्डाजी, वाचावे बण्डाजी!

    पंचावन्न वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. कोल्हापूरमधील एका माध्यमिक शाळेच्या वर्गात, मागच्या रांगेतील बाकावरील मुलं दंगा करीत होती. वर्गात सर आले, त्यांनी पाहिलं की, मागे बसलेल्या खोडकर मुलांमध्ये एक मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे.. त्यांनी त्या मुलाला शिक्षकांच्या खोलीत बोलावले व तू त्या मुलांच्या नादी लागून, बिघडू नकोस असे समजावले. नंतर तो मुलगा पुढील बाकावर बसून, अभ्यासात लक्ष घालून जीवनात खूप यशस्वी झाला!! तो बंडखोर मुलगा म्हणजेच ‘आकाशवाणी, पुणे’चे सुप्रसिद्ध निवेदक, विनोदी एकपात्री कलाकार, विडंबन गीतकार, कवी, विनोदी लेखक.. बण्डा जोशी!!

  • टप्पू (कथा)

    नेहमीप्रमाणे तंद्रीत चाललो होतो. तितक्यात एक गाडी माझ्या जवळून गेली आणि लगेच थाबली. मी दचकलोच. त्या कार ला नेहमीप्रमाणे बी. सी एम सी .करणार होतो.. तितक्यात ती कार मागे आली .