वाशीम जिल्ह्यातील सवड या गावात मोठी दुर्घटना घडली. १९ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे वॉकिंगला जाणाऱ्या तीन मुलांना एका अज्ञात कारने चिरडले. काहीही चूक नसताना बिचाऱ्या तिघांना आपला जीव गमवावा लागला.
रिसोड जवळील सवड येथील अंकित गौतम जाधव वय १४ वर्षे, वैभव विश्वनाथ वाकळे वय १५ वर्षे, करण लक्ष्मण खांदळे वय १३ वर्षे हे तिघे मित्र आज पहाटे ५:३० वाजताचे दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी आल्यावर वाशीम-रिसोड रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असतांना वाशीमवरून सुसाट वेगाने आलेल्या अज्ञात कारने या तिघांनाही चिरडले कार त्याच वेगात पसार झाली. कार ने चिरडल्याने घटनास्थळीच तिघांचाही मृत्यू झाला. जी सुसाट कार आली ती बहुतेक इनोव्हा असण्याची शक्यता मॉर्निंग वॉकला आलेल्यांनी व्यक्त केली. तिन मित्रांच्या आकस्मिक मृत्यूने सवड गांवावर शोककळा पसरली. अंकित जाधव हा रिसोडच्या शिवाजी हायस्कूलच्या इयत्ता आठवीत तर वैभव वाकळे हा इयत्ता नववी मध्ये शिकत होता. करण खांदळे हा सवडच्या सिद्धेश्वर विद्यालयात सातव्या वर्गात शिक्षण घेत होता. मृतक तिघेही एकमेकांचे नातेवाईक असून त्यांची चांगली मैत्रीही होती. या तिघांपैकी वैभव वाकळे पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेला काळाने त्यावर घाला घातल्याचे त्याचा मोठा भाऊ साश्रुपूर्ण नयनांनी सांगत होता. दुर्घटनेनंतर तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले होते. तिथे शेकडो शोकमग्न नातेवाईक,मित्र गोळा झाले होते. १३- १४ वर्षे वयोगटातील त्या निरागस मुलांचे फोटो पाहिले तर मन सुन्न होते.
या घटनेवरून पुन्हा एकदा आठवण झाली. सलमानखाननेही मुंबईत असेच लोकांना चिरडले होते. त्यावर शहाणा गायक अभिजित याने तर हद्द ओलांडली. तो म्हणाला की, रस्त्यावर झोपणाऱ्यांचा मृत्यू कुत्र्यासारखाच होतो. काय म्हणाल अशा निर्लज्ज लोकांना. यातून समाजात वाढत चाललेली श्रीमंतांची मग्रुरीच दिसून येते. कारमधून सुसाट जाणारे श्रीमंत हे रस्त्याने पायदळ जाणाऱ्यांना किडे माकोडे समजतात की काय असा प्रश्न पडतो. यांच्याकडे पैसे असतात, गाड्या घेतात, सुसाट आणि बेदरकारपणे चालवून निष्पाप लोकांचे जीव घेतात. वाशीम जिल्ह्यातील या तीन बालकांचे जीव गेले. तो भामटा चालक आपली कार दामटत पळून गेला. आई-वडिल तर आपले लाडके गमवून बसले. अशांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही. हे आपले दुर्भाग्य. म्हणून अशा लोकांची मस्ती वाढत चाललेली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जर रस्त्याने पायदळ जाणाऱ्यांनीही असेच पाऊल उचलले तर काय होईल. त्यांचेही काही होणार नाही. पण अनेक निष्पाप लोकांचे प्राण तर वाचतील. आता सुसाट आणि बेदरकारपणे दुचाकी, चारचाकी वाहन चालवणाऱ्यांची मस्ती जिरवण्यासाठी पायदळ चालणाऱ्यांनीही कायदा हातात घेऊन त्यांच्यावर दगड भिरकावले. तर त्यात गैर काय असे सामान्य माणसाला का वाटू नये.
अपघातांचे हे प्रकार असेच जर सुरू राहिले तर चालकांना दगडधोंडे खाण्याचे दिवस दूर नाहीत. एवढे मात्र लक्षात ठेवावे. आपला जीव लाखमोलाचा वाटतो. तसाच दुसऱ्यांचा जीव समजून वाहन चालवले तर बिघडते कुठे. पण घाई वेळेची, मस्ती पैशाची, मौज वेळेची करत अनेकांना प्राण गमवावा लागतो. मोठ्यांचा खेळ होतो, अन गरीबांचा जीव जातो. असेच म्हणावे लागेल.
जनार्दन गव्हाळे,
खामगाव, जि. बुलढाणा. विदर्भ
“मेरी सुरत तेरी आंखे” या चित्रपटात, मन्ना डे यांनी गायलेले, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी” हे गाणे ऐकले आणि बघितले, तेंव्हापासून माझ्या मनावर या गाण्याचा थोडा प्रभाव आहे. या गाण्यात, आपल्याला, सुरवातीपासून “अहिर भैरव” ऐकायला मिळतो आणि अशा असामान्य गायकीतून आपण या रागाचा आनंद घेऊ शकतो. हिंदी गाण्यात प्रसिद्ध असलेल्या, केरवा तालात हे गाणे बांधले आहे.
आज मानसोपचार तज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने …सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले
आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं …
इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष!
ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’
ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता…
कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.
प्रत्येकाचे मूड्स संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला “स्वतःला काय हवं आहे” हा प्रश्न कधी मागे राहतो हे काळतच नाहि. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.
मग अशा वेळी प्रश्न पडतो “हे सगळं कशासाठी?”
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे – “आपण एकटेपणाला घाबरतो.”
सुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे हि एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.
लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” असं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो.
मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.
‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी –
“सोबत…!”
माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायच
-- सुमंत आचार्य
साहित्याचा चोर मी
तरि साहित्यिक थोर मी
थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी
पण लढतो घनघोर मी ।।
-सुभाष स.नाईक
कसय....
आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना.....
लगेचच बरळतील.,,
"आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही....
नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता....."
आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना...
मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात......
"चालतय हो..... दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच...
आपण घाई केल्यास देश पुढे जाणार आहे का?"..
असतात अशीही लोक.....
घ्या सांभाळुन ......
विवेक जोशी...
तु वारसदार सूर्यकुलाचा
ज्यांना थांबणे माहित नाही……………
एकदा एका लावणीच्या कार्यक्रमाला पु. ल. देशपांडे यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्या नंतर सभागृहात लावणी कलावंताने पुलंना म्हटलं...
‘‘तुम्ही बी तमासगीर हायसा नव्हं!’’
तेव्हा पुलं उत्तरले, ‘एखाद्या कलाकाराने छानसं गायन केलं किंवा अभिनेत्याने नाटक सादर केलं किंवा नतर्कीने नृत्य साकारले, वादकाने सुमधुर वाद्य झंकारले तर त्याला परफॉर्मन्स आर्टिस्ट म्हटल जात, तर त्याच ताकदीने लावणी सादर करणाऱ्या कलावंताना तमासगीर म्हटल जातं.’
खरोखरच आपल्या प्रतिभासंपन्न शब्दसंचाराने गदिमांच्या लेखणीतून प्रत्यक्षात शारदेचं वरदान उमटलं, तर बाबुजींच्या स्वरझंकारातून सरस्वतीच्या सुरेल सुरांचे सप्तक झळाळले आणि पुलंच्या लेखणीतून श्रीविष्णूंचं संगीतमय शब्दलालित्य दृगोचर झालं. या गदिमा, बाबुजी आणि पुलंच्या प्रतिभात्रिवेणीतून जन्माला आलेलं मराठी कलासाहित्य अभिजात आहे आणि कलाकार तमासगीरच आहेत. कारण तमाशा म्हणजे काय...
‘तमापासून आशेपर्यंत रंगत जाणारा खेळ म्हणजे तमाशा!’’
तम म्हणजे अंधारापासून आशेच्या प्रकाशापर्यंत जाण्याचा मार्ग तो तमाशा. हा खेळ मग कोणी निखळ आनंद देणाऱ्या गीतलेखणाद्वारे तर कुणी सकस अभिनयाद्वारे तर आणखी कुणी मनोहारी नृत्याद्वारे साकार करताना स्वत:सह जनसागराला असीम आनंदात डुंबवतो, तो कलावंत तमापासून आशा-अपेक्षांपर्यंत रंगत जाणारा खेळ सादर करतो, तो ख़ऱ्या अर्थाने तमासगीरच म्हणावयास हवा आणि त्या सादरीकरणास तमाशा म्हणावयास हवं.
निवेदिका अनघा मोडक बोलत होत्या. कोमल मृदु वाणीने चोखंदळ रसिक प्रेक्षक तल्लीन होत होते. त्यांनी अभ्यासू प्रतिभेतून निवेदनाची अलितीय पण समयोचित मांडणी करीत, नवनवीन गोष्टींनी अवघ्या सभागृहाच्या मनावर राज्य केल. याच तल्लीनतेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला तो स्वरभास्कर नचिकेत देसाई यांनी प्रस्तुत केलेला ‘कानडा राजा पंढरीचा’ हा गदिमा, बाबुजींचा अभंग. विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिरसात चिंब न्हालेल्या श्रोत्यांनी मग ताल धरला तो नचिकेतच्या सुरेल गळ्यातील पल्लेदार तानेवर आणि नजाकतीने गायलेल्या हरकतीवर.
हा होता क्लायमॅक्स !
सुरेल गळ्याच्या गायिका सोनाली कर्णिक, दीप्ती रेगे, सानिया पंडित यांनी स्वरसाज चढविला तर संगीत संयोजक प्रशांत लळीत, व्यवस्थापक आणि तबला स्वप्निल पंडित, तसेच प्रसन्न पंडित आॅक्टोपॅडवर मोहिते तर तालवाद्यांवर माळी यांनी उत्तम साथ दिल्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या स्वरांजलीची तरल स्पंदने आसमंत व्यापून गेली.
खरंतर, हाऊसफुल्ल श्रोतृगण आणि मी सलग सव्वातीन तास एकदा खुर्चीवर जे बसलो तो कार्यक्रम संपेपर्यंत... या अप्रतिम मंत्रमुग्ध करणाऱ्या अदाकारीने
एवढा प्रभावित झालो की अगदी ब्रह्मानंद मिळाला... ब्रह्मानंद मिळाला... दुसरे शब्दच नाहीत!
यशवंतराव प्रतिष्ठान नवी मुंबई आणि साहित्य मंदिराच्या संयुक्त विद्यमाने साहित्य मंदिर, वाशी, नवी मुंबई येथे साकारलेला स्वरतीर्थ हा संगीतमय नजराना म्हणजे लाखमोलाची संधी आम्हाला विनामूल्य प्राप्त झाली त्याबद्दल आयोजकांचे मन:पूर्वक धन्यवाद!
लेखक : घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/
तर आम्ही एकूण चार पाच जणांनी पहाटे बसने जाण्याऐवजी आदल्या दिवशी रात्रीच सटाण्याला जायचे ठरवले होते व त्यानुसार आम्ही तयारी करून गांजा , ब्राऊन शुगर असा पैसे असतील तेव्हढा साठा सोबत घेऊन नाशिक ला सी .बी .एस च्या स्थानकावर जमलो होतो..
Copyright © 2025 | Marathisrushti