(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • नाणेघाट

    प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुविश्व वंदिता।

    शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

    – शिवमुद्रा

    प्रतिपदेच्या चंद्र कलेप्रमाणे विकसित होत जाणारी हि राजा ….तुझी मुद्रा . हि जगाला वंज हो . जगाला कल्याणकारी ठरो असा ह्या मुद्रेचा आक्षय म्हणजेच ( अर्थ ) होता आणि आहे आपल्याराजमुद्रेचा

    चेतन र राजगुरु

    ९९८७३१७०८६

    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा.

  • भविष्यातील उर्जास्त्रोत: अणूउर्जा

    अणूउर्जेच्या प्रश्नावरून भारत-चीन-अमेरिका आणि इतर राष्ट्रे महत्वाची भुमिका वटवू शकतात. अणूउर्जेकडे खनिजतेलाला पर्यायी आणि मानवतेच्या कल्याणासाठी वापरला जाणारा उर्जास्त्रोत या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

  • राशी व त्यांचे स्वभाव – कर्क

    राशी :- कर्क
    स्वामी :- चंद्र
    देवता :- हरिवंश
    जप मंत्र :- ॐ ह्रीं हरिहराय नमः
    उपास्यदेव :- शिव
    रत्न :- मोती

    जन्माक्षर :- हि हि हु हू हे हो डडा डि डी ड् डू डे डो डॉ ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. पुनर्वसु नक्षत्राचे एक चरण, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रे मिळून ही रास बनते. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष
    बलवान असते. साधारणपणे ही रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक.

  • आणि तोच धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ म्हणणारा श्रीकृष्ण असेल

    भ्रष्ट्र राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे. आणि तोच धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ म्हणणारा श्रीकृष्ण असेल

  • श्री. मोरेश्वर – मोरगाव

    अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात.येथील मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहमनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मुघल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे.

  • बकरा झाला – निलेश बामणे

    बकरा झाला – निलेश बामणे

    एक विनोदी संवाद आपल्यासाठी

    रहावल नाही म्हणुन !

  • मुक्त

    झुगारून द्यावीत बंधने स्वतःची
    मनाची, तनाची नि बांधल्या बंधांची,
    अदृश्य बेड्यांची नि भावनिक गुंत्यांची!
    ओलांडून यावेत उंबरठे लोकलाजेचे
    मान नसलेल्या दाराचे नि
    नासलेल्या शेवाळी नात्यांचे!
    उधळून लावाव्यात शेजा रत्नमाणकांच्या
    हवा कशाला मोह त्या सोन्याच्या पिंजऱ्याचा
    पारतंत्र्यात हरवतात जाणिवा किमान जगण्याच्या!
    पेटवून द्यावेत लोळ तप्त आगीचे
    वडवानलाचे नि धगधगत्या निखाऱ्यांचे
    ओतावे स्वत्व त्यात बनण्या कणखर लोहाचे!
    तुडवावी मस्त, मत्त, मनाची माती
    घडवावी त्यातून मूर्ती सुबक स्वतःची
    माजाचा मनाला न स्पर्शावा वारा,
    अशा पारदर्शी नितळ पाऱ्याची!!
    -- वर्षा कदम.
  • श्रीसूक्ताचे सौंदर्य

    कॉलेजमध्ये असताना अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी हमखास ऐकावं लागायचं – पारलौकिक जीवनाला अतिमहत्त्व दिल्यामुळे भारतातील लोक ऐहिक उन्नती करू शकत नाहीत. भारत अविकसित राहण्याचं हे एक कारण मानलं जातं. अनिच्छेनं हे लिहावं लागायचं, पण मन हे स्वीकारायचं नाही.

  • सेंद्रिय शेती आणि फायदे

    कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे !

  • शून्य सावलीचा दिवस

    पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.

    7 मे - कोल्हापूर, मिरज, सांगली.
    10 मे - सातारा, अक्कलकोट.
    11 मे - वाई, महाबळेश्‍वर.
    12 मे - बार्शी, बारामती.
    13 मे - लातूर.
    14 मे - अलिबाग, दौंड, पुणे.
    15 मे - मुंबई.
    16 मे - नगर, कल्याण, नांदेड, ठाणे.
    18 मे - पैठण.
    19 मे - जालना.
    20 मे - औरंगाबाद, नाशिक.
    21 मे - मनमाड.
    22 मे - यवतमाळ.
    23 मे - बुलडाणा, मालेगाव.
    24 मे - अकोला.
    25 मे - अमरावती.
    26 मे - भुसावळ, जळगाव, नागपूर.

    आपापल्या शहरात शून्य सावली चा अनुभव जरूर घ्या !