महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
ओंगोल हे शहर आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथे जिल्हा मुख्यालय आहे. आंध्र प्रदेशातील, एक महत्त्वाचे नेते ‘आंध्रकेसरी’ तंगुतुरी प्रकाशम पांथलू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पूर्वीच्या ओंगोल जिल्ह्याचे नाव ‘प्रकाराम’ असे ठेवण्यात आले असले तरी ओंगोल शहराचे नाव बदललेले नाही.
समुद्र किनारी असणारा रत्नदुर्ग अथवा भगवती किल्ला बहामनी काळापासून अस्तित्वात आहे. आजच्या खुद्द रत्नागिरी शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण त्याही जास्तीत जास्त दोन-अडीचशे वर्षांच्याच असतील.रत्नागिरी शहराची वसाहत प्रामुख्याने ब्रिटिश कालखंडात म्हणजे १८२२ नंतर वसलेली आहे. किल्ले रत्नागिरी, पेठ, शिवापूर, मौजे झाडगाव आणि मौजे रहाटघर ही चार ठिकाणे एकत्रित करून ब्रिटिशांनी त्यास रत्नागिरी भागाचा दर्जा दिला व नंतर ते जिल्ह्याचे ठिकाण बनले.
चाल्कुडी हे नाव यागशाला आणि कुडी या दोन शब्दांपासून तयार झालेले आहे. यागशालाकुडी याचा अर्थ तपासाठी ऋषी जेथे त्याग करतात ती भूमी असा होतो. यागशालाकुडीचा अपभ्रंश होत शाल्कुडी व नंतर सध्याचे चाल्कुडी हे नाव पडले.
डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ मध्ये संपन्न झाले. या साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी विविध विभागीय साहित्य साहित्यसंमेलने संपन्न झाली आहेत.
मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे शहर आहे. ते जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरापेक्षा मोठे आहे.
महाराष्ट्राच्या अति पश्चिमेस अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये उत्तरेस दमनगंगा नदी व दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यत गेलेला लांबट अरुंद प्रदेश कोकण म्हणून ओळखला जातो.
Copyright © 2025 | Marathisrushti