महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
गुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते. कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो.
July 5, 2016
धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री या तालुक्यांतील डोंगराळ व वनव्याप्त प्रदेशांत आदिवासी बहुसंख्येने राहतात. आदिवासींची मोठी संख्या असलेला नंदुरबार जिल्हा धुळ्यापासून वेगळा करण्यात आला असला तरीही धुळे हा ‘आदिवासी बहुल’ जिल्हा आहे.
June 22, 2015
गरचरमा हे अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. गरचरमा हे शहर अंदमान जिल्ह्यात येते. पोर्टब्लेअरच्या दक्षिणेला आठ किलोमीटवर हे शहर वसलेले आहे.
July 2, 2016
ओमान हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
November 10, 2018
संपूर्ण देशभर प्रसिध्द असलेल्या यक्षगान या नृत्यप्रकाराचे अंकोला हे माहेरघर आहे. त्याचबरोबर येथील सुग्गी हा नृत्यप्रकारही कर्नाटकात विशेष प्रसिध्द असून, प्रत्येक वर्षी बुध्दपौर्णिमेला येथे बांदीहब्ब नावाचा वार्षिक महोत्सव असतो. तो प्रेक्षणीय असतो.
February 9, 2017
या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.
February 4, 2026
कर्नाटक राज्यातील हम्पी शहरात पुरातन दगडी रथ आहे.
October 14, 2023
वर्धा जिल्हा कृषीप्रधान असल्याने अनेक प्रकारची पिके या जिल्ह्यात घेतली जातात. ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग आदी पिके खरीप हंगामात, तर गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात जिल्ह्यात घेतली जातात. सोयाबीन, तूर ही जिल्ह्यातील महत्त्वाची पीके असून जिल्ह्यात सर्वत्र ज्वारी व कापूस या पिकांसोबत तुरीचे उत्पादन घेतले जाते.
June 26, 2015
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कापड उद्योगासाठी प्रसिध्द आहे. भुसावळ -शुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, या लोहमार्गामुळे येथील कापड उद्योग भरभराटीस आला.
वनस्पती तुपाचा कारखाना आणि कापड गिरणी प्रसिध्द आहे.
येथील संत सखाराम बुवा यांनी सन १९१६ मध्ये विठ्ठल मंदिर बांधले.
March 9, 2017
अँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.
March 13, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti