(User Level: User is not logged in.)

विज्ञान / तंत्रज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डिटर्जंट (अपमार्जके)

    साबण वापरत असलो तरी साबण व डिटर्जंट यात फरक असतो. साधारणपणे डिटर्जंट म्हणजे आपण कुठलीही गोष्ट धुण्यासाठी जे रसायनयुक्त द्रव वापरतो त्याला डिटर्जंट असे म्हणतात. ग्रीस किंवा इतर कुठलेही चिकट डाग त्यामुळे निघतात.

      November 4, 2023


  • हार्ड डिस्क

    पूर्वीच्या काळी जे शब्द फक्त विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकलेल्या माणसांच्या तोंडी असायचे ते आता सर्वांनाच परिचयाचे झाले आहेत. संगणक क्षेत्राशी संबंधित असलेला असाच एक शब्द म्हणजे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क म्हणजे आपल्या टेबलवर असलेल्या संगणकाचे हृदय असते, ते बंद पडले तर संगणक कामच करू शकत नाही.

      September 5, 2023


  • आवडणारे गंध

    स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या संशोधनाद्वारे केला आहे. गंधांवरचं हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. संख्याशास्त्राचा आधार घेणाऱ्या या संशोधनातून निघालेले निष्कर्ष लक्षवेधी ठरले आहेत.

      June 2, 2022


  • अरसिबो दुर्बिणीचा शेवट.

    अरसिबो दुर्बिणीचा शेवट.

    दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अरसिबो दुर्बीण कोसळली… वेस्ट इंडिजच्या परिसरातील प्युर्तो रिको या बेटावर असलेली ही जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून यापूर्वीच व्यक्त केली गेली होती! या दुर्बिणीच्या ३०५ मीटर व्यासाच्या तबकडीवरून परावर्तित होणारे रेडिओ किरण या तबकडीपासून सुमारे दीडशे मीटर उंचीवर असणाऱ्या साधनांद्वारे टिपले जात होते. ही साधनं ज्या सांगाड्यावर बसवली होती, त्या नऊशे टन वजनाच्या सांगाड्याला तोलणारे दोरखंड तुटून हा सांगाडा तबकडीवर कोसळला आणि दुर्बिणीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली.

      November 30, 2021


  • भाकीत – वितळणाऱ्या बर्फाचं

    बर्फाच्या वितळण्याची भाकितं करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीतली अडचण ही आहे की, समुद्रावरच्या बर्फाचं प्रमाण हे अनेक घटकांवर अवलंबून असतं – वातावरणातल्या घटकांवर तसंच समुद्राच्या पाण्यातल्या घटकांवर! त्यामुळे या प्रारूपांची अचूकता ही काहीशी मर्यादितच असते.

      December 18, 2021


  • एका प्राचीन तलावाचं चरित्र

    रशियाच्या पश्चिमेला असणाऱ्या, काळ्या समुद्राच्या परिसरातील टॅमान द्वीपकल्पावरील डोंगराळ भागात, पॅराटेथिस जलाशयाचे कालानुरूप पुरावे खडकांतील थरांच्या स्वरूपात व्यवस्थित टिकून राहिले आहेत. डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॅमान येथील डोंगराळ जमिनीतले, पृष्ठभागापासून सुमारे पाचशे मीटर खोलीपर्यंतच्या खडकांचे, जवळपास साडेतीनशे थरांतले सुमारे सातशे नमुने गोळा केले.

      December 23, 2021


  • मेटल डिटेक्टर

    मेटल डिटेक्टर ज्याला धातुशोधक यंत्र असे म्हटले जाते. त्याचा उपयोग पूर्वीच्या काळापासून होत आहे. अजूनही हे साधन कालबाह्य ठरलेले नाही उलट त्याचे महत्त्व आजच्या दहशतवादी कारवायांच्या जगात वाढतच चालले आहे. मेटल डिटेक्टरचा उपयोग अर्थातच धातूचा शोध घेण्यासाठी केला जातो.

      August 24, 2023


  • कोलंबिया अवकाशयानाच्या अपघाताच्या निमित्ताने

    3 फेब्रुवारी 2003 ला अमेरिकेतील नासा संस्थेने अवकाश मोहिमेवर पाठविलेल्या कोलंबिया अवकाशयानाचा परतीच्या प्रवासात स्फोट झाला आणि मूळ भारतीय असलेल्या कल्पना चावलासह सात अंतराळवीर यात मृत्युमुखी पडले. या अपघातासंदर्भात प्रसिद्ध होणारी माहिती व अनेक तांत्रिक चुका विसंगतीसहं वाचकांपर्यंत पोहचवली ग?ली. त्यासंदर्भात 2003 मध्ये केलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांच्या मराठी विज्ञान परिषद येथे झालेल्या भाषणाचा गोषवारा.

      August 21, 2023


  • ब्लॅकबेरी

    ब्लॅकबेरी हा मोबाईल ईमेल व स्मार्टफोन यांचे एकत्रीकरण करून बनवलेला एक फोन आहे. कॅनडातील रीसर्च इन मोशन या कंपनीने १९९९ मध्ये ८५० हा ब्लॅकबेरी पहिल्यांदा तयार केला, पण तेव्हा त्याचे स्वरूप संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या पेजरसारखे होते.

      September 17, 2023


  • प्राचीन वृक्ष

    वनस्पती अभ्यासकांच्या दृष्टीने वृक्षाचे वय हे अत्यंत महत्त्वाचे असते. वृक्षाचे वय हा फक्त एखाद्याच्या कुतूहलापुरता मर्यादित विषय नसून, सदर वृक्षाने वातावरणातले कोणते बदल अनुभवले आहेत, याचेही ते निदर्शक असते. वृक्षाचे वय काढण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात त्याचा आढावा घेणारा, तसेच आज अस्तित्वात असलेल्या विविध प्राचीन वृक्षांची ओळख करून देणारा हा लेख…

      February 20, 2024