(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • बेरियम टेस्ट

    हे फोटो काढण्यास क्ष किरण तज्ञांना आधी भेटणे जरुरीचे आहे कारण यासाठी पुन्हा उपाशी पोटी जावे लागते. व आदल्या दिवशी जुलाबाचे औषधही घ्यावे लागते. जर बेरियम टेस्ट फक्त पोटासाठी (स्टमक, ड्युओडेनम) असले तर फक्त १५ मिनिटेच लागतात व यात स्पेशल डबल कॉंन्ट्रास्ट स्टडी म्हणजे हवा व बेरियम मिश्रण करुन पोटाचे अल्सरसाठी फोटो काढले जातात.

  • दवणा / दमनक

    ह्याचे उपयुक्तांग पंचांग व क्षार असून हे चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाचे व हल्के रूक्ष तीक्ष्ण असते.हा त्रिदोषशामक असून प्रामुख्याने कफवातनाशक आहे.

  • पोटाची सोनोग्राफी

    पोटाच्या एक्स-रेमध्ये त्यातील इंद्रियांची माहिती फारशी कळत नाही हे आपण मागील सदरामध्ये पाहिले. त्यातल्या त्यात स्वस्त दरात पोटाची सखोल माहिती माहिती मिळवण्यासाठी सोनोग्राफी खूप मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जाते.

  • कपिकच्छू/खाजकुहिली

    पुर्वीच्या काळी खोडकर विद्यार्थी वर्गात ह्याच्या शेंगा वरील लव बाकावर अथवा शिक्षकांच्या खुर्चीवर घालून मुलांच्या व शिक्षकांच्या नाकी नऊ आणत अशी हि खाजकुहिली.जिच्या शेंगेवरील लवंगेचा स्पर्श जर अंगास झाल्यास भयंकर खाज सुटते.
    ह्याचा वर्षायू वेल असून पाने ७-१३ सेंमी लांब,त्रिदलीय असून पानांवर बारीक लव असते.फुल १५-३० सेंमी लांब व मंजिरी स्वरूप असते.फुले वांगी निळ्या रंगाची असतात.फळ शेंगेच्या स्वरूपात ५-१० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असते ह्याच्या कडा वाकड्या असून शेंगेवरील दाट लव असते.प्रत्येक शेंगेत ५-६ धुरकट व चपट्या बिया असतात.बीज मज्जा पांढरी असते.

    ह्याचे उपयुक्तांग बीज,मुळ व रोम असून कपिकच्छू चवीला गोड,कडू असून थंड गुणाची व जड व स्निग्ध असते.हे गोड,जड व स्निग्ध असून वातनाशक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)फलरोम क्षोभ उत्पन्न करून कृमिनाशक कार्य करतात म्हणून फल रोम हे गुळ,मध व लोण्यासह मिसळून देतात व त्यानंतर रेचक औषध दिले जाते ज्यामुळे कृमी मरून पडतात.

    २)कपिकच्छू बीज शुक्रवृद्धि करते म्हणून नपुंसकत्वात हे उपयुक्त आहे.

    ३)कपिकच्छू मुळ हे आर्तवजनन असल्याने मासिकपाळीच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.

    ४)कृशता व अशक्तपणा ह्यात कपिकच्छू बीज उपयोगी आहे

    ५)गोड चव व थंड असल्याने बाळंतीणीमध्ये स्तन्यवृद्धि करण्यास कपिकच्छू बीज उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©Dr Swati Anvekar

  • सोनोग्राफी (स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र)

    या तपासामध्ये अल्ट्रासाऊंड (ध्वनीलहरी) यांचा वापर मुख्यत्वे पोटातील व स्त्रियांच्या गर्भाशय व गर्भामध्ये होणार्‍या रोगामध्ये होतो व ध्वनिलहरी, क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही.

  • खदिर / खैर

    खदिराचा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. खदिर चवीला कडू, तुरट असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कडू, तुरट व थंड असल्याने पित्तशामक व थंड सोडुन अन्य गुणांनी कफशामक आहे.

  • पोटाचे एक्स-रे

    सोनोग्राफीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पोटाचे एक्स-रे काढण्याचे प्रमाण घटले आहे.

  • आंबेहळद / आम्रगंधी हरिद्रा

    हिचे हळदीप्रमाणे दिसणारे वर्षायू क्षुप असते.ह्याची पाने ६० सेंमी -१मीटर लांब असतात व कंद गोल,स्थूल आल्याच्या कंदा प्रमाणे दिसणारा व रूंदिला बारीक व अधिक पांढरा असतो.ह्या कंदाला कैरी सारखा वास येतो.

    ह्याचे उपयुक्तांग कंद असून हि चवीला कडू,गोड व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.आंबेहळद कफपित्तशामक व वातकर आहे.

    चला आता आपण हिचे काही औषधी उपयोग पाहुयात:

    १)शरीराचा कुठला हि अवयव मुरगळला असता आंबेहळदीचा लेप लावल्यास सुज कमी होते.

    २)त्वचा रोगा मध्ये खाज व पुरळ आला असता आंबेहळदीचा लेप लावतात.

    ३)आंबेहळद रक्त शुद्ध करते म्हणून रक्ताच्या विकारात उपयुक्त आहे.

    ४)चेहऱ्यावर मुरमांचे डाग अथवा मुरूमे आली असता आंबेहळदीचा लेप लावतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©️ Dr Swati Anvekar

    English Name: Mango Ginger

  • शटी / कपूरकाचरी

    ह्याचा उपयुक्तांग कंद आहे.ह्याची चव तिखट,कडू,तुरट असून हि उष्ण गुणाची व हल्की व तीक्ष्ण असते.हि कफ व वातशामक आहे.

  • वरूण – वायवर्ण

    वरूण चवीला कडू,तुरट,तिखट व गोड असून उष्ण गुणाचा व हल्का व रूक्ष असून तो प्रभावाने रक्तदोषनाशक व अशमरीभेदक आहे.ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने व मुळ.वरूण वातनाशक व कफनाशक आहे.