(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • स्पेशल एक्स-रे (बेरियम स्वॅलो / एनेमा)

    अन्न, अथवा पाणी गिळताना अडचण येत असल्यास, अन्न वर येत असल्यास, सारखी उचकी लागत असल्यास किंवा आवाजामध्ये झालेला एकदम बदल म्हणजे बेरियम स्वॅलो करण्यास आमंत्रण.

  • बोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता)

    वयाच्या ३५ नंतर हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण पुरुष-स्त्रियांमध्ये हळूहळू कमी होते; परंतु काही स्त्रियांमध्ये एकदम जोरात घसरु लागते व अशा स्त्रियांना कंरदुखी, पाठदुखी व थोड्याशा दुखापतीमध्ये फ्रॅक्चर होणे असे आजार भेडसावू लागतात. म्हणून साधारण ४० नंतर प्रत्येक व कंबरदुखी असलेल्या सर्व पुरुषांनी बी.डी.एम. हा पास करुन, आपल्या हाडांची घनता कशी आहे, हे अधूनमधून बघितले पाहिजे.

  • सोनोग्राफी (कलर डॉप्लर)

    आधुनिक प्रतिमाशास्त्रात जवळजवळ सर्वच प्रतिमा कृष्णधवलच असतात; कारण निदानातील सूक्ष्मता ओळखण्यास मानवाचे डोळे कृष्णधवलातच सर्वात जास्त कार्यक्षम असतात.

  • शटी / कपूरकाचरी

    ह्याचा उपयुक्तांग कंद आहे.ह्याची चव तिखट,कडू,तुरट असून हि उष्ण गुणाची व हल्की व तीक्ष्ण असते.हि कफ व वातशामक आहे.

  • दारूहरिद्रा / दारूहळद

    ह्याचा १.५-४ मीटर उंचीचे काटेरी गुल्म असते.पाने बळकट व भोवऱ्याच्या आकाराची अखंड व कडेला काटे असलेली असतात.पुष्पमंजिरी ५-८ सेंमी लांब असून फूल पिवळे व मोठे असते.फळ निळ्या तांबड्या रंगाचे व बेदाण्या प्रमाणे दिसणारे असते.काष्ठ गडद पिवळ्या रंगाचे असून पाण्यात उकळल्यावर ही पिवळेपणा टिकून राहतो.

    दारूहळदिचे उपयुक्तांग काण्ड,मुळ,फळ व रसांजन आहे.ह्याची चव कडू,तुरट असून ती उष्ण गुणाची व हल्की व रूक्ष असते.ह्याचे काण्ड मुळ चवीला कडू तुरट असल्याने कफ व पित्तनाशक असून फळ पित्त शामक आहे.

    चला आता आपण दारूहळदीचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)दारूहळद दीपन,यकृत्तोत्तेजक व पित्तसारक असून मळ बांधून ठेवते म्हणून भुकन लागणे,आव पडणे ह्यात उपयुक्त आहे.

    २)कफनाशक असल्याने दारूहळद खोकल्यात वापरतात.

    ३)त्वचारोग,खाज,स्त्राव कमी करायला दारूहळद लावायला व पोटात घ्यायला देतात.

    ४)स्त्रियांच्या अंगावर पांढरे जात असल्यास दारूहळदीचा काढा देतात.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©Dr Swati Anvekar

  • अॅंजिओग्राफी आणि डी. एस. ए.

    रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्याकरता अॅंजिओग्राफी हा तपास क्ष-किरण शास्त्र करीत असे.

  • मंजीष्ठा

    मंजीष्ठाची अनेक फांद्या असलेली प्रसरणशील आरोहिणी वेल असते.ह्याचे काण्ड चौकोनी व गुलाबी लाल रंगाचे असते.पाने हृदयाकृती,टोकदार ५-१० सेंमी लांब व वरच्या भागात खरखरीत व मागील भाग मऊ व लव युक्त असतो.ह्याचा देठ पानांपेक्षा मोठा व दुप्पट लांब असतो.त्याच्यावर काट्यासारखे भाग असतात.चार पानांच्या चक्रातील २ पाने लहान व २ पाने मोठी असतात.फुल ०.३-२.५ सेंमी लांब मांसल गोलाकार काळे किंवा निळसर असते.

    आता आपण मंजीष्ठाचे गुण पाहुयात.हि चवीला तुरट,कडू,गोड असून उष्ण व गुरू व रूक्ष असते.हि कफ,पित्त व वातनाशक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)मंजीष्ठा कडू व तुरट तसेच रूक्ष असल्याने जखमा भरून काढते व त्यातील स्त्राव देखील कमी करते.

    २)हि कडू,तुरट,गोड चवीची व रूक्ष असल्याने रक्ताचे प्रसादन व पोषण करते व त्यात विकृत पद्धतीने वाढलेल्या तीन्ही दोषांचे शमन व शोधन करून त्वचेचा वर्ण सुधारते.

    ३)कडू,तुरट चवीने मंजीष्ठा मांस व रक्तातील क्लेद,पित्त व विषाचे शोधन व शमन करते व त्वचारोग नष्ट करते.

    ४)उष्ण गुणाने मंजीष्ठा गर्भाशय उत्तेजक व शोधक कार्य करते म्हणून मासिक पाळीच्या तक्रारीत ती उपयुक्त आहे.

    ५)अतिसारामध्ये मंजीष्ठा चुर्ण व लोध्र चुर्ण एकत्र मधासोबत देतात.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रियंगु / गव्हला

    ह्याचे उपयुक्तांग पाने व फुले असून हे चवीला कडू,तुरट,गोड असते.तसेच हे थंड गुणाचे व जड व रूक्ष असते.हे त्रिदोष शामक असून वात व पित्तनाशक आहे.

  • मदनफळ

    ह्याचा १० मीटर उंचीचा झाडीदार वृक्ष असतो.ह्याची पाने आघाड्याच्या पानांसारखी दिसणारी किंचीत गोल असतात.पानाच्या मध्य शिरेवर लांब व तीक्ष्ण काटे असतात.ह्याचे फळ पियर्सच्या सारखे दिसते व गोल,पिवळट धुरकट असून फल मज्जा विशिष्ट गंधयुक्त असते.मज्जेमध्ये कवचयुक्त काळ्या बिया असतात ह्यांना मदनफळ पिंपळी म्हणतात.

    ह्याचे उपयुक्तांग फळ असून मदनफळ चवीला गोड,कडू,तुरट,तिखट असून उष्ण गुणाचे असते हे हल्के व रूक्ष असून प्रभावाने उल्टी करवते.हे अल्प मात्रेत वापरल्यास गोड चव सोडल्यास इतर गुणांनी कफनाशक आहे व उष्ण असल्याने वातनाशक आहे.पण जास्त मात्रा वापरल्यास कफपित्त शोधन करते.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)मदनफळ साल वेदना व सूज कमी करते म्हणून वातव्याधीमध्ये अभ्यंगास ह्याचे तेल वापरतात.

    २)कफप्रधान विकारात उल्टी करविण्यास मदनफळ उपयुक्त.

    ३)अल्पमात्रेत वापरल्यास कफनिस्सारक आहे म्हणून सर्दी,दमा,खोकला ह्यात मदनफळ उपयुक्त आहे.

    ४)मदनफळ तीक्ष्ण,उष्ण,कडू,तिखट,तुरट असून
    त्वचा रोगात क्लेद व दुष्ट कफाचा नाश करते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • हरितकी/हरडा

    हा २०-३०मीटर उंच वृक्ष आहे.ह्याची त्वचा गडद तपकिरी रंगाची व खडबडीत असून हिरड्याचे लाकूड अत्यंत कठिण व घट्ट असते.ह्याची पाने ७-२० सेंमी लांब व ५-१० सेंमी रूंद व टोकदार असून पत्र शिरांच्या ६-८जोड्या असतात.फुले २.५-५ सेंमी लांब असून फळ २.५-५ सेंमी लांब व अण्डाकार असते आत कठिण मगज असतो व पृष्ठभागावर पाच पन्हाळी सारख्या उभ्या रेषा असतात.फळ कच्चे असता हिरवे व पिकल्यावर धुरकट पिवळे असते.प्रत्येक फळात एक कठिण बी असते.

    हरितकीचे उपयुक्तांग आहे फळ.ह्याची चव लवण अर्थात खारट सोडुन पाच हि चवी असलेली असते व प्रमुख चव तुरट असते.हरडा उष्ण गुणाचा असतो व हल्का,कोरडा असून त्रिदोषनाशक असतो.

    चला आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग पाहुयात:

    १)जखम झाली असता ती हरड्याच्या काढ्याने धुवून साफ करतात.

    २)बाळ हरडे चावून खाल्ल्याने भुक वाढते.

    ३)कफज अर्शामध्ये हरितकी हि गुळ व ताका सोबत देतात.

    ४)हरड्याचे चुर्ण मनुका व खडीसाखर सह देतात ह्याने अम्लपित्तामध्ये फायदा होतो.

    ५)हरडा दुषित कफ व मेद यांचा नाश करून बुद्धि व इंद्रियांचा जडपणा घालवून मेध्य कार्य करतो.

    ६)हरडा डोळ्यांच्या आरोग्यास देखील हितकर आहे.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४