(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक पाणथळभूमी दिवस

    सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाऱ्यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशांत मुरते आणि मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.

      February 2, 2022


  • तेलगू देशम पक्षाचा वर्धापन दिन

    १९९४ सालात एन. टी. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली तेलगू देसम पक्षाने पुन्हा बहूमत मिळवले. किंबहूना सामान्य मतदाराला उघड आमिष दाखवून मते मिळाणारी ती पहिली निवडणूक असावी. एक रुपया किलो तांदूळ देण्याच्या आश्वासनाने रामाराव यांना प्रचंड बहूमत मिळालेले होते.

      March 29, 2022


  • जागतिक टेलिव्हिजन दिवस – २१ नोव्हेंबर

    १९९६ च्या मार्च महिन्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात २१ नोव्हेंबर ला जागतिक दूरदर्शन दिनाची साजरा करण्याची घोषणा झाली होती. या दिवशी विश्वा दूरदर्शन सभा भरविण्यात आली होती. १९९६ साली दूरदर्शनचा ‘इडियट बॉक्स’ खेडोपाड्यात पोहोचला नव्हता व म्हणून प्रस्तुत दिनाची ‘‘श्रीमंतांचा दिवस’’ अशी हेटाळणी देखील झाली होती.

    जॉन लॉगी बेअर्डने १९२५ साली टेलिव्हिजनचा शोध लावला, तेव्हा प्राथमिक अवस्थेतील दूरदर्शनचा वापर शिक्षण, मनोरंजन नि माहिती एवढ्यापुरताच मर्यादित होता. टेलिव्हिजन शब्दाची उत्पत्ती ग्रीक व लॅटीन या दोन भाषांतील शब्दांचे एकत्रीकरण होऊन झाली आहे. ‘टेली’ या ग्रीक शब्दाचा अर्थ दूरचे तर व्हिजिओ या लॅटीन शब्दाचा अर्थ दृष्टी. त्यावरून दूरचं दाखविणारा तो टेलिव्हिजनचा खोका होय. टेलिव्हिजनचा शोध लागल्यापासून तो घरेदारे, कार्यालये, सार्वजनिक संस्था या ठिकाणी आपले स्थान हक्काने पटकावून बसला आहे. अलिकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सी.सी.टी.व्ही.) हा अवतारदेखील सार्वजनिक ठिकाणी, उद्योगक्षेत्रात, मॉलमध्ये सर्रासपणे वापरला जात आहे.

    प्रारंभीचा टेलिव्हिजनचा अवतार हा यांत्रिक स्वरुपाचा होता व तो सेलेनियम या धातूच्या फोटो कंडक्टिव्हिटी तत्त्वावर आधारीत होता. विलो- – स्मिथ नावाच्या तंत्रज्ञाने १८७३ साली तो शोधून काढला होता. १८८४ मध्ये जर्मनीतील पॉल गॉटलिब निपकोन याने स्कॅनिंग डिस्क शोधून काढली व त्या मॉडेलमध्ये सुधारणा केली होती. मात्र १९२५ च्या सुमारास जॉन लॉगी बेअर्ड याने या यांत्रिक खोक्यात फिरत्या प्रतिमा दाखविल्या व तोच तो खरा टेलिव्हिजन ठरला. अर्थात त्यात इलेक्ट्रोनिक्स क्रांतीनुसार उत्क्रांती होत गेली हेही तितकेच खरे आहे. ही क्रांती १९३५ पूर्वीची, १९३५ ते १९४१, दुसरे महायुद्ध, १९४६ ते १९४९, १९५० ते १९५९, १९६०-२००० अशा टप्प्यात होत गेली. आज तर टी.व्ही. कुटुंबाचा घटक बनून गेला आहे. दूरदर्शनमुळे वाचनसंस्कृती लयास गेली असा दोषारोप केला जातो.

    संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 21, 2018


  • मराठी भाषा गौरव दिन

    मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वासल्याचे बोल आहेत. कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही . कारण मार्दव, ममत्व हे या मराठी भाषेच्या ठाई कायमच वसलेले असते. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ” मराठी भाषागौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.

      February 27, 2024


  • किशोर मासिकाची पन्नास वर्ष

    किशोर मासिकाची पन्नास वर्ष

    महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामार्फत ‘किशोर’ची निर्मिती झाली, ती मूळ संकल्पना होती, तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांची.

      November 14, 2021


  • ‘ब्रह्मचारी’ चित्रपट प्रदर्शित झाला

    ‘ब्रह्मचारी’ चित्रपट प्रदर्शित झाला

    स्वत: अनाथ असलेला ब्रह्मचारी (शम्मीकपूर) अनेक अनाथ, असहाय मुलांचा सांभाळ करत असतो. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने मुलांचा सांभाळ करणं त्याला अत्यंत कठीण जात असतं. पण तरीही तो हसतमुखाने त्यांना आशावादी बनविण्याचा प्रयत्न करत असतो. अशी या चित्रपटाची कथा होय.

      April 26, 2022


  • दैनिक नवाकाळचा स्थापना दिवस

    नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक ‘नवाकाळ’ ची स्थापना केली. त्यांनी ‘नवाकाळ’ धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ९ फेब्रुवारी १९२९ रोजी भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार ‘नवाकाळ’ चे संपादकपद सोडले.

      March 7, 2022


  • अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस

    हिमालयाची डोंगररांग, हिमशिखरांतून वाहत येणाऱ्या नद्या व त्यांची खोरी, अप्रतिम जंगल अशा अनेक नैसर्गिक ठेव्यांचे वरदान लाभलेला असा हा अरुणाचल. एका चौरस किलोमीटरला १७ माणसे अशी भूभागाची वाटणी असलेला प्रदेश. स्थल पर्यटन, निसर्ग पर्यटन, ट्रेकिंग, माउंटन बायकिंग, राफ्टिंग अशा अनेक उपक्रमांसाठी पूरक अशी ही भूमी. भारतातील उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं अरुणाचल प्रदेश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

      February 20, 2022


  • अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली

    ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली.
    या महत्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरणाचा थोडक्यात इतिहास.
    १५२८: मुघल शासक सम्राट बाबरने अयोध्येत ही मशीद बांधली होती. त्यामुळे या मशिदीला बाबरी मशीद असे म्हटले जाते.
    १८५३: इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा अयोध्येत जातीय दंगल झाली.
    १८५९: इंग्रजांनी वादग्रस्त परिसरात आतील भागात मुसलमान तर बाहेरील भागात हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी दिली.
    १९४७: वाद झाल्यानंतर सरकारने मुसलमानांना या स्थळावर जाण्यास बंदी घातली. हिंदुंना जाण्याची परवानगी होती.
    १९४९: येथे राम ललाची मुर्ती मिळाली. हिंदूंनी त्या मुर्ती तेथे ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे नंतर आंदोलन सुरू झाले. दोन्ही गटांकडून खटला दाखल करण्यात आला. मुस्लिम समुदायाकडून हाशिम अन्सारी तर हिंदूंकडून महंत परमहंस रामचंद्र दास हे याचिकाकर्ते झाले.
    १९५०: राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख रामचंद्र दास आणि गोपालसिंह विशारद यांनी फैजाबादमध्ये खटला दाखल करून हिंदुंना पुजा करण्याची परवानगी मागितली होती.
    १९६१: सुन्नी केंद्रीय मंडळाने खटला दाखल करून परिसरातील सर्व भाग हा कब्रस्तान (दफनभूमी) असल्याचा दावा केला.
    १९८४: विश्व हिेंदू परिषदेने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली एक गट बनवला.
    १९८६: फैजाबाद न्यायालयाने दरवाजा उघडण्याची परवानगी दिली आणि हिंदुंना पुजा करण्याची संधी मिळाली.
    १९८९: तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वादग्रस्त ठिकाणी शिलान्यास करण्याची परवानगी दिली.
    १९९०: लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा सुरू केली. त्यांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांनी समस्तीपूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर भाजपने व्ही.पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले.
    ६ डिसेंबर १९९२: कारसेवकांनी वादग्रस्त वास्तू पाडली आणि तात्पुरते मंदिर बनवले. पी.व्ही.नरसिंहराव सरकारने उच्च न्यायालयात धाव घेऊन येथील बांधकाम ‘जैसे थे’ ठेवण्याची मागणी केली.
    २००३: अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त स्थळाची खोदाई करून तेथे मंदिर होते किंवा नाही, याचा शोध घेण्याचे आदेश दिले. पुरातत्व विभागाने आपल्या अहवालात मशिदीच्या खाली दहाव्या शतकातील मंदिराचे अवशेष मिळाल्याचे म्हटले.
    २०१०: पहिल्यांदा सरकारने निर्णय बदलत दोन्ही पक्षांनी हे प्रकरण परस्पर मिटवण्यास सांगितले.
    ३० सप्टेंबर २०१०: अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत जमिनीचे तीन हिस्से करण्यास सांगितले.
    २०१६: भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मंदिराच्या निर्मितीची याचिका दाखल केली.
    १८ एप्रिल २०१७: सर्वोच्च न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारतींसह १७ जणांवर बाबरी मशीद पाडण्याचा कट रचल्याबद्दल खटला चालवण्याची परवानगी दिली.
    ९ नोव्हेंबर २०१९ : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने रोजी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला.
    गेल्या अनेक वर्षांपासून याप्रकरणी न्यायालयात वाद सुरू होता. मध्यंतरी न्यायालया बाहेर या प्रकरणी तोडगा काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. यासाठी न्यायालयाकडून मध्यस्थीचेही संकेत देण्यात आले होते. पण ९ नोव्हेंबर २०१९ रोजी लागलेल्या या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले होते.
    ५ ऑगस्ट २०२० : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. व श्री रामजन्मभूमी मंदिराच्या टपाल तिकिटाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      December 6, 2021


  • राष्ट्रीय उंधियो दिवस

    भारतीय खाद्यसंस्कृतीत असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे पूर्वी फक्त एखाद्या प्रदेशाची खासियत होते. परंतु कालांतराने ते संपूर्ण राज्याची ओळख बनून गेले. उंधियो पदार्थ याच पठडीतला. उंधियोला सुरती उंधियो म्हणूनही ओळखलं जातं.

      January 14, 2022