कॅप्टन नितीन चव्हाण : गाथा शौर्याची
Category:
लेखसंग्रहलहानपणी आपण मोठे होऊन फार नाव कमवावे, खूप प्रसिद्ध व्हावे असे सगळ्यांनाच वाटत असते. बालपणी भविष्यात काहीतरी अचाट कर्तृत्व दाखवून अजरामर होण्याची मनोरथे रंगवली जातात, पण बहुतेकांची ही स्वप्ने केवळ स्वप्नेच राहतात. मात्र फार थोडे सौभाग्यशाली, कर्तृत्ववान नरपुंगव असे असतात जे स्वप्रयत्ने स्वत:ची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात आणि इतिहासात त्यांचे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाते. आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यातील असाच एक नरवीर म्हणजे ‘कॅप्टन नितीन चव्हाण’.
