कुणी एकेकाळी हत्तीला चार पंख होते. जसा सकाळी कोंबडा बांग देतो
तसेच हत्ती पण देत होते. असंही म्हणतात की हत्तीवर बसून देव विश्वफेरीला
निघत असत. परंतु जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि लोकांची वस्ती वाढली
तेव्हा नवनवीन अडचणी निर्माण होऊ लागल्या. आकाशात उडता उडता
थकवा आला की हत्ती घरांच्या छतावर येऊन बसत; त्यामुळे त्यांच्या वजनामुळे घरे पडायला लागली. काही माणसं मेली. माणसे हत्तींचा खूप तिरस्कार करू लागले. ही वार्ता देवांपर्यंत पोहोचली, देव विचारात पडले आणि काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे या निर्णयाप्रत आले. एके दिवशी देवांनी सर्व हत्तींना बोलावले. भरपूर खायला प्यायला दिले, हत्ती भरपेट जेवले आणि शांतपणे झोपी गेले. हत्तींना गाढ झोपलेले पाहून
देवांनी त्यांचे पंख काढून टाकले. चार पंखांपैकी दोन पंख मोरांना दिले आणि
दोन केळाच्या झाडाला दिले. हत्तींना जेव्हा जाग आली तेव्हा त्यांना कळलं की आपले पंख कापले गेले आहेत. त्यांना खूप वाईट वाटलं. कुणाच्या समोर जायची लाज वाटू लागली. म्हणून ते जंगलात पळून गेले. तेव्हापासून हत्ती माणसांना घाबरू लागले.
उडणाऱ्या हत्तीची गोष्ट
कुणी एकेकाळी हत्तीला चार पंख होते. जसा सकाळी कोंबडा बांग देतो
तसेच हत्ती पण देत होते. असंही म्हणतात की हत्तीवर बसून देव विश्वफेरीला
निघत असत. परंतु जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि लोकांची वस्ती वाढली
तेव्हा नवनवीन अडचणी निर्माण होऊ लागल्या. आकाशात उडता उडता
थकवा आला की हत्ती घरांच्या छतावर येऊन बसत; त्यामुळे त्यांच्या वजनामुळे घरे पडायला लागली. काही माणसं मेली.