कृष्णाच्या बाळक्रांडा

एकदा यशोदेने त्याला नीट न्हाऊ घातले, अंगात कपडे घालून ओव्या गात
दह्यादुधाच्या गाड्याखाली त्याला पाळण्यात निजविले, आणि आपण कामाला
गेली. इकडे कृष्ण जागा होऊन वर पाय करून नाचू लागला, आणि पायांनी
सबंध गाडाचा गाडा उलथून पाडला!



कंसाने राज्यातल्या सगळ्या तान्या मुलांना मारण्याच्या कामगिरीवर प्रथम पूतना राक्षशिणीला पाठविले होते. ती शहरे, गावे व गौळीवाडे यातून मुलांचा नाश करीत करीत गोकुळात आली. नंद त्या वेळी काही कामासाठी बाहेर गेला होता. राक्षसी सुंदर स्त्रीचे रूप धारण करून यशोदेकडे गेली व गोड गोड शब्द बोलली. मग तिने श्रीकृष्णाला उचलून मांडीवर घेतले आणि त्याला ती पाजू लागली. तिने आपल्या स्तनाला भयंकर जालिम विष लाविले होते. कृष्ण प्रत्यक्ष विष्णूचा अवतार ! त्याला त्या राक्षसीचे कपट ठाऊक होते. आणि परमेश्वराला विषाची ती बाधा कोठून होणार ! कृष्णाने नुसते विषच नव्हे, तर तिच्या अंगातले रक्त सुद्धा शोषून घेतले आणि तिला मारून टाकिले!

एकदा यशोदेने त्याला नीट न्हाऊ घातले, अंगात कपडे घालून ओव्या गात
दह्यादुधाच्या गाड्याखाली त्याला पाळण्यात निजविले, आणि आपण कामाला
गेली. इकडे कृष्ण जागा होऊन वर पाय करून नाचू लागला, आणि पायांनी
सबंध गाडाचा गाडा उलथून पाडला!

एके दिवशी त्याला मांडीवर घेऊन यशोदा हसवीत खेळवीत बसली होती.
तेव्हा एकाएकी त्याचे अंग इतके जड झाले की, जणू काय मोठा डोंगरच मांडीवर
घेतला आहे!

कृष्णाविषयीच्या अनेक चमत्काराच्या गोष्टी ऐकून कंसाने त्याला मारण्यासाठी तृणावर्त राक्षस धाडला. हा वावटळीचे रूप घेऊन आला होता. त्याने कृष्णाला उचलून नेले. पण कृष्णाने त्याची मानगुटी धरून त्याला ठार केले.

कृष्णाने एकदा जांभई देताना तोंड उघडले, तेव्हा यशोदेला त्यात पृथ्वी, आकाश, सूर्य, चंद्र वगैरे सर्व ब्रह्मांड दिसले!

शेजारीपाजारी राहणा- या गवळिणींच्या घरी जाऊन कृष्णाने धार काढण्याच्या अगोदरच वासरे सोडून द्यावी; बेलाशक घरात शिरून दूध, दही व लोणी खावे, व आपल्या सोबत्यांना द्यावे. निजलेल्या तान्ह्या मुलांना चिमटे घेऊन रडवावे; अशा नाना प्रकारच्या खोड्या कराव्या. कृष्ण फार खोड्या करतो म्हणून यशोदेने त्याला एकदा दोरीने उखळीशी बांधले आणि ती कामाला गेली. इकडे तो उखळीसह सरकत सरकत दोन झाडांच्या मधून गेला, आणि उखळीमध्ये अडकवून त्याने दोन्ही वृक्ष समूळ पाडले.
रोहिणीचा मुलगा बलराम हा श्रीकृष्णाहून थोडासा मोठा होता. ते दोघेही
एकाच जागी राहत व खेळत. काही दिवसांनी नंद वगैरे सगळे गवळी गोकुळातून
निघून वृंदावनास जाऊन राहिले. तेथे यमुनेचे वाळवंट आणि गोवर्धन पर्वत
यासारखी खेळण्याची उत्कृष्ट ठिकाणे मिळाली, तेव्हा बळराम, कृष्ण व त्यांचे
खेळगडी यांना फार आनंद झाला. राम व कृष्ण गुरे चारण्यासाठी नेण्याइतके
मोठे झाले, तेव्हा ते मुरल्या, पावे, शिंगे, व चेंडू, काठ्या वगैरे खेळण्याचे सामान
घेऊन रानात जाऊ लागले. एके दिवशी ते रानात गेले असता एक राक्षस
वासराचे रूप घेऊन त्यांच्या गुरात शिरला. कृष्णाने रामाला डोळ्याने
खुणावले. त्याबरोबर रामाने त्याच्या तंगड्या धरून गरगर फिरविले आणि
कवठीच्या झाडावर फेकून दिले.

एकदा गुरांना पाणी पाजण्यासाठी सगळे जण यमुनेवर गेले होते. तेथे
बगळ्याचे रूप घेऊन एक राक्षस बसला होता. त्याने कृष्णाची प्रथम खोडी
केली. म्हणून त्याची चोच धरून श्रीकृष्णाने त्याला उभा चिरले.

राम, कृष्ण व दुसरे गोपाल (गवळ्यांची मुले) रानात जात, तेव्हा बरोबर शिदोरी नेत; आणि दुपारचे वेळी यमुनेच्या काठी रमत गमत, परस्परांच्या थट्टा मस्करी करीत व एकमेकांना वानगी देत, मोठ्या आनंदाने खात; केव्हा मुरल्या, पावे, शिंगे वाजवत व त्यांच्या नादावर नाचत; केव्हा धावत; केव्हा झाडांवर बसलेल्या वानरांची खाली लोंबणारी शेपूट ओढीत; त्यांना वाकुल्या दाखवीत; केव्हा पशुपक्ष्यांसारखे शब्द काढीत. असे ते गोपाल खेळत असता अघ नावाचा एक राक्षस अजगराचे रूप घेऊन तोंड उघडून बसला होता, त्याच्या तोंडात नकळत हे गोपाळ शिरले. कृष्णही त्यांचेमागून शिरला. हे पाहून राक्षस तोंड
मिटू लागला. पण यावेळी कृष्ण वेगाने वाढत चालल्यामुळे त्याला तोंड मिटता
येईना. शेवटी दम लागून राक्षस मेला. तेव्हा सगळे गोपाल बाहेर पडले.

अशारितीने राम व कृष्ण यांनी अनेक वेळा राक्षसांना मारून आपल्या सोबत्यांचे रक्षण केले व आपल्या पराक्रमाने सर्वांना चकित करून सोडले.

Author