No Picture
कथा

अत्तर, म्हैसूरपाक आणि तुळस

Category:

 

दामू .. एक अजब रसायन .. खरं तर वृद्धाश्रमाच्या संस्थापकांच्या गावातला , “चारच बुकं” शिकलेला तरुण .. विसाव्या वर्षीच आई वडिलांचं छत्र हरपलं म्हणून त्या दयाळू संस्थापकांनी त्याला आश्रमात आणलं आणि तो तिथलाच होऊन गेला .. आत्ता असेल साधारण “चाळीशीच्या” आसपास …. स्वयंपाक घरातल्या आचाऱ्यापासून साफसफाई करणाऱ्या मावशीपर्यंत सगळ्यांना मदत करायचा .. बागकाम मन लावून करायचा .. आश्रमात येणाऱ्या सगळ्या आजी-आजोबांच्या मनाचा ठाव घेत लगेच आपलसं करणारा असा हा कायम हसतमुख आणि बोलघेवडा गडी..

No Picture
कथा

पाठलाग

Category:

 

लग्नाचा वाढदिवस संपला. पार्टी आणि पाहुणे हे सोडून ते दोघे आज एकमेकांशी काहीही वेगळं बोलले नव्हते. इतका खास दिवस पण तोही रोजच्यासारखा आला आणि गेला. सईला झोप येईना. ती हॉलमध्ये आली…. मागची सारी वर्षे आज तिच्यापुढे उभी राहिली होती. ती विचार करत किती तरी वेळ बसुन राहिली.

No Picture
कथा

तिला काय आवडतं?

Category:

 

कॅलेंडर बघता बघता मेधाच्या अचानक लक्षात आले, अरे! पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस! किती वर्षाची झाली बरं आई? तिला जन्मवर्ष काही आठवेना. विचार करताना एकदम लक्षात आले, आई एकदा म्हणाली होती ‘ तू जन्माला आली तेव्हा मला नुकतंच विसावं वर्ष लागलं होतं.’

No Picture
कथा

सेकंड हँड

Category:

 

बंड्या! काहीसा अबोल, फारसा कोणात न मिसळणारा असा एक साधा भोळा, सामान्य मुलगा … तो तसा व्हायला कारणं देखील होती तशीच. दोन खोल्यांचं घर . कुटुंबं तसं खाऊन पिऊन सुखी असलं तरी परिस्थिती साधारण होती. बंड्याचा भाऊ त्याच्यापेक्षा जेमतेम अडीच वर्षांनी मोठा. त्यामुळे स्वाभाविकपणे लहानपणी बंड्याला दुपटी , टोपडी , खेळणी हे सगळं मोठ्या भावाचंच मिळालं.

No Picture
कथा

आरसा (कथा)

Category:

 

सलून मधला प्रसंग आहे …..मी सलून मध्ये बसलो असताना बहुधा तिथेच आजूबाजूला राहणारा एक ५-७ वर्षांचा लहान मुलगा आत शिरला … मागोमाग त्याची आई आली आणि सलून मध्ये काम करणाऱ्या माणसाला आणि आपल्या मुलाला आळीपाळीने सूचना देऊ लागली .. .. “अहो , याचे केस कापून झाले न की त्याला फक्त बाजूच्या बिल्डींग च्या गेट पर्यंत सोडा …

No Picture
कथा

सुटका

Category:

 

काही दिवसांनी समोरच्या सोसायटीत एक अ‍ॅम्ब्युलन्स आली .. कोणीतरी दोघे उतरले .. बिल्डिंगमधल्या बाकीच्यानी त्यांच्या त्यांच्या खिडकीतून टाळ्या वाजवल्या .. आनंदानी कसल्याश्या घोषणा दिल्याचे आवाज ऐकू आले.

No Picture
कथा

एक डल्गोना कॉफी अशीही

Category:

 

चमच्यानी ढवळत ढवळत एकीकडे तो व्यक्त होत होता . आपसूकच “मम” म्हंटल्यासारखा तिचा हात त्याच्या हाताकडे वळला ….. दोघांनीही एकत्र ढवळत….कॉफीच्या दोन्ही थरांची सरमिसळ करत , दोन्ही नात्यांना एकसंध , “एकजीव” केलं होतं …. अगदी नकळतपणे !!! ………दोन्ही नाती एकत्र होत एक नवीन नातं तयार झालं होतं “मैत्रीपूर्ण नवरा-बायकोचं नातं “

No Picture
कथा

खारीचा वाटा

Category:

 

मी व्यवसायात उतरण्यात किंवा बेकरी सुरू करण्यात त्याचा अप्रत्यक्ष “सिंहाचा वाटा” असला तरी गेल्या दहा वर्षात या कंपनीची जी भरभराट झाली आहे त्यात मात्र माझ्या मित्राचा “प्रत्यक्षपणे” आणि अगदी “शब्दशः”.. .. “खारीचा वाटा“ आहे .. हाहा ss .. !! ….पौराणिक काळापासून चालत आलेला “खारीचा वाटा“ हा शब्दप्रयोग सगळ्यांनी पूर्वी अनेकदा ऐकलाय .. पण आमच्या सुरेशचा ; आजच्या आधुनिक युगातला हा “खारीचा वाटा“ नक्कीच वेगळा आणि तितकाच समर्पक आहे ना मंडळी ??

No Picture
कथा

उम्मीद पर दुनिया कायम है

Category:

 

आता हे गेल्यावर्षीचं कोरोना प्रकरण बघा ना !!.. बिचारी इतकी निर्दोष माणसं मारली गेली .. इतके संसार उद्ध्वस्त झाले .. अगदी जगभर .. पण तुम्ही-आम्ही अजून जगतो आहोतच ना ? धक्क्याने गेलो नाही .. कारण हीच “उम्मीद”

No Picture
कथा

बारक्या

Category:

 

आपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !!