किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग १
Category:
व्हिडिओज व्हिडिओज - tempदि. ३ एप्रिल, हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्र शासनाने पहिला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किशोरीताईंनाच प्रदान केला होता. त्या सोहळ्यात किशोरीताईंची एक मुलाखतही झाली होती. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किशोरीताईंच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच पण अनेकांनी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.